आरोग्य आहार
चीज पोटॅटो सूप
साहित्य : १/२ किलो बटाटा बारीक चिरुन , १ कांदा बारीक चिरून , मीठ -मिरपूड चवीनुसार , २ मोठे चमचे मैदा , १०० ग्रा चीझ किसलेले , बारीक चिरलेली कोथिंबीर.
चिरलेले बटाटे, चिरलेला कांदा, थोडेसे मीठ घालून, २ कप पाण्यात कुकर मध्ये उकडून घ्यावेत. गार झाल्यावर मिक्सरमधून काढून गाळून घ्यावे.
कृती : सोलून उकळायला ठेवावे, थोडा गार दुधात मैदा मिसळून घ्यावा बाकीचे दूध ह्या मिश्रणात घालावे. हे दूध उकळत्या सूप मध्ये थोडे थोडे घालतात ढवळावे. सर्व दूध घालून झाल्यावर उकळी आली कि खाली उतरवून मिरपूड घालावी व किसलेले चीज घालून सर्व्ह करावे.
टीप :
* हे सूप दाटसर चांगले लागते .
* दुधाला मैदा लावून घेतल्यामुळे दूध सूप मध्ये फुटत नाही तरीसुद्धा सूप सतत ढवळावे.
* सूप करतांना चीज किसताना किसणीला थोडे तेल लावावे म्हणजे चीज चांगले किसले जाते.
0 Comments