शोधत होते बोठे, सापडला डॉ.निलेश शेळके

 शोधत होते बोठे, सापडला डॉ.निलेश शेळके 

 

वेब टीम नगर : शहर सहकारी बँक आणि अर्बन बँक यांना खोटी कागदपत्रे देऊन बोगस कर्ज वाटप प्रकरणात पोलिसांना हवा असलेला डॉ. निलेश शेळके हा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.   रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याचा  शोध घेत असतांना पोलिसांना डॉ. निलेश शेळके सापडला आहे. गेल्या अडीच  वर्षांपासून आरोपी डॉ. निलेश शेळके नजरेआड होता.पोलिसांनी त्याला शुक्रवारी पुण्यातून ताब्यात घेतल्याचे समजते.

अहमदनगर शहर सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या बोगस कर्जवाटप प्रकरणात शेळके पोलिसांना हवा होता. त्याच्यावर सप्टेंबर २०१८ मध्ये गुन्हा दाखल होता.आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून शेळके पोलिसांना सापडत नव्हता . दरम्यान पोलीस २० ते २२ दिवसांपासून नजरेआड आरोपी बोठे याचा शोध घेत आहेत. बोठे हा पुणे येथे शेळके याच्याकडे लपला असल्याच्या संशयावरून पोलीस उपाधीक्षक अजित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला़ यावेळी शेळके सापडला मात्र बोठे याने पुन्हा गुंगारा दिला.  रेखा जरे हत्याकांडात चौकशी केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा शेळके याला अटक करू शकते.

Post a Comment

0 Comments