आयकरचा छापा न टाकण्यासाठी २० लाख रुपये मागितले

 आयकरचा छापा न टाकण्यासाठी २० लाख रुपये मागितले


वेब टीम कोल्हापूर : व्यवसायाने डॉकटर असलेल्या व्यक्तीस त्यांनी सन २०१२ पासून आयकर भरलेला नाही असे सांगून त्यांच्या घरी छापा न टाकण्यासाठी आरोपी प्रताप महादेव चव्हाण ( वय ३५ आयकर निरीक्षक वर्ग २ , आयकर विभाग कार्यालय , भारत सरकार , टाकाळा , कोल्हापूर ) याने २० लाख रुपयांची लाच मागितली . तडजोडी अंती १४ लाख रुपये देण्याचा व्यवहार ठरला. सरते शेवटी दि. १८-१२-२०२० रोजी १० लाखाचा पहिला हफ्ता स्वीकारतांना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले . 

पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत , स.फौ शाम बुचडे , संजीव बंबर्गेकर , पो.हेकॉ अजय चव्हाण , सुरज अपराध , पोकॉ. मयूर देसाई , रुपेश माने , संग्राम पाटील यांनी पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे ला.प्र.वि पुणे परिक्षेत्र, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून यशस्वी कारवाई केली .       

Post a Comment

0 Comments