मटका,सोरट जुगार अड्ड्यावर छापा

 मटका,सोरट जुगार अड्ड्यावर छापा  

 ३४,१९०० रु. चा मुद्देमाल जप्त

वेब टीम नगर : दि.३०/१२/२०२० रोजी पावणे तीन च्या दरम्यान पाईपलाईनरोड वरील एकविरा चौक वस स्टॉपच्या पाठीमागे आडोशाला असलेल्या कल्याण मटका व पप्पू प्लेईंग पिक्सरचे सोरट जुगार अडयावर छापा टाकुन एकुण ३ आरोपी ताब्यात घेवुन रोख रक्कम,मोबाईल,सोरट जुगाराचे साहित्य असा एकुण- ३४,१००/- रुपयेचा मुद्देमाल ताव्यात घेण्यात आला आहे.

वरील मुद्देमाल जप्त करुन आरोपी १)अशोक सुखदेव देवकाते वय-२७ रा.पाईंपलाईन हडको, २)अर्जुन सुरेश जंगम वय-३२ रा. पवन नगर अहमदनगर, ३)गंगाराम तात्याबा पवार वय-३८ रा गजराजनगर अहमदनगर यांचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई  मनोज पाटील पोलोस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली  विशाल शरद ढुमे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, अहमदनगर, पोना/२२२२ बाबासाहेब भानुदास फसले, पोना/१६१६ सचिन महादेव जाधव, पोशि/८३९ बाबासाहेब मासाळकर, पोशि/१२८४ राजेंद्र जायभाय सर्व नेमणुक-उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग , अहमदनगर यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments