सुवर्णा कोतकर हीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
वेब टीम नगर : केडगाव येथील २०१८ साली झालेल्या पोटनिवडणुकीच्यावेळी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी काँग्रेसच्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकरचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.गुन्हा घडल्यापासून कोतकर फरार आहेत.
७ एप्रिल २०१८ रोजी शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींकडून कोतकर हिच्याबद्दल माहिती सीआयडीच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे सीआयडीने कोतकरचेही नाव या गुन्ह्यात नोंदविले. तेव्हापासून कोतकर फरार असून आता अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला होता. सुरुवातीला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.
या अर्जावर जिल्हा न्यायाधीश अमित शेटे यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲड. केदार केसकर यांनी तर आरोपीतर्फे ॲड. नितीन गवारे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कोतकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
0 Comments