मुंबई,नाशिक,पाठोपाठ नगरच्याही वाटा धुक्यात ...

 मुंबई,नाशिक,पाठोपाठ नगरच्याही वाटा धुक्यात ... 


वेब टीम नगर : मुंबई नाशिक पाठोपाठ आज नगर शहराचीही सकाळ धुक्याची चादर लपेटूनच झाली. धुक्याचीही दाट दुलई ९:३० पर्यंत होती.त्या नंतर चंद्रासम शीतल भासणाऱ्या सूर्यबिंबाचे दर्शन घडले.त्यापाठोपाठ धुक्याची दुलई सुद्धा वीरळ  होत गेली.त्यानंतर शहरातील व्यवहार सुरळीत होऊ लागले. 

शहराच्या भागात दाटलेल्या धुक्यात सकाळी फिरायला जाणाऱ्या नगर करांनीउबदार कपडे घालून नुकत्याच पडू लागलेल्या गुलाबी थंडीचे स्वागत केले. त्यातच धुक्यानेही हजेरी लावल्याने नगरकरांचा आनंद द्विगुणीत झाला. 


 सकाळी उशिरा पर्यंत धुके दाटल्याने चाकरमान्यांना आणि महामार्गावरील वाहनांना दिवे सुरु ठेऊनच वाहने चालवावी लागली. दाट धुक्यामुळे काही अंतरावरचेच दिसत असल्याने वाहनांचा वेग मंदावला होता.९:३० च्या नंतर सूर्य प्रकाश प्रखर झाल्याने दाटल्याने धुक्याची दुलई हळू हळू विरळ होत गेली. मात्र अचानक पडलेल्या या धुक्याने नगरकरांनीही चहा सोबत धुक्याचा आनंद लुटला.           


Post a Comment

0 Comments