नगर बुलेटीन २८-१२-२०२०

 नगर बुलेटीन २८-१२-२०२०

ना.विजय वडेट्टीवार यांची श्री विशाल गणेश मंदिरास भेट

    वेब टीम नगर :  नगरमध्ये आल्यावर अनेकांकडून नगरच्या जागृत देवस्थानाबद्दल ऐकून होता. आज या ठिकाणी दर्शनाचा योग आला. भव्य श्री गणेशाची मुर्ती व आकर्षक मंदिरामुळे अगदी प्रसन्न वाटते. प्रत्येक शहराची ओळख ही तेथील ग्रामदैवतेमुळे होत असते. मंदिराच्यावतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे. या देवस्थानच्या विकाससाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करु. त्यातून मंदिर परिसर आणखी सुशोभित होऊन भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केले.

     शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास ना. विजय वडेट्टवार यांनी भेट दिली असता, त्यांचा देवस्थानच्यावतीने अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, पुजारी संगमनाथ महाराज, विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, तुषार पोटे, हरिभाऊ डोळसे, अर्जुन बोरुडे, आनंद लहामगे, श्याम व्यवहारे, शिल्पा दुसुंगे आदि उपस्थित होते. यावेळी ना.वडेट्टीवार यांच्या हस्ते पुजा करुन आरती करण्यात आली.

     याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर यांनी मंदिराच्या विविधि उपक्रमांची व झालेल्या जिर्णोद्धार कामाची माहिती ना. वडेट्टीवार यांना दिली. या देवस्थानचा तिर्थक्षेत्र विकास योजनेतून विकास व्हावा. त्यातून भाविकांना आणखी सुविधा देताल. यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ओबीसी लढ्यात सक्रिय सहभाग देऊ 

 दिपक खेडकर : ना.विजय वडेट्टीवार यांना फुले ब्रिगेडच्यावतीने निवेदन

  वेब टीम  नगर : बहुजन विकास व मदत पुनवर्सन मंत्री ना.विजय वडेट्टीवार नगरमध्ये ओबीसी, व्ही.जे., एन.टी. जनमोर्चासाठी आले असता त्यांचे स्वागत करुन ओबीसीच्या प्रश्‍नांबाबतचे निवेदन फुले ब्रिगेडच्यावतीने शहराध्यक्ष दिपक खेडकर यांनी दिले. याप्रसंगी सारंग पंधाडे, किरण जावळे, प्रसाद बनकर, प्रसाद शिंदे, मळू गाडळकर, योगेश भुजबळ, संतोष हजारे, जालिंदर बोरुडे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी दिपक खेडकर म्हणाले, अनेक वर्षांपासून ओबीसी अनेक प्रश्‍न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी ना.विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या हक्कासाठी सुरु केलेल्या लढात आम्ही सक्रीय सहभाग देऊ. आज ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्‍न, उद्योजकांचे प्रश्‍न प्रलंबित असून, त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणासाठी 1965 व त्या आधीच्या जातीचे दाखले ग्राह्य धरावे,त्याच बरोबर३७० पेक्षा अधिक जातीमध्ये समन्वय घडून आणणे आणि ओबीसीची वज्रमुठ अधिक बळकट करणे. त्याचबरोबर ओबीसीची संघटन कायम करणे आदिंसाठी आम्ही आपणाबरोबर राहू, असे सांगितले.

     यावेळी ना.विजय वडेट्टीवार यांनी संघटनेच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. ओबीसींच्या प्रश्‍न सोडविण्याबाबत आपणही अग्रही असून, शासनाच्यावतीने ओबीसींसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा लाभ संबंधितांना मिळवून देण्यासाठी संघटनेने प्रयत्न करावेत. तसेच ओबीसींचे मजबूत संघटन करावे, असे आवाहन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हाशिक्षणाधिकार्‍यांना निसर्गप्रेमी पुरस्काराने निरोप..!

वेब टीम नगर : जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राच्या सहकार्याने दिनकर टेमकर जिल्हाशिक्षणाधिकारी असताना शाळा पातळींवर अनेक जिल्हास्तरीय निसर्गसंवर्धनात्मक उपक्रमांना सुरूवात झाली.या उपक्रमांची परंपरा पुढे रमाकांत काठमोरे यांनी तशीच सुरू ठेवुन अनेक नवीन जिल्हाव्यापी निसर्गसंवर्धन उपक्रमांचे आयोजन केले.यात जिल्हास्तरीय पक्षीगणना,फुलपाखरांचे सर्वेक्षण,रानफुलांचे सर्वेक्षण,उभयचर प्राणी सर्वेक्षण,बीज बॅंक,वृक्षारोपण,छायाचिञे प्रदर्शन,निसर्गसहली,राज्यफुलवृक्ष ताम्हण आपल्या दारी उपक्रम अशा कित्येक उपक्रमांमधुन शिक्षक व विद्यार्थ्यांनी निसर्गाशी जवळीकता साधली.पुस्तकी ज्ञानातुन बाहेर पडुन या उपक्रमांच्या माध्यमातुन सर्वांना प्रत्यक्ष अनुभव घेता आले.यातील अनेक उपक्रम संपुर्ण राज्याला दिशादर्शक ठरले असुन इतर जिल्ह्यात सुद्धा ते राबविण्यास सूरूवात होत आहे.उपक्रमांमधील वस्तुनिष्ठता टिकुन रहावी म्हणुन या उपक्रमांच्या आयोजनाबाबत कसलेही बंधन शाळेवर ठेवललेे नव्हते,आपल्या आवडी व सवडीने उपक्रमांमध्ये शाळांना सहभागी होण्याची मुभा असल्याने अनेक शाळा,शिक्षक व विद्यार्थ्यांनी यात आनंदाने सहभाग नोंदवला.एवढेच नव्हे तर या कार्याची पावती म्हणुन सर्व सहभागींना प्रत्येक वेळी मान्यवरांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपञही नियोजनबद्धरित्या दिले गेले.

 माजी शिक्षणाधिकारी व सध्या राज्याच्या शिक्षण सहसंचालकपदी असलेल्या दिनकर टेमकर यांनी अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमींच्या सहकार्याने सुरू केलेले हे कार्य शिक्षणउपसंचालक पदी नियुक्त झालेल्या रमाकांत काठमोरे यांनी वाढविले सध्या जिल्हाशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेले शिवाजी शिंदे यांनीही हे उपक्रम पुढेही असेच वृद्धींगत करण्याबाबत आश्वासन दिले आहे.माजी जिल्हाशिक्षणाधिकारी तथा शिक्षण उपसंचालकरमाकांत काठमोरे यांना निसर्गप्रेमी संघटनेतर्फे जिल्हा निसर्गप्रेमी पुरस्कार देवुन निरोप दिला गेला.यावेळी शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर व जिल्हा शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे याचाही सत्कार संपन्न झाला.जिल्हा निसर्गप्रेमी संघटनेचे निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम सातपुते यांसह वनस्पती अभ्यासक अमित गायकवाड निसर्गप्रेमीसंदिप फंड,संदिप भालेराव,बाळासाहेब चाबुक्स्वार,डमाळे  आदी यावेळी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्टेट बँक ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा पूर्ण करत आहे

 महाप्रबंधक सुखविंदर कौर : ऋण समाधान योजनेची गोंडेगाव अंमलबजावणी

वेब नगर नगर : भारतीय अर्थव्यवस्थेत शेतकरी महत्वाची भूमिका बजावत असून अर्थव्यवस्थेचा हिस्सा शेतकरी आहे.  स्टेट बँकेने थकीत कर्जदारांना कर्ज मुक्त करण्यासाठी ऋण समाधान योजना आणली आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात सुंदर व सुटसुटीत योजना स्टेट बँकेने आणली आहे. त्यामुळे या योजनेचा सर्व कर्जदार शेतकऱ्यांनी लाभ घेवून कर्जमुक्त होवून इतरांना प्रेरित करावे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठीही बँक सहकार्य करीत आहे. भारतीय स्टेट बँक प्रतेक क्षेत्रात देशात अव्वल स्थानावर आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा स्टेट बँक पूर्ण करत आहे, असे प्रतिपादन भारतीय स्टेट बँकेच्या दक्षिण महाराष्ट्राच्या महा प्रबंधक सुखविंदर कौर यांनी केले.

          भारतीय स्टेट बँकेच्या श्रीरामपूर शाखेच्या वतीने गोंडेगाव येथे आयोजित मेळाव्यात ऋण समाधान योजने अंतर्गत कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप व दहा महिला बचत गटांना प्रत्येकी १० लाख रुपयांच्या कर्जाच्या धनादेशाचे वाटप भारतीय स्टेट बँकेच्या दक्षिण महाराष्ट्राच्या महा प्रबंधक सुखविंदर कौर यांच्या हस्ते झाले. यावेळी क्षेत्रिय कार्यालय व्यवस्थापक राजीव गुप्ता, मुंबईचे मुख्य प्रबंधक रजनिश वर्मा, ग्राहक सेवेचे मुख्य प्रबंधक महेंद्र मोहिते, व्यवस्थापक नवल अग्रवाल, मनोज शहा, पुणे प्रशासनिक कार्यालयाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर टाकळे श्रीरामपूर शाखा व्यवस्थापक बालाजी राव आदींसह स्टेट बँकेचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. स्टेट बँकेच्या पुणे प्रशासनिक कार्यालयाच्या वतीने बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत आत्मा मलिक संस्थेच्या कोकमठाम येथील मुलींच्या गुरुकुलच्या एस.बी.आय संगणक लॅब साठी ३४ अत्याधुनिक संगणक संच देण्यात आले आहेत. या लॅबचे लोकार्पण महा प्रबंधक सुखविंदर कौर यांच्या हस्ते झाले.

          यावेळी बोलतांना राजीव गुप्ता म्हणाले, भारतीय स्टेट बँकेने थकीत कर्ज दारांना कर्ज मुक्त होण्याची ही मोठी सुवर्णसंधी दिली आहे. ३१ जानेवारी पर्यत थकीत कर्जाच्या व्याजात व मुद्दलीत सूट लाभार्थ्यांना मिळणार असल्याने ही संधी सोडू नका. कर्ज फेड करणाऱ्यांना बँक पुन्हा कर्ज देण्यास तयार आहे. त्यामुळे आपल्या बरोबर आपले नातेवाईक, मित्र यांनाही या योजनेचा लाभ घेण्यास प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात महा प्रबंधक महेंद्र मोहिते यांनी स्टेट बँकेच्या ऋण समाधान योजनेची सविस्तर माहिती दिली. १०० टक्के  कर्ज मुक्त करणाऱ्या या योजनेत व्याजासह मुद्द्लीत सवलत मिळणार असल्याने त्वरित लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे सांगितले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिल्ली ते मुंबई जी टू जी राईड यशस्वी पूर्ण करणारे

जस्मितसिंह वधवा यांचा नगरकरांच्या वतीने जल्लोषमय स्वागत

१ हजार ४६० किलोमीटरचा पल्ला सायकलवर पाच दिवसात पुर्ण

वेब टीम नगर : दिल्ली ते मुंबईदरम्यान १ हजार४६० किलोमीटरचा पल्ला असलेले अंतर पाच दिवसात सायकलवर जी-टू-जी सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण करुन शहरात आलेले नगरचे भूमीपुत्र जस्मितसिंह वधवा यांचा नगरकरांच्या वतीने जल्लोषमय वातावरणात स्वागत करण्यात आले. चौका-चौकात वधवा यांच्यावर फुलांची उधळण करीत तर गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांचे जंगी स्वागत झाले.

जी-टू-जी सायकल राईड नगरकरांच्या प्रेरणेने पूर्ण केल्याबद्दल शहरातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्री विशाल गणेश मंदिरात दर्शन करुन व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन शहरातून स्वागत रॅली काढण्यात आली. जुने बस स्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ आमदार संग्राम जगताप यांनी वधवा यांचे स्वागत केले. वधवा यांच्यासह सहा सायकपटू स्वागत रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन सायकल रॅलीद्वारे सायकल चालवून प्रदुषण थांबविण्याचा व आरोग्य उत्तम ठेवण्याचा संदेश देण्यात आला. या रॅलीचे मराठा सायकल सेंटर, कापड बाजार असोसिएशन, ईश्‍वर बोरा, नारंग परिवार, लोकसेवा हॉटेल, राजू मदान, आशिष खंडेलवाल, केतन बलदोटा यांच्या स्वागत करुन वधवा यांचा सत्कार केला.  

शहरातून निघालेल्या सायकल रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालय येथे झाला. जी-टू-जी सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल पोलीस दलाच्या वतीने जस्मितसिंह वधवा यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सन्मान केला. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक रोशन पंडित, श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस मुख्यालयाचे पो.नि. दशरथ हटकर, जनक आहुजा, देवेंद्रसिंह वधवा, हरजितसिंह वधवा, अतुल डागा, प्रितपालसिंह धुप्पड, प्रदीप पंजाबी, प्रीतम भगवानी उपस्थित होते.

जस्मितसिंह वधवा यांनी जी-टू-जी सायकल राईडच्या माध्यमातून दिल्ली ते मुंबईचा १ हजार४६० किलोमीटरचा सायकल प्रवास पाच दिवसात पूर्ण केला. यामध्ये रोज 250 किमी 12 ते 18 तास सायकल चालवून हा खडतर प्रवास पुर्ण केला. दिल्लीच्या थंडीतील ०अंश ते २६ डिग्रीमध्ये हा प्रवास त्यांनी केला. खडतर रस्ते, उड्डान पूल आदि समस्यांना बाजूला सारत हे यश त्यांनी संपादन केले. यामध्ये संपूर्ण देशातील ४३ स्पर्धक तर ४ परदेशी नागरिकांनी सहभाग नोंदवला.

संग्राम जगताप यांनी दिल्ली ते मुंबई सायकल राईड पुर्ण करुन वधवा यांनी अहमदनगरचे नांव उंचावले असल्याची भावना व्यक्त करुन, प्रदुषण टाळण्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी सायकल चालविण्याचा युवकांना आवाहन केले. पोलीस मुख्यालय येथील समारोपीय कार्यक्रमात हरजितसिंह वधवा व लकी सेठी यांनी जस्मित वधवा यांची खेळात असलेली आवड स्पष्ट करुन त्यांची सायकलिंगची पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. जस्मितसिंह वधवा यांनी दिल्ली ते मुंबईच्या सायकल राईडसाठी मागील सहा महिन्यापासून तयारी सुरु होती. कठोर परिश्रम, जिद्द व नगरकरांच्या प्रेमामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण करु शकल्याचे सांगून, पुढील ध्येय काश्मीर ते कन्याकुमारी के टू के सायकल राईडचा संकल्प व्यक्त केला. तर नगरमधून पुढील जी टू जी सायकल राईडसाठी पाच सायकलपटू पाठविण्याचा मानस व्यक्त केला.

जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील म्हणाले की, वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने, देशात अनेक अपघातामध्ये अनेकांचा जीव जात आहे. मॅरेथॉन व सायकलिंग मधील स्पर्धकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावर वाहन चालविताना नियमांचे पालन केल्यास अशा स्पर्धकांना खरा सन्मान ठरणार असल्याचे सांगितले. तर आरोग्यासाठी सायकल चालविणे उत्तम असून, पुढील सायकलिंग स्पर्धेसाठी पोलीस दलातील खेळाडू देखील सहभागी होणार असल्याचे सांगितले.    

 या स्वागत रॅली कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलिस दल, तिरंगा फाऊंडेशन, घर घर लंगर सेवा, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, मराठा सायकल सेंटर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले. प्रास्ताविक धनेश खत्ती यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत हरजितसिंह वधवा यांनी केले. आभार प्रशांत मुनोत यांनी मानले. यावेळी भूषण कर्नावट, धनेश कोठारी, अनिश आहुजा, हितेश ओबेरॉय, राहुल बजाज, राजा नारंग, मनयोग माखीजा, सनी वधवा, सोनू वधवा, केतन बलदोटा, कैलाश नवलानी, जय रंगलानी, मन्नू कुकरेजा, धनंजय भंडारे, आनंद बोरा, सुधीर लांडगे, डॉ. संजय असणानी, सहेजकुमार वधवा, डॉ.सिमरन वधवा उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब प्राईड, सकल राजस्थानी युवा मंच, निरंजन सेवाभावी संस्था, माहेश्‍वरी युवक संघ, बडीसाजन युवक संघ, इंडियन डेंन्टल असोसिएशन, जितो, मिडीया मार्केटिंग असोसिएशन, इंटेरिअर डिझायनर असोसिएशनच्या वतीने जस्मित वधवा यांचा सत्कार करण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मनोविकारांवरील सर्व सेवा एकाच ठिकाणी देणारे मानसग्राम देशाची नवी प्रेरणा : डॉ. भरत वटवानी 

वेब टीम नगर :  नियोजित मानसग्राम प्रकल्पामुळे भारतात प्रथमच मनोविकारांवरील सर्व सेवा एकाच ठिकाणी आणि मोफत मिळणार आहेत.निकोप मन:स्वास्थ्य, हाच भारतनिर्माणाचा पाया असल्याने या प्रकल्पात सहभागी होताना देशसेवेची पवित्र अनुभूती येते,असे प्रतिपादन डॉ. भरत वटवानी यांनी येथे केले.मनोरुग्णांच्या तृणमूल सेवेबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ.भरत वटवानी यांच्या हस्ते मानसग्राम प्रकल्पाचे भूमिपूजन आणि यातील मनोयात्रींसाठीच्या  स्नेहाश्रद्धा प्रकल्पाचे लोकार्पण नुकतेच झाले.

मानसग्राम मधील ४ हजार चौरस फुटांच्या स्नेहाश्रद्धा  संकुलात रस्त्यांवरील बेघर बेवारस  मनोयात्रींसाठीचे उपचार आणि कौटुंबिक पुनर्घटन करणारे केंद्र सुरू करण्यात आले.यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, पंजाब सरकारचे कमिशनर ऑफ स्टेट टॅक्सेस निळकंठ आव्हाड , मुंबईतील गरीबांचे नेत्रतज्ञ प्रभात फाऊंडेशनचे डॉक्टर प्रशांत थोरात, जीवनाचे सर्व संचित सामाजिक उपक्रमांना सहयोग म्हणून देणारे पुष्पलता आणि  सर्जेराव तापकीर दांपत्य, डॉ प्रकाश शेठ ,प्रकल्पाचे मानद संचालक डॉ. नीरज आणि दीप्ती करंदीकर, पत्रकार भूषण देशमुख, मनोयात्रींसाठी चिखली ( जिल्हा बुलढाणा ) येथील सेवासंकल्प संस्थेचे  आरती आणि नंदू पालवे, आदी  उपस्थित  होते.

अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते दिवंगत डॉ.जयंत करंदीकर यांच्या स्मरणार्थ मनोबल व्यसनमुक्ती केंद्र, पुष्पलता सर्जेराव तापकीर पुरस्कृत पुष्पलता मनोयात्री भवन, स्किझोफ्रेनिया आणि इतर मानसिक समस्यांवर समुपदेशन, मानसोपचार आणि पुनर्वसन केंद्र ,प्रज्ञा मानस केंद्र, आदी नियोजित उपक्रमांचा मानसग्राम मध्ये समावेश आहे.

प्रास्ताविकात डॉ.सुहास घुले यांनी नमूद केले की, डॉ. वटवानी यांच्या श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनने आजवर १०  हजारांवर बेघर-बेवारस मनोरुग्णांना उपचार देऊन त्यांच्या घरी आणि समाजात पुन:स्थापित केले आहे. त्यामुळे

अनामप्रेम , स्नेहालय , स्पंदन समुपदेशन केंद्र, सौ दिप्ती आणि डॉक्टर नीरज करंदीकर यांचे करंदीकर मानसोपचार रुग्णालय, या सर्वांनी डॉ.स्मिता आणि भरत वटवानी यांच्या नेतृत्वाखाली मानसग्राम उभारण्याचा संकल्प केला आहे .यासंदर्भात डॉक्टर नीरज करंदीकर यांनी सांगितले की भारतात सुमारे १९ कोटी लोकांना मानसिक उपचारांची गरज आहे .परंतु यातील ८२ टक्के रुग्णांना कोणतेही उपचार मिळत नाहीत. रस्त्यांवरील बेवारस लोकांत निम्म्याहून अधिक मनोरुग्ण आहेत. भारत मानसिक रोगांच्या संदर्भात ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहे. या स्थितीत सामाजिक दायित्व ओळखून या प्रकल्पात करंदीकर मानसोपचार रुग्णालय सहभागी झाले आहे. स्पंदन समुपदेशन केंद्राच्या दीपा नींलेगावकर यांनी नमूद केले की, भारतातील सुमारे ५८९ जिल्ह्यात एकही  मानसोपचार तज्ञ नाही. वाढती व्यसनाधीनता आणि विविध आजारांमुळे या क्षेत्रात सामाजिक संस्था कार्यकर्ते रुग्णालय आणि वैद्यकीय व्यवसायिक यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता  आहे. मानसग्राम प्रकल्प या क्षेत्रातील सर्व सामाजिक संस्था, कार्यकर्ते, मानसोपचार तज्ञ, रुग्णालये यांना जोडत समाजासाठी समाजासोबत कार्यरत राहणार असल्याचे प्रकल्पाच्या  समन्वयक सुलक्षणा आहेर यांनी सांगितले.

मानसग्राम चे मार्गदर्शक अजित कुलकर्णी यांनी सांगितले की, आरंभी रस्त्यांवरील बेवारस मनोरुग्णांना उपचार घेऊन घरी पाठवण्याचे प्रयत्न येथे स्नेहाश्रद्धा प्रकल्प करील. संयोजक अनिता अजित माने आणि वैजनाथ लोहार यांनी मनोयात्रींसाठीच्या हेल्पलाईन चा ७०३८२०५८७२  हा क्रमांक यावेळी  जाहीर  केला. अजित माने, अनिल गावडे ,हनीफ शेख , प्रवीण मुत्याल यांनी उपस्थितांना हिम्मत ग्राम, आधारग्राम आणि सत्यमेव जयते ग्राम  येथील उपक्रम आणि रोजगारक्षम सेवांची तपशीलवार माहिती दिली. स्नेहाश्रद्धा प्रकल्पातील वास्तूवर वारली चित्र चितारणाऱ्या अरविंद कुडिया  आणि त्याच्या भिंगार मधील ८ कलाकार विद्यार्थ्यांचा यावेळी डॉक्टर वटवानी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्नेहालय मधील विद्यार्थीही या चित्रणात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments