आरोग्य आहार : पुदिना बिर्याणी

 आरोग्य आहार

 पुदिना बिर्याणी 

साहित्य : ४ वाटी बासमती तांदूळ, ६ टे स्पून तूप,१ च. जिरे , ३-४ तमालपत्राची पानं ,४ हिरवे वेलदोडे ,४ मसाला वेलदोडे, ३-४ लवंगा, ३-४ दालचिनीचे तुकडे, ८-१० काळे मिरे.१ वाटी फ्लॉवरचे मोठे तुरे , १ वाटी मटार,१ वाटी गाजराचे लांबट काप,१ वाटी श्रावण घेवडा. ३-४ कांदे उभे चिरून तळून घेणे. ५० ग्राम काजू , २५ ग्राम बेदाणे तळून, २-३ मोठे बटाटे उकडून, १ लिंबाचा रस , २ टोमॅटो बारीक चिरून , मीठ 


मसाला साहित्य व कृती : २ कांदे चिरून, १०-१२ लसूण पाकळ्या १ इंच आलं सोलून,१ गड्डी कोथिंबीर बारीक चिरुन , ७-८ हिरव्या मिरच्या, १ वाटीभर पुदिन्याची पानं, १ चमचा गरम मासाला, २ चमचे बिर्याणी मसाला, सर्व एकत्र वाटून घ्यावे.      


 बिर्याणी कृती : बिर्याणी करण्यापूर्वी सर्व भाज्या नीट निवडून अर्धवट शिजवून निथळून घ्यावेत.तांदूळ धुऊन अर्धा तास कोमट पाण्यात घालून ठेवावेत. १०-१२ कप पाणी मोठ्या पातेल्यात उकळायला ठेऊन तांदूळ घालून भात बोटचेपा शिजवल्यावर जास्तीचे पाणी गाळून काढावे. भात मोकळा करून गार करायला ठेवावा. 

जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून उकडलेले बटाटे त्यात परतून घ्यावेत.कढईत ६ टे स्पून  गरम करावे.त्यात जिरे , तमालपत्र , वेलदोडे, मसाला वेलदोडे, लवंग , दालचिनी व काळे मिरे घालावेत.त्यावर वाटलेला हिरवा मसाला घालून खमंग परतून घ्यावा.मसाला परातला गेला कि चिरलेले टोमॅटो व उकडलेल्या सर्व भाज्या व लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालून भाज्या पसतुन घ्याव्यात.           

परतलेल्या भाज्या गार झालेल्या भातात हलक्या हाताने मिसळाव्यात व तो भट परतलेले बटाटे लावून ठेवलेल्या भांड्यात घालावा वरती तळलेला कांदा काजू व बेदाणे घालावेत. गॅसवर तवा ठेऊन भाताचे पातेले त्यावर ठेऊन भाताला दणदणीत वाफ आणावी. दह्याबरोबर हि बिर्याणी सर्व्ह कारावी. 

टीप : 

* मसाल्याच्या हिरव्या रंगाने बिर्याणी खूप छान दिसते. मसाला जास्त नसल्याने सौम्य लागते. 

* सर्व भाज्याच न घालता नुसता मटार घालून केली तरी छान लागते .     


Post a Comment

0 Comments