त्या पोस्टरबॉयने घेतला 'कायदेशीर नोटीस' पाठविण्याचा निर्णय

त्या पोस्टरबॉयने घेतला 'कायदेशीर नोटीस' पाठविण्याचा निर्णय 

 वेब टीम दिल्ली : भारतीय जनतापक्षाच्या वतीने अनेक योजनांसाठी केंद्र सरकारच्या वतीने जाहिराती वर्तमान पत्रातून तसेच समाज माध्यमातून झळकताना दिसतात . त्यातील अनेक जाहिराती बनावट असल्याचा सिद्ध होतंय . मनसेने राज्यात भाजपाची सत्ता असताना अनेक जाहिरातींचा परदाफाश केला होता . तोच प्रकार आता पंजाब मधील जाहिरातींच्या बाबतीत घडल्याचे समोर आले आहे . 

त्याचे असे झाले कि , केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सिंघू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन  सुरू आहे. पंजाबमधील शेतकरी हरप्रीतसिंग हेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पण पंजाबमध्ये या कायद्यांवर भाजपच्या जाहिरातीत हरप्रीतसिंग यांचा फोटो आहे. म्हणजेच भाजपने ज्या शेतकऱ्याचा फोटो आपल्या जाहिरातीवर लावला आहे, तो गेल्या २ आठवड्यांपासून सिंघू सीमेवरील नवीन कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात बसला आहे. भाजपने आपल्या फोटोचा बेकायदेशीररीत्या वापर केला आहे, असा आरोप हरप्रीतसिंग यांनी केला आहे.

हरप्रीत हे पंजाबमधील होशियारपूरचे रहिवासी आहे. ते व्यवसायाने शेतकरी आहे आणि कलाकारही आहेत. हा फोटो आपण ६-७ वर्षांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. भाजपच्या जाहिरातीत हा फोटो वापरण्यात आला आहे, असं एका मित्राने व्हॉट्अॅपवरील चॅटमधून आपल्याला सांगितलं. फोटो वापरण्यापूर्वी आपली परवानगी घेतली गेली नाही. आता अनेक आपल्याला फोन करून भाजपचा पोस्टर बॉय म्हणून संबोधत आहेत. पण आपण भाजपचे नाही तर शेतकर्‍यांचे पोस्टर बॉय आहोत, असं ते सांगत आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपासून सिंघू सीमेवर आंदोलनाला बसलो आहे. भाजपची जाहिरात आणि आपल्या मूळ फोटोसह भाजपला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं ३५ वर्षीय हरप्रीत सिंग यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments