नगर बुलेटिन २२-१२-२०२०

 नगर बुलेटिन 

रामकरण सारडा विद्यार्थीगृहची शतकोत्तर वाटचाल शैक्षणिक क्षेत्राला दिशादर्शक 

 बाळासाहेब थोरात :नूतन वास्तूच्या उद्घाटन समारंभाचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निमंत्रण

वेब टीम  नगर : हिंदसेवा मंडळ सर्वसामान्यांसाठी कार्य करणारी जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेली मोठी संस्था आहे. १०७ वर्षांची वैभवशाली व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या रामकरण सारडा विद्यार्थीगृहाच्या माध्यमातून समाजातील दीनदुबळ्या व वंचित घटकांच्या गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अविरतपणे चालू असलेले कार्य अभिमानास्पद आहे. हिंदसेवा मंडळाने विद्यार्थीगृहाची नूतन भव्य वास्तूची इमारतीची उभारणी करून चांगले काम केले आहे. रामकरण सारडा विद्यार्थी गृहाची शतकोत्तर वाटचाल शैक्षणिक क्षेत्राला दिशादर्शक आहे. अशा चांगल्या संस्थेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आनंदाने स्वीकारत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.                                                    

हिंदसेवा मंडळाने रामकरण सारडा विद्यार्थी वसतिगृहाच्या उभारलेल्या नूतन वास्तूचे लवकरच उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभाचे आमंत्रण देण्यासाठी हिंदसेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी केला. माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी रामकरण सारडा विद्यार्थी वसतिगृहाच्या नूतन वास्तूच्या उदघाट्न समारंभाचे निमंत्रण पत्र त्यांना दिले. यावेळी आ.  डॉ. सुधीर तांबे, हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा, माजी मानद सचिव सुनील रामदासी, सह सचिव अशोक उपाध्ये, मॉर्डन हायस्कूलचे अध्यक्ष  सतीश बुब, शां.ज.पाटणी विद्यालयाचे अध्यक्ष अनिल देशपांडे, अनंत देसाई, शिक्षक प्रतिनिधी कल्याण लकडे आदी उपस्थित होते.

यावेळी ब्रिजलाल सारडा म्हणाले, गेल्या शंभरहून अधिक वर्षापासून हिंदसेवा मंडळ जिल्ह्यातील शैक्षणीक क्षेत्रात भरीव योगदान देवून सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दारे उघडली आहेत. प्राथमिक पासून महाविद्यालयाचे उच्चशिक्षण विद्यार्थी घेत आहेत. रामकरण सारडा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी नूतन भव्य अत्याधुनिक वास्तूची उभारणी केली आहे.

प्रास्ताविकात संजय जोशी म्हणाले, हिंद्सेवा मंडळ या शैक्षणिक संस्थेचा प्रगतीचा आलेख प्रत्तेक वर्षी उंचावत जात आहे. यासाठी सर्व शाळा व महाविद्यालया मधून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या चांगल्या सोयी सुविधा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.

रामकरण सारडा विद्यार्थीगृहाच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण स्विकारल्या बद्दल कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भिंगारच्या पाणी प्रश्‍नांवर सर्वपक्षीय नागरिकांचे आंदोलन

पाणी प्रश्‍न न सुटल्यास पालकमंत्र्यांना घेराव घालणार

वेब टीम  नगर : भिंगारच्या पाणी प्रश्‍ना संदर्भात सर्वपक्षिय नागरिकांनी कॅन्टोमेंट बोर्डावर मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना निवेदन दिले. याप्रसंगी प्रकाश लुणिया, महेश नामदे, शामराव वाघस्कर, अनिरुद्ध देशमुख, अमित काळे आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणी प्रश्‍न लवकर न सुटल्यास पुढील काळात पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल, अशा तीव्र भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.

     यावेळी महेश नामदे म्हणाले की, भिंगार भागातील सातही वार्डात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत नागरिकांनी, समाजसेवी संस्थांनी, विविध पक्षांनी याबाबत कॅन्टोंमेंट बोर्डाकडे सूचना, तक्रारी, निवेदने दिली परंतु पाणी वितरणाबाबत काहीही सुधारणा झालेली नाही. याबाबत संबंधितांना विचारपुस केल्यास पुरवठा अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना पाण्याबाबत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. तेव्हा आता आपणाच यात लक्ष घालून भिंगारचा पाणी प्रश्‍न सोडवावा, अशी आमची नागरिक व सर्व पक्षाच्यावतीने मागणी आहे. यापूर्वीही खा.सुजय विखे यांनी भिंगारमध्ये येऊन पाणी प्रश्‍नाबाबत बैठकही आयोजित केली होती. त्यानंतर हा प्रश्‍न त्यांनी संसदेतही उपस्थित केला होता. तरीही अद्याप कॅन्टोंमेंट बोर्डाकडून याबाबत काहीही सुधारणा झालेली नसल्याचे नामदे यांनी सांगितले.

     याप्रसंगी प्रकाश लुणिया म्हणाले, भिंगारच्या पाणी प्रश्‍नांबाबत कॅन्टोंमेंट बोर्डाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत, परंतु यात काही सुधारणा होत नाही. अधिकारीही प्रत्येकवेळी महानगरपालिका, एमआयडीसी येथूनच प्रॉब्लेम असल्याचे सांगतात. परंतु हा प्राब्लेम कधी मिटणार? याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकही पाहिजे ते सहकार्य करण्यास तयार आहेत. परंतु भिंगारचा प्रश्‍न मिटवा, अशी तीव्र भावना व्यक्त केली.

     यावेळी कॅन्टोंमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, पिण्याचे पाणी नियमित व पुरेशा दाबाने मिळावे. पाणी सोडण्यात काही तांत्रिक अडचण असल्यास त्याबाबत वर्तमान पत्र, लाऊडस्पिकर वरुन सूचना देण्यात याव्यात. पाणी सोडण्याची वेळ निश्‍चित असावी. पाण्याची लाईनची दुरुस्ती व्हावी. छावाणी परिषदेसाठी स्वतंत्र्य पाणी योजना राबविण्यात यावी, यासाठी बोर्डाने पुढाकार घ्यावा, आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.

     यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी शिष्टमंडळाशी बोलतांना सांगितले की, भिंगारला ज्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते, त्या प्रमाणात ते वितरित केले जाते. अजूनही पाण्याबाबत महानगरपालिका, जिल्हाधिकारी, एमआयडीसी कार्यालयातील वरिष्ठांशी चर्चा सुरु आहे. लवकरच यातून मार्ग काढू भिंगारच्या नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी वितरीत करण्याचा प्रयत्न असल्याचे शिष्टमंडळास सांगितले.

     यावेळी दत्ता खताडे, किशोर गोंधळे, संतोष धीवर, विजय भिंगारदिवे, निलेश फिरोदिया, सुरेश अंधारे, सनी भोसले, निर्मला बैद, पोपटराव नगरे, प्रदीप मुळे, संजय फुलारे, सुरेखा केदारे, सचिन नवगिरे, दत्तात्रय वराडे, गणेश भोसले, संदिप झोडगे आदिंसह ज्येष्ठ नागरिक संघ, जनआधार संघ, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, स्वयंसेवी संघटना आदिंचा या आंदोलनास पाठिंबा होता.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'लाली' चे २४ डिसेंबर रोजी कोलकत्ता येथील रंगयात्री राष्ट्रीय नाट्य महोत्सवात सादरीकरण

नगरच्या कला क्षेत्रातील शिरपेचात मानाचा तुरा

वेब टीम नगर : सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्ट' आणि 'तुमचं आमचं' प्रस्तुत 'लाली' हे कृष्णा यमुना विलास वाळके दिग्दर्शित नाटक पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथे होणाऱ्या आठव्या रंगयात्रा राष्ट्रीय नाट्य महोत्सवात गुरुवार दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गोबरदंगा नशा (कोलकत्ता) येथे सादर होणार असल्याची माहिती अभिनेता, लेखक, दिग्दर्शक कृष्णा वाळके यांनी दिली. 

कोलकत्ता येथील रंगयात्रा राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे हे आठवे वर्ष आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर रंगमंचावर सादर होणारं नगरमधील हे पहिलेच नाटक आहे. कोरोना महामारी व लॉक डाऊनच्या काळात नाट्यक्षेत्राला अस्थिरतेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र वर्ष अखेरीस का होईना रंगभूमीवर नाटक सादर करायला मिळतेय यासाठी लालीची संपूर्ण टीम उत्सुक आहे.

लाली या नाटकाला यापूर्वी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील अंतिम व महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकविलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक मानाचे व प्रतिष्ठेचे असे ४५ पारितोषिके मिळालेली आहेत. गेल्या २ वर्षांपासून लालीने रंगभूमी गाजविली आहे. नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या नाटकाचे कौतुक केले आहे. नागपुर येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात देखील 'लाली' हे नाटक सादर करण्याचा बहुमान मिळालेला आहे.  आणि आता हे नाटक महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून थेट कोलकत्ता येथे सादर होत आहे याचा लालीच्या संपूर्ण टीमला अभिमान आहे.

लाली या नाटकात संकेत जगदाळे किसण्याची भूमिका साकारत आहे. तर रेणुका ठोकळे ही आवलीची भूमिका साकारत आहे. योगीराज मोटे नाम्या तसेच ऋषभ कोंडावार अण्णाची भूमिका साकारत आहे. शुभम घोडके ने लाली ला पार्श्वसंगित दिले आहे. तर प्रकाश योजनेची जबाबदारी स्वतः कृष्णा वाळके पार पाडत आहे. नेपाथ्याची जबाबदारी अथर्व धर्माधिकारी, प्रिया तेलतुंबडे, योगीराज मोटे आणि ऋषभ कोंडावार हे पार पाडत आहे.

लाली या नाटकाचे लेखन, दिग्दर्शक, अभिनेते कृष्णा वाळके यांना नुकतेच शेवगाव नाट्य परिषदेच्या वतीने स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लालीच्या या अभुतपूर्व यशाबद्दल सर्व टीमचे सुनंदा सदाशिव अमरापूरकर, केतकी अमरापूरकर, रिमा अमरापूरकर, शेवगाव नाट्य पारिषदेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर व उपाध्यक्ष भगवान राऊत यांनी अभिनंदन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समता परिषदच्यावतीने ओबीसी आरक्षण बचावसाठीचा मोर्चा स्थगित : दत्ता जाधव

  वेब टीम  नगर - मराठा समाजाला आरक्षण देतांना विचार होतांना ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, अशी ग्वाही नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर राज्यभरात ओबीसींचे होणारे मोर्चे स्थगित करावेत, अशी आवाहन मंत्री ना.छगनराव भुजबळ यांनी केले असल्याचे दि.३० रोजीचा मोर्चा स्थगित करण्यात आली असल्याची माहिती समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी दिली.

     ओबीसींच्या आंदोलनासाठी नगर येथे नुकतीच राज्य सरचिटणीस अंबादास गारुडकर, पश्‍चिम विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, जि.प.सदस्य शरद झोडगे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रा.माणिकराव विधाते, अनिल बोरुडे यांच्या उपस्थितीत बैठक होऊन दि.३० रोजीच्या आंदोलनाची तयार सुरु करुन त्यांचे नियोजनही केले होते.

     याबाबत समता परिषदेचे संस्थापक तथा अन्न व पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांची मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याशी  विविध विषयांवर झालेल्या चर्चेनुसार ओबीसी आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट झाली आहे. त्यामुळे राज्यातील पुढील आंदोलने स्थगित करण्यात आले असल्याचे महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी खासदार समीर भुजबळ, माजी आ.पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी जाहीर केले आहे.

      अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये याबाबत राज्यभर रस्त्यावरचे मोर्चे व आंदोलने करुन आपली भुमिका शासनाकडे मांडली आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिकवेशनात मराठा आरक्षण देतांना ओबीसींसह कुठल्याही आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही, असे जाहीर केले आहे. या निर्णयाचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने स्वागत करण्यात येत असून, राज्य शासनाचे आभार मानले आहे.

     लोकसंख्येच्या प्रमाणात महाज्योती या संस्थेकरिता२५० कोटी इतका निधी देण्यात यावा. राज्य मागासवर्गीय आयोगावर प्रवर्गातीलच व्यक्तीची नेमणुक करावी, न्यायालयाच्या आधिन राहून अधिकारी व कर्मचार्‍यांना पदोन्नत्ती देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ३०००कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा. इतर मागासवर्गीय महामंडळाकरीता वाढीव निधी द्यावा. प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह सुरु करण्यात यावे. घरकुल योजना राबवावी, स्वतंत्र्य जनगणना, अनुषेशातील पदे भरण्यात यावीत.मराठा समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करु नये, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार होता.

     यावेळी संजय लोंढे, राम पानमळकर, मयुर ताठे, गणेश नन्नवरे, महेश झोडगे, गणेश बनकर, दिपक झोडगे, निखिल शेलार, दिपक खेडकर, अशोक तुपे, जालिंदर बोरुडे, पिंटू गायकवाड, अशोक दहिफळे, काका शेळके, गिरिष जाधव, सचिन गुलदगड, अमित खामकर, अजय औसरकर, विष्णू फुलसौंदर, हरिभाऊ डोळसे, परेश लोखंडे, दिपक कावळे आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याबाबतचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना भाजपाच्या वतीने निवेदन 

वेब टीम नगर : नगर जिल्हयात सध्या विविध तालुकामध्ये ग्रामपंचायत ,नगर पंचायत ,नगर पालिका इत्यादी निवडणुका चालू झालेले आहेत . तरी सर्व ठिकाणी कायदा व स्यव्यवस्था अबाधित राहणेसाठी सर गावामध्ये असलेल्या सराईत गुन्हेगार व अवैध व्यवसायात गुंतलेल्या व  गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गावामध्ये / तालुक्यामध्ये येण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे .जेणे करून सदर गावातील निवडणुका शांतताप्रिय मार्गाने पार पडतील असे निवेदन देऊन जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे ,युवराज पोटे ,शामराव पिपळे ,दिलीप भालसिंग ,गणेश भालसिंग ,सचिन भालसिंग ,अंबादास बोठे आदी उपिस्थत होते . 

पुढे बोलताना मुंढे म्हणाले कि अवैध व्यवसायिक ,गंभीर गुन्ह्यातील आरोपी ,गाव गुंड यांना जर वेळीच आवार न घातला तर निवडणुकांच्या काळामध्ये कायदा सुव्यस्थाचे प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे शांतता प्रिय निवडणुका होणासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संजय शिंदे यांनी  शिक्षकांची प्रतिष्ठा ,पत उंचावण्यासाठी कार्य केले

माजी मंत्री शिवाजी कर्डिले : विकास मंडळाच्या नेतेपदी संजय शिंदे यांची निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार

वेब टीम नगर  :  निस्वार्थ व पारदर्शक कामामुळे लोकनेतृत्व विकसीत होत असते. सर्वसामान्यांची कामे केल्यास पद आपोआप चालून येतात. संजय शिंदे यांनी शिक्षक बँक व गुरुमाऊली मंडळात निस्वार्थ भावनेने शिक्षकांची प्रतिष्ठा व पत उंचावण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्यात गोर-गरिबांचे काम करण्याची असलेली तळमळ पाहता राजकारणातील हा हिरा शैक्षणिक क्षेत्रातील राजकारणात चमकला आहे. रोहोकले गुरुजींचा आदर्श समोर ठेऊन त्यांनी प्राथमिक शिक्षक बँक व गुरुमाऊली मंडळाला ऊर्जित अवस्थेत आणण्याचे काम केले. याच कार्याची दखल घेत त्यांना अध्यक्षपदाची धुरा न मागता मिळाली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले.

भिंगार येथील वृंदावन लॉनमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळ व विकास मंडळाच्यावतीने संजय शिंदे यांची विकास मंडळाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री कर्डिले बोलत होते. शिक्षक परिषदेचे राज्यसंपर्क प्रमुख रावसाहेब रोहकले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाय, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, नाशिक विभाग कार्यवाह बाबासाहेब पवार,राहुल पानसरे, नागरदेवळे सरपंच राम पानमळकर, नगर तालुकाध्यक्ष संजय दळवी, संजय साठे, योगेश सुर्यवंशी, मंजुश्री औटी, गुरुमाऊली मंडळाचे नगर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाबळे, सरस्वती गुंड, विक्रम नरवडे,संतोष निमसे,अविनाश निंभोरे,राजेंद्र मुंगसे,दिलीप औताडे, संतोष अकोलकर, सविता पानमळकर, अनिता शिंदे, राजाभाऊ पासवे, विकास मंडळाचे सचिव मच्छिंद्र कोल्हे, मोहनराव राशिनकर तसेच शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात विकास डावखरे यांनी विकास मंडळाची विकासात्मक वाटचाल व लालटाकी येथे गुरुकुलच्या कोट्यावधी रुपयाची उभी राहत असलेल्या अद्यावत इमारतीची माहिती दिली. तर संजय शिंदे यांनी विकास मंडळ अध्यक्ष झाल्यानंतर कामाला शिस्त लाऊन संस्थेतील गैरकारभाराला लगाम लावल्याचे सांगितले. स्वागत संजय दळवी यांनी केले.

संजय शेळके म्हणाले की, प्राथमिक शिक्षकांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी शिंदे यांनी केलेले कार्य न विसरता येणारे आहे. बँकेला भोगवस्तू म्हणून पाहणार्या विरोधकांना त्यांनी लगाम लावले. त्यांच्या कारकिर्दित गुरुकुलचा कोट्यावधीचा प्रकल्प उभा राहत आहे. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. बाबासाहेब बोडखे यांनी कोरोनाच्या संकटकाळात प्राथमिक शिक्षकांचा प्रश्‍न उपस्थित करुन, ग्रामपंचायत व गावातील नेत्यांनी शैक्षणिक कामात हस्तक्षेप न करण्याचे आवाहन केले. भावी पिढी घडविणार्या शिक्षकांचा सन्मान मिळाला पाहिजे असे सांगितले.

रावसाहेब रोहकले म्हणाले की, नेतृत्व करणार्यांवर सर्व कार्यकर्ते जेंव्हा विश्‍वास टाकतात त्या नेत्यांचे काम देखील निस्वार्थपणे असले पाहिजे. अशा निस्वार्थ भावनेने शिंदे यांचे कार्याने त्यांना शिक्षक नेतेची जबाबदारी मिळाली आहे. शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधरण सभेतला गोंधळ थांबविण्यासाठी प्रयत्न करुन गुरुजींचा सन्मान वाढवला. अनेक योजना राबवून शिक्षकांमध्ये विश्‍वास निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना संजय शिंदे म्हणाले की, समाजकार्य करण्याची आवड असल्याने व शिक्षकांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी निस्वार्थ भावनेने कार्य केले. शिक्षकांच्या राजकारणात संयम बाळगून घेतलेल्या निर्णयाची अनेक अडचणींवर मात करीत अंमलबजावणी केली. शिक्षक बँकेत व गुरूमाऊली मंडळात कार्य करताना माजी मंत्री कर्डिले व रोहोकले गुरुजी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पोटे यांनी केले. आभार बाबा पवार यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिव्यांग कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रभावी अशी नियमावली जाहीर करावी 


महापुरे : सावली दिव्यांग संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी घेतली लोणीच्या पिडीत दिव्यांग महिलेची भेट

वेब टीम नगर : सावली दिव्यांग संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी लोणी (ता. राहता) येथे एका दिव्यांग महिलेवर अत्याचार झाला असता पिडीत महिलेची भेट घेऊन सदर प्रकरणी चर्चा केली. पिडीत महिलेने आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्याकडून जिवीतास धोका असल्याची भिती व्यक्त केली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर शिक्षा होण्यासाठी व पिडीतेला न्याय मिळण्याकरिता पाठपुरावा करण्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. यावेळी सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, उपाध्यक्ष चांद शेख, बाहुबली वायकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

लोणी येथे दिव्यांग महिला एकटी राहत असल्याचा फायदा घेऊन आरोपी पोपट उर्फ पप्पू शिंदे याने दि.६ डिसेंबर रोजी रात्री घरात घुसून दिव्यांग महिलेवर अत्याचार केला. पिडीत महिला घाबरलेल्या मनस्थितीमध्ये असल्याने तीने तक्रार दाखल केली नाही. मात्र १८ डिसेंबरला पुन्हा आरोपीने अत्याचाराचा प्रयत्न केला असता सदर दिव्यांग महिलेने अत्याचार झाल्याची लोणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला. सदर आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला पोलीसांनी अटक केली. दिव्यांग अधिनियम २०१६ चे कलम ९२ नुसार आरोपीवर वाढीव कलम लावून दिव्यांग महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सावली दिव्यांग संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी तपास अधिकारी सुर्यवंशी यांच्याशी चर्चा करुन दिव्यांग महिलेला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. दिव्यांग महिलेला न्याय मिळण्यासाठी सावली दिव्यांग संस्था पिडीत महिलेच्या मागे उभी असून, आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ : बाबासाहेब महापुरे

महिला अत्याचाराच्या घटनेत दिवसंदिवस वाढ होत असताना, त्यामध्ये दिव्यांग महिलांवरही अत्याचार होत आहे. शासनाने दिव्यांग कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी अशी नियमावली जाहीर करावी. ज्यामुळे दिव्यांगांना एक प्रकारे संरक्षण मिळेल.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हरित केडगाव मोहिमेतंर्गत माधवनगर परिसरात वृक्षरोपण

केडगाव जागृकनागरिक मंच : वृक्षरोपणाने संस्थेचा स्थापना दिन साजरा

वेब टीम नगर : एकच ध्यास हरित विकास हा मंत्र घेऊन केडगाव जागृकनागरिक मंचच्या वतीने हरित केडगाव ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत संस्थेचा स्थापना दिवस वृक्षरोपणाने साजरा करण्यात आला.  माधवनगर परिसरात वृक्षरोपण अभियान राबवून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी राहणार्‍या नागरिकांकडे सोपविण्यात आली.  

केडगाव जागृकनागरिक मंचच्या वतीने जून महिन्यापासून हरित केडगांव ही मोहीम राबविण्यात आली आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रोपे लाऊन त्याचे संवर्धन करण्यात आले. मंचातर्फे दर रविवारी प्रत्येक कॉलीनीत वैयक्तिक जबाबदारी देत वृक्षारोपण अविरत चालू ठेवण्यात आले आहे. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे. वृक्षारोपणाचे महत्व लहानग्यांपासून ज्येष्ठ व्यक्तींना देखील वृक्षरोपण व संवर्धनाचे महत्त्व पटले आहे.

संस्थेचे अध्यक्ष विशाल पाचारणे  म्हणाले  की, एकमेव निसर्ग मनुष्याची गरज पूर्ण करू शकतो. मात्र स्वत:च्या हव्यासापोटी मनुष्याने निसर्गाचे नुकसान केले आहे. निसर्ग संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असून, या भावनेने केडगाव जागृक नागरिक मंचने हरित केडगाव ही संकल्पना राबवली. लोकांच्या सहभागामुळे ही मोहीम व्यापक बनली असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेतंर्गत माधवनगर भागात वड, पिंपळ, कडूलिंब व अशोका सारखी झाडे लावण्यात आली. येथील प्रत्येक रहिवासी नागरिकाला झाडाची वैयक्तिक संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी रामभाऊ पवार, मेजर सतीश ठुबे, प्रकाश पाटसकर, माधव कुलकर्णी, गणपत वाघमोडे, मेजर मंजाबापू गुंजाळ, दादाभाऊ बोरकर, नारायण गाडेकर, रमेश उरमुडे, संस्थेचे गणेश पाडळे, प्रवीण पाटसकर, अनिल मरकड, शारदाताई शिरसाठ, विशाल सकट, गणेश लोळगे, पुनम तानवडे, अंबिका कंकाळ, डॉ.सुहास साळवे आदिंसह संस्थेचे सर्व प्रतिनिधी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने

शेतकरी संरक्षण कायदा केंद्र सरकारने मंजूर करून अमलात आणा 

रेल्वे मंत्री गोयल यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे माजी खासदार गांधी यांचे आश्‍वासन

वेब टीम नगर : देशातील शेतकर्‍यांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळण्यासाठी शेतकरी संरक्षण कायदा केंद्र सरकारने मंजूर करून अमलात आणावा या प्रमुख मागणीसाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाईन यांच्या पुढाकाराने शेतकरी आसूडसभेची स्थापना करण्याचा प्रस्ताव हुतात्मा स्मारकात मांडण्यात आला. तर नगर-पुणे खाजगी लोकल रेल्वे सुरु करण्याचा आग्रह धरुन शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर विश्‍वमानव मंदिर म्हणून गॅझेट प्रसिध्द करण्यात आले. तसेच पंचायतराज निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्यबोधी सुर्यनामा करुन मतदारांची जागृती करण्यात आली.

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी व सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, प्रदिप झरेकर, सुनंदा टिपरे, शिवाजी वाघमारे, संतोष लोंढे, सुशिला देशमुख, अंबिका जाधव, लतिका पाडळे, फरिदा शेख, शारदा भालेकर, उषा निमसे, किशोर मुळे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भारत हा खेड्यांचा देश आहे. खेडे विकसीत होण्यासाठी शेतकर्‍यांचा विकास हा महत्त्वाचा आहे. शेतकरींच्या आत्महत्या वाढत असताना त्यांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळणे अपेक्षित आहे. यासाठी शेतकरी संरक्षण कायदा सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेतकर्‍यांचा आसूड या विचारांवर आधारित शेतकरी आसूड सभेची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. साईबाबांनी सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन मानवतेची शिकवण दिली. त्यांची शिकवण ही सर्व धर्मांचा गाभा आहे. या देशाचे अखंडत्व व धार्मिक ऐक्य जपण्यासाठी त्यांचे विचार व शिकवण दिशादर्शक असल्याने शिर्डी येथील त्यांचे मंदिर विश्‍वमानव मंदिर असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तर पंचायतराजच्या निवडणुकीत चांगले उमेदवार मताचे पैसे न घेता निवडून दिल्यास गावाचा विकास साधला जाणार असल्याचे स्पष्ट करुन चारित्र्यसंपन्न उमेदवारांना निवडून भ्रष्ट उमेदवारांना पाडण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मतंकोंबाड मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी म्हणाले की, नगर-पुणे खाजगी लोकल रेल्वे सुरू झाल्यास नगर शहराचा झपाट्याने विकास होणार आहे. येथील उद्योगधंद्यांना चालना मिळून पुण्यात देखील नगरच्या युवकांना रोजगार सहज प्राप्त होणार आहे. ही दोन शहरे लोकल रेल्वेनी जोडण्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. नवीन वर्षाची भेट म्हणून नगरकरांना देण्यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. तर केंद्र सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याचे सांगितले. अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी शिर्डी येथे देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. दक्षिण भारतातून येणार्‍या भाविकांची सोय होण्यासाठी व नगरच्या विकासाला चालना मिळण्यासाठी ही लोकल रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले.

अर्शद शेख म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार शेतकर्‍यांना गुलाम बनविणारे कायदे आणत आहे. एसीमध्ये बसणार्‍या मंत्र्यांना शेतकर्‍यांची जाण नाही. शेतकरी कायदे चांगले किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार शेतकर्‍यांना आहे. शेतकरी नवीन कृषी कायद्यांना विरोध करीत असून ते त्वरित रद्द करण्याचे त्यांनी सांगितले व पंचायतराजच्या निवडणुकीत शेतकरी विरोधी धोरण घेणार्‍यांना व भ्रष्ट कारभार करणार्‍यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अ‍ॅड. सुधीर पिसे यांच्या निधनाने  समाज एका  अष्टपैलू व्यक्तीमत्वाला मुकला 


श्रीकांत मांढरे :  नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पिसे यांना श्रध्दांजली

वेब टीम नगर : शहरातील नामदेव शिंपी समाजाच्या वतीने शहरातील डावरे गल्ली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पिसे यांच्या निधनाच्या पार्श्‍वभूमीवर शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पिसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

यावेळी शहर शिंपी समाजाचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे, भिंगार शिंपी समाजाचे अध्यक्ष शैलेश धोकटे, शिंदे मळा शिंपी समाजाचे सुरेश लोळगे, सुरेश चुटके, कैलास गुजर, ज्ञानेश्‍वर कविटकर, महेश गिते, दिलीप गिते, विलास गिते आदी समाजबांधव उपस्थित होते.

अ‍ॅड. सुधीर पिसे यांच्या निधनाने नामदेव शिंपी समाज एक उत्तम व अष्टपैलू व्यक्तीमत्वाला मुकला. त्यांच्या निधनाने समाजाची न भरून येणारी हानी झाली आहे. पिसे कुटुंबीयांच्या दुखात सर्व समाजबांधव सहभागी असल्याचे श्रीकांत मांढरे यांनी सांगितले. शैलेश धोकटे, कैलास गुजर, ज्ञानेश्‍वर कविटकर यांनी अ‍ॅड. सुधीर पिसे यांच्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ठिकठिकाणी वर्चुअल पध्दतीने त्यांना श्रध्दांजली वाहून शोक सभेत समाजबांधवांनी सहभाग नोंदवला. तसेच यावेळी २०२० मध्ये नामदेव शिंपी समाजातील निधन झालेल्या दिवंगत बंधू-भगिनींना श्रध्दांजली वाहण्यात आली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 अल्पसंख्यांक समाजाला,शेतकर्‍यांना गुलाम बनविण्याचे कारस्थान मोदी सरकार करीत आहे 

सुशांत म्हस्के : मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजातील युवकांचा आरपीआयमध्ये प्रवेश

वेब टीम नगर :  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात (गवई गट) विविध पक्षातील मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजातील युवकांनी प्रवेश केला. तसेच आरपीआयच्या शहर उपाध्यक्षपदी जावेद सय्यद तसेच आरपीआय अल्पसंख्यांक विभागाच्या शहर प्रवक्तापदी जमीर इनामदार व उपाध्यक्षपदी अरबाज शेख यांची नियुक्ती करण्यात आली. आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी नुतन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देऊन युवकांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आरपीआयचे कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, मुस्लिम विकास परिषदचे दानिश जहागीरदार उपस्थित होते.  

यावेळी ऋषी विधाते, मिलिंद शिंदे, जावेद पटेल यांनी आपल्या मित्रांसह आरपीआय मध्ये प्रवेश केला. यावेळी प्रविण वाघमारे, महेश फरताळे, शफिक मोघल, सागर विधाते, शिवम साठे, कार्तिक भिंगारदिवे, कुणाल म्हस्के, आनंद जगताप, प्रतिक विधाते, अ‍ॅड. नुमेर शेख, सलमान सय्यद, फुरकान शेख, दानिश इनामदार, अरबाज शेख, अफ्फान शेख आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुशांत म्हस्के म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सर्व समाजातील युवकांना संधी देण्यात येत आहे. देशाचे राजकारण जातीयवादी बनले असून, जातीयवादाला थोपावण्यासाठी आरपीआयच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचे काम चालू आहे. अल्पसंख्यांक समाजाला व शेतकर्‍यांना गुलाम बनविण्याचे कारस्थान मोदी सरकार करीत आहे.  फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने पक्ष आपली वाटचाल करीत आहे. मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजाला प्रवाहात आनण्यासाठी आरपीआय कटिबध्द असून, प्रत्येक प्रभागात शाखा उघडणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे रक्तदान

सामाजिक जाणीव ठेऊन युवकांनी रक्तदान करण्याची गरज -आमदार संग्राम जगताप

वेब टीम नगर - राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये एकच दिवस पुरेल एवढा रक्तसाठा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, पालकमंत्री हसन मुश्रीफ व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये 81 युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अविनाश घुले, संजय चोपडा, विनीत पाऊलबुद्धे, प्रकाश भागानगरे, संपत बारस्कर, अमोल गाडे, सुनील त्रिंबके, विजय गव्हाळे, प्रा.माणिक विधाते, रेशमा आठरे, अंजली आव्हाड, साधनाताई बोरुडे, साहेबान जाहागीरदार, सुमित कुलकर्णी, गजेंद्र भांडवलकर, निलेश बांगरे, विपुल वाखुरे, दिपक खेडकर, ऋषिकेश ताठे, रुपेश चोपडा, नितीन लिगडे, गजेंद्र दांगट, राजू कोकणे, राम पिंपळे, संजू खताडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.        

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, रक्तासाठी मनुष्य मनुष्यावरच अवलंबून आहे. कोरोनाच्या संकटकाळात राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला. हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. प्रत्येक समाजातील युवकांनी सामाजिक जाणीव ठेऊन रक्तदान करण्याची गरज आहे. कोरोना काळाच्या टाळेबंदीत ज्यावेळेस नागरिकांना घराच्या बाहेर निघायला बंदी होती. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा रुग्णालयात जाऊन स्वयंफुर्तीने रक्तदान केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी घेतलेला सामाजिक कार्याचे कौतुक करुन युवकांना रक्तदानाचे आवाहन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समाज घडविणार्‍या शिक्षकांची मुले देखील विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे 

बाबासाहेब बोडखे : वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेतून बीडीएससाठी निवड झाल्याबद्दल ऋतुजा थोरात हिचा गौरव

वेब टीम नगर : वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेतून ऋतुजा सोमनाथ थोरात या विद्यार्थिनीची लोणी येथील प्रवरा मेडीकल कॉलेजला बीडीएससाठी निवड झाल्याबद्दल तीचा गौरव करण्यात आला. शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे व माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव आप्पासाहेब शिंदे यांनी थोरात हिचा सत्कार केला. यावेळी जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, दिलीप डोंगरे, मुख्याध्यापक कानवडे सर, उमेश गुंजाळ, जेष्ठ मार्गदर्शक मारुती लांडगे, भाऊसाहेब थोटे, सोमनाथ थोरात आदि उपस्थित होते.  

अध्यापक असलेले सोमनाथ थोरात यांची ऋतुजा ही कन्या असून, नुकतेच तिने हे यश संपादन केले आहे. समाज घडविण्याचे कार्य करणार्‍या शिक्षकांची मुले देखील विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. अशा गुणवंत मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले. आप्पासाहेब शिंदे यांनी ऋतुजा थोरात हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षक व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने हे यश प्राप्त केले असून, सामाजिक भावनेने गोर-गरीबांची सेवा करण्यासाठी वैद्यकिय क्षेत्र निवडल्याचे ऋतुजा थोरात हिने सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कृषी कायदे चांगले किंवा वाईट हा ठरविण्याचा अधिकार शेतकर्‍यांना

वाळकीच्या शेतकरी मेळाव्यात शेतकरी विरोधी नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी
शेतकर्‍यांची मोफत नेत्र तपासणी

वेब टीम नगर :  नगर तालुक्यातील वाळकी येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शेतकर्‍यांचे विविध प्रश्‍न मांडून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा व्यक्त करुन तातडीने शेतकरी विरोधी असलेले नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तर कृषी कायदे चांगले किंवा वाईट हा ठरविण्याचा अधिकार शेतकर्‍यांना असल्याचे जाहीर करण्यात आले. तर पंचक्रोशीतील ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली.  

शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाळासाहेब सावळेराम बोठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, कार्यक्रमाचे आयोजक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज भालसिंग, कैलास कुलकर्णी, सभापती अभिलाष घिगे, एन.डी. कासार, सरपंच शरद बोठे, ग्रामपंचायत सदस्य किशोर भालसिंग आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वाळकी येथील आरोग्य अधिकारी डॉ. अनिल ससाणे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोरोनायोध्दा सन्मान प्रदान करण्यात आला. बाळासाहेब सावळेराम बोठे म्हणाले की, शेतकर्‍यांना वीज व पाण्याची आवश्यकता भासते. पाऊस चांगला झाल्या असल्याने पाण्याची कमतरता नाही. मात्र वीज पुरेश्याप्रमाणात मिळण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तर दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची भूमिका विशद करुन केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदवला. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष हा नेहमीच शेतकर्‍यांच्या पाठिशी उभा राहिलेला आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकर्‍यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. आज शेतकरी न्याय हक्कासाठी भांडत असताना त्यांच्या हिताचे निर्णय होणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष मनोज भालसिंग यांनी शेतकर्‍यांचा मेळावा घेऊन व त्यांच्या आरोग्याप्रती घेतलेली काळजी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यात आनंदऋषी नेत्रालय यांच्या सहकार्याने शेतकर्‍यांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबीराला शेतकर्‍यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल भालसिंग यांनी केले. प्रास्ताविक संदिप भालसिंग यांनी केले. आभार मनोज भालसिंग यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुलाचा खून करणार्‍या मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी  

वाळकी खून प्रकरण :  आईने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
 तपास स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) कडे देण्याची मागणी

वेब टीम नगर : काही दिवसापुर्वी वाळकी (ता. नगर) येथे ओमकार भालसिंग याच्यावर खूनी हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक होण्यासाठी मयत मुलाची आई लता बाबासाहेब भालसिंग यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन म्हणाले की नगर तालुका पोलीस स्टेशन हे नीट तपास न करता आरोपीला पाठीशी घालत असून ह्या घटनेचा संपूर्ण तपास स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे देण्यात यावे व आरोपी हा मोबाईल व्हाट्सअपवर त्याचे स्वतःचे स्टेटस ठेवत आहे तरीदेखील पोलिसांना मुख्य आरोपी मिळत नाही त्यामुळे हा तपास एलसीबी वर्ग करण्याची मागणी मुलाच्या आईने केली आहे. वाळकी (ता. नगर) येथील लताबाई बाबासाहेब भालसिंग यांचा मुलगा ओंकार बाबासाहेब भालसिंग (वय २१) याला काही दिवसांपूर्वी विश्‍वजीत रमेश कासार यांने बळजबरीने गाडीत घालून, लोखंडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये ओमकार गंभीर जखमी झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी आरोपी असलेला विश्‍वजीत रमेश कासार याच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्यापि आरोपी फरार असून, नगर तालुका पोलीसांनी त्याला अटक केलेली नाही. त्यामुळे ह्या घटनेचा संपूर्ण तपास एलसीबी स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशी मागणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

काँग्रेस पक्षात महिलांना सन्मानाची वागणूक 

किरण काळे : कौसर खान यांच्यासह अनेक महिलांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

वेब टीम नगर : काँग्रेस पक्षामध्ये महिलांना सन्मानाची वागणूक दिली जाते. ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या सोनिया गांधी यांच्या निमित्ताने महिला आहेत त्या पक्षाकडे महिलांचा ओढा अधिक असणे स्वाभाविक बाब आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

कौसर खान यांच्यासह अनेक महिलांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी काळे बोलत होते. निजामभाई जहागीरदार, सेवादलाचे अध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, डॉ.रिजवान अहमद यांच्या विशेष पुढाकारातून प्रवेश सोहळ्याचे आयोजन काँग्रेस कमिटीमध्ये करण्यात आले होते. 

यावेळी कौसर खान यांच्यासह शाहीन बागवान, अनुराधा भंडारे, यास्मिन शेख, शबाना शेख, सुरैय्या शेख, रुबीना बागवान, उमा छजलानी, जिलेदा शेख आदींसह अनेक महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी त्यांचे यावेळी पक्षात स्वागत केले. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये महिलांना योग्य ती संधी देण्याचे काम निश्चितपणे केले जाईल, असे यावेळी काळे म्हणाले. 

दीप चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाला १३५ वर्षांची परंपरा आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी या सारख्या सक्षम महिलांनी पक्षाचे नेतृत्व केले आहे. ज्येष्ठ नेते निजामभाई जहागीरदार म्हणाले की, काँग्रेसने प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या एका महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी देत महिलांचा बहुमान या देशामध्ये केला आहे. 

सेवादल अध्यक्ष डॉ. मनोज लोंढे म्हणाले की, सेवादलाच्या माध्यमातून महिलांना ताकद देण्याचे काम पक्षाच्यावतीने केले जाईल. डॉ. दिलीप बागल म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा  सर्वसमावेशक विचारधारेवरती चालणारा महिलांना येथे काम करण्यासाठी मोठी संधी आहे. 

दिप चव्हाण यांची राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षाच्यावतीने निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. 

अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, प्रा. डॉ. बापूसाहेब चंदनशिवे, शिक्षक काँग्रेसचे प्रसाद शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रशांत जाधव, शरीफ सय्यद, शेख सलीम, सेवादलाच्या वैशालीताई दालवाले, महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, निताताई बर्वे, नलिनीताई गायकवाड, उषाकिरण चव्हाण, सचिन पठारे, रमेश ननावरे, बाळासाहेब साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------



Post a Comment

0 Comments