नगर बुलेटीन ३१-१२-२०२०

 नगर बुलेटीन ३१-१२-२०२०

माहितीपर दिनदर्शिका प्रत्येकाला उपयुक्त 

योगेश मालपाणी : माहेश्‍वरी युवा संघटनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

    वेब टीम  नगर : आपले दैनंदिन कामकाज हे दिनदर्शिकेवर अवलंबून असते. वर्षभराचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा उपयोग होत असल्याने दिनदर्शिका ही महत्वाची आहे. वर्षभरातील सण, उत्सव, राष्ट्रीय सण, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीची माहिती ही दिनदर्शिकेतून होत असते. विशेषत: महिलांचा दिवस हा दिनदर्शिका पाहूनच होत असतो. व्रत-वैकल्य आणि त्याची माहितीवरुन नियोजन ठरत असते. अशी कुटूंबातील प्रत्येक सदस्यांची गरज दिनदर्शिका असते. संस्थेने विविध सामाजिक कार्याबरोबरच दिनदर्शिकेचा उपक्रम हा प्रत्येकाला उपयुक्त असाचा आहे, असे प्रतिपादन योगेश मालपाणी यांनी केले.

     माहेश्‍वरी युवा संघटनच्यावतीने २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अतुल डागा, मनिष सोमाणी, योगेश मालपाणी, अमित काबरा, अध्यक्ष विशाल झंवर आदिंच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष शाम भुतडा, गणेश लढ्ढा, सचिव शेखर आसवा, खजिनदार अनिकेत बलदवा, सहसचिव गोविंद दरक, अमित काबरा, संघटनमंत्री पवन बिहाणी, क्रिडा मंत्री मुकुंद जाखोटीया, आयटी हेड गोविंद जाखोटिया, नियोजन समिती अमित जाखोडिया, संकेत मानधना, पवन बंग, उमेश झंवर, सिद्धार्थ झंवर, सुमित बिहाणी, सुमित चांडक, प्रतिक सारडा, कुणाल लोया, योगेश सोमाणी, पियुष झंवर,  राहुल सोनी, संकेत अट्टल आदि उपस्थित होते.

          याप्रसंगी अध्यक्ष विशाल झंवर म्हणाले, माहेश्‍वरी युवा संघटनेच्यावतीने  रक्तदान, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना वाटप, क्रिकेट स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच युवकांचे संघटन करुन त्यांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे. समाजातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या वर्षी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आले असून ही सर्वसमावेश दिनदर्शिका असून, विशेषत: माहेश्‍वरी समाजातील विविध सन, उत्सव व महत्वांच्या घटनांचा उल्लेख केलेला आहे. तसेच संघटनेच्यावतीने वर्षभर राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका सर्वांना भावेल, असा विश्‍वास झंवर यांनी व्यक्त केला.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शेखर आसावा यांनी केले तर प्रतिक सारडा, पवन बिहाणी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माळीवाड्यात श्रीदत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

    वेब टीम  नगर : माळीवाडा, कौठीची तालिम चौकातील दत्त मंदिरमध्ये श्री दत्तजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेविका मंगलताई लोखंडे,  सुलोचना ताठे, प्रांजल लोखंडे, कुसूम रासकर, स्वाती रासकर, सुवर्णा रासकर, प्रतिभा एकाडे, अलका गाडळकर, गायत्री एकाडे, कविता गाडळकर, मीना शिंदे, शितल एकाडे, हर्षली भुमकर, वंदना दरे, बेबी भुमकर, पटवेकर, आदिंसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

     दत्तात्रेय जन्मोत्सवानिमित्त मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे लघुद्राभिषेक, दुपारी आरती करण्यात येऊन सायंकाळी७ वाजता भगवान दत्तात्रय यांची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणागीत गाऊन जन्मोत्सव साजरा केला. यावेळी मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई, सुमधूर भक्तीगीतांमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.  कार्यक्रमाचे पौराहित्य मुळे गुरुजी यांनी केले.

     याप्रसंगी नगरसेविका मंगलताई लोखंडे म्हणाल्या, दरवर्षी भगवान दत्तात्रेय जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमात परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर यंदा हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जाधव परिवाराने नावाप्रमाणेच नंदनवन फुलविले : अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर

    वेब टीम  नगर : धार्मिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, शेती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात जाधव परिवाराने आपल्या कौशल्याने वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा विविध क्षेत्रात काम करतांना माणुसकी, सामाजिकता सांभाळून  या समुहात काम करणार्‍या व्यक्तींच्या सुख-दु:खात सहभागी होऊन त्यांना मायेचा आधार दिला आहे. एवढामोठा परिवार नंदनवन ग्रुपच्या एका छताखाली आणून नावाप्रमाणेच नंदनवन फुलविले आहे.  असे प्रतिपादन तुझं माझं जमतयं या मालिकेतील पम्मी फेम अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर यांनी  केले.

     अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर यांनी नंदनवन गु्रपच्या हॉटेल पॅरेडाईजला सदिच्छा भेट दिली असता यांच्याशी नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्याशी चर्चा करुन सत्कार केला. याप्रसंगी समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, मानसी जाधव, हेमंत जाधव, राज जाधव, गगन शिंदे, विशाल गायकवाड आदि उपस्थित होते.

     यावेळी सुवर्णा जाधव म्हणाल्या, नंदनवन ग्रुपच्यावतीने विविध क्षेत्रात काम करतांना सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्या माध्यमातून अनेक लोक जोडले गेले आहेत. अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर यांनी झी टॉकीजवर सुरु असलेल्या तुझं माझं जमतं या मालिकेत महत्वपूर्ण व चांगली भुमिका साकारली आहे. त्या अभिनेत्रीबरोबरच एक चांगल्या अभ्यासू व्यक्ती असून, भविष्यात त्या आणखी यशस्वी होतील, अशा शुभेच्छा दिल्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 सावित्री-फातिमा पुरस्कार जाहीर

छायाताई फिरोदिया, शारदाताई पोखरकर, सत्यभामा शिंदे, डॉ. निशात शेख, मनीषाताई बनकर ठरल्या मानकरी 

   वेब टीम नगर- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस हा सावित्री उत्सव म्हणून साजरा होत आहे. या निमित्ताने विचारधारा व मातृसंघटना राष्ट्र सेवा दल व जिज्ञासा अकादमीच्या वतीने देण्यात येणारा सावित्री-फातिमा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात समर्पित होऊन कार्य करणार्‍या छायाताई फिरोदिया, शारदाताई पोखरकर, सत्यभामा शिंदे, डॉ. निशात शेख, मनीषाताई बनकर यांना जाहीर झाल्याची माहिती सावित्री उत्सवाचे स्वागताध्यक्ष अविनाश घुले व विचारधाराचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले यांनी  दिली.

     आजच्या स्त्रियाप्रगल्भ आणि प्रगतशील दिसत आहेत त्याचे मूळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात बहुजनांच्या शिक्षणासाठी ज्या खस्ता खाल्या अंगावर शेण दगड झेलल्या, मनाला बोचणार्‍या शिव्याशाप खाल्या तरी मुलींनी शिकावे, बहुजनांनी शिकावेत्यांनी प्रगल्भ व्हावे म्हणून झटल्या, त्यासाठी अपर मेहनत घेतली म्हणून आज स्त्रियांनी घरातील माजघरा पासून ते आकाशातील विमान उडाण करण्यापर्यंत मजल गाठली व सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून मुख्याद्यापिका म्हणून साथ देणार्‍या फातिमा शेख यांच्या व सवित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सावित्री उत्सव व पुरस्कार सुरु करण्यात आला.

     पुरस्कारार्थी छायाताई फिरोदिया या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह आहेत. हे पद गेली अनेक वर्ष सक्षमपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेमध्ये अनेक नवनवीन उपक्रम केल्या जातात.  विद्यार्थी सर्वांगाने प्रगल्भ व्हावा यासाठी त्या कार्यरत आहेत. आनंद विद्यालयाच्या मुख्याद्यापिका व राष्ट्र सेवा दलाच्या सक्रीय सभासद असलेल्या शारदाताई पोखरकर यांनी विद्यालयात नेहेमीचे उपक्रम तर केलेच विध्यार्थ्यांसाठी विविध विषयावर वेगवेगळे वक्ते बोलावून त्यांनी पौगंड वयाच्या मुलांच्या मनातील अनेक प्रश्‍नांना उत्तरे मिळतील असे पाहिले. सत्यभामा शिंदे या नवनागपूर येथील स्वामी विवेकानंद माध्य. विद्यालयात मुख्याद्यापिका म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत शिस्तप्रिय प्रशासक म्हणून त्यांचा नामोल्लेख होतो. आसपासच्या शहरी ग्रामीण मुलांना मुलींना शिक्षणासाठी जे जे उपलब्ध करून देतात येईल ते ते उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नात त्या असतात. डॉ. निशात शेख या यशवंत माध्यमिक विद्यालय मुकुंदनगर येथे ज्येष्ठ शिक्षिका आहेत. त्या मराठी माध्यमिक विभागमधून अहमदनगर जिल्हयातील पहिल्या  डॉक्टरेट शिक्षिका आहेत. त्यांनी ‘डॉ. शशिप्रभा शास्त्री के उपन्यासों का  समीक्षात्मक अध्ययन’ या विषयावर   पुणे  विद्यापीठ 2007 साली आपला  थिसिस सादर करून हा बहुमान मिळवला आहे. मनीषाताई बनकर या महात्मा फुले एज्युकेशन सोसा. च्या सखाराम मेहेत्रे प्राथ. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत. प्राथमिक विद्यालयातील मुला-मुलींना आनंदायी शिक्षण मिळावे म्हणून नवनवे प्रयोग त्यांनी केले. आणि त्यांचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा, स्पर्धा यात राज्यभर गाजलेले आहेत. या पाचजनी आपपल्या क्षेत्रात अत्यंत समर्पित भावनेने कार्यरत आहेत. यांना पुरस्कार जाहीर करताना आम्हाला मनस्वी आनंदहोत आहे असेही स्वागताध्यक्ष अविनाश घुले यांनी म्हंटले आहे.

     येत्या ३जानेवारी २०२१ ला सावित्री उत्सवात  या पुरस्काराचे वितरण प्रमुख अतिथींच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती जिज्ञासा अकादमीच्या संचालिक संगीता गाडेकर, पियुष मंडलेचा, श्रीकांत वंगारी, शिवानी शिंगवी यांनी दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------Post a Comment

0 Comments