गोरक्षा कायद्यावरून उपसभापतींना धक्काबुक्की

 गोरक्षा कायद्यावरून उपसभापतींना धक्काबुक्की 

वेब टीम बेंगळुरू : गोरक्षा कायद्यावरून कर्नाटक विधान परिषदेत उपसभापतींना चांगलीच धक्का बुक्की सहन करावी लागली. काँग्रेस च्या आमदारांनी विधानपरिषदेच्या अध्यक्षांना जबरदस्ती खुर्चीवरून खाली खेचलं. 

कर्नाटक विधान परिषदेत गोरक्षा कायद्यावर चर्चा चालू होती. काँग्रेसचे आमदार विधानपरिषदेचे उपसभापतींच्या समोरील वेळ मध्ये उतरून घोषणा बाजी करत होते.  यावेळी काँग्रेसचे आमदार सिद्धरामैया आणि जनता दल (सेक्युलर) चे एच.के. कुमारस्वामी आदींनी ह्या वेळी वेल मध्ये गोंधळ घालण्यास सुरवात केली. परिस्थिती हात बाहेर गेल्यानंतर मार्शल ना सभागृहात पाचारण करावे लागले.त्यांनीही बरेच प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली, कर्नाटक विधान परिषदेच्या इतिहासात आजच्या इतका गोंधळ प्रथमच घातला गेल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.  

Post a Comment

0 Comments