नगर बुलेटीन

 नगर बुलेटीन 

विद्यार्थी काँग्रेसच्या नगर शहर अध्यक्षपदी चिरंजीव गाढवे यांची नियुक्ती 

वेब टीम नगर :  विद्यार्थी काँग्रेसच्या (एनएसयूआय) नगर शहर अध्यक्षपदी चिरंजीव गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर येथे काँग्रेस पक्षाच्या उत्तर विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी गाढवे यांना आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मान्यतेने गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीसाठी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शिफारस केली होती. विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर यांनी गाढवे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. 

यावेळी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. लहू कानडे, नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, भाऊसाहेब थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, सोमेश्वर दिवटे, एनएसयूआयचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर, युवा पुरस्कार विजेते भैय्या बॉक्सर, युवक काँग्रेसचे विशाल कळमकर, क्रीडा काँग्रेसचे प्रवीण गीते, अमित भांड, प्रमोद अबूज आदी उपस्थित होते. 

निवडी नंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना गाढवे म्हणाले की, ना. बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे पाटील, आ. सुधीर तांबे तसेच शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये विद्यार्थ्यांचे, युवा वर्गाचे संघटन एनएसयूआयच्या माध्यमातून मजबूत करण्यासाठी मी काम करणार आहे. शहराच्या सर्व कॉलेजेसमध्ये शाखा उघडणार आहे. 

जिल्हा उपाध्यक्षपदी दानिश शेख

दानिश शेख यांची विद्यार्थी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शेख मागील तीन वर्षांपासून शहराचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांना जिल्हा कार्यकारणी मध्ये बढती देण्यात आली आहे. शेख यांनी यावेळी बोलताना विश्वास व्यक्त केला की, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात नगर शहरासह जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांचे उत्तम संघटन उभे करील.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्व.गोपीनाथ मुंडे यांनी न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला 

भैय्या गंधे : नगर शहर भाजपाच्यावतीने स्व.गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

   वेब टीम  नगर - महाराष्ट्रात भाजपाची सत्ता नसतानाही व कुठल्याही मोठ्या पदावर नसतानाही स्व.गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून मोठी ख्याती मिळविली. ऊसतोडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला. आठरापगड जातींना एकत्र करुन न्याय देण्याचेही काम त्यांनी केले आहे. आज सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांनी दाखविलेल्या मार्गावर जाऊन त्यांच्या विचारानेच काम करत आहेत.  आज केंद्रात भाजपाची सत्ता आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये असतांना स्व.गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्यांनासाठी राबविलेल्या विविध योजनांद्वारे आज मोठा आधार ठरत आहे. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणचे काम आपण सर्वांना करावयाचे आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांची तळगाळातील लोकांसाठी केलेले कार्य आपण यापुढेही पक्षाच्या माध्यमातून सुरु ठेवू, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.

     भारतीय जनता पार्टी नगर शहर शाखेच्यावतीने स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गांधी मैदान येथील भाजपा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, प्रदेश सदस्य अ‍ॅड.अभय आगरकर, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनिल रामदासी, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, वसंत राठोड, सचिन पारखी, अजय चितळे, महेश तवले, तुषार पोटे, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्‍वर धिरडे, अर्जुन लाड, किशोर कटोरे, ऋग्वेद गंधे, सिद्धार्थ नाकाडे, राहुल कवडे, शिवाजी दहिंहडे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी अभय आगरकर म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळापासून स्व.गोपीनाथ मुंडे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. पक्षाची ध्येये-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या अपार मेहनतीमुळेच राज्यातही आणि देशातही भाजपाची सत्ता आली होती. महाराष्ट्रातील गाव पातळीपासून मेट्रो सिटीपर्यंत त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. एक अभ्यासू वक्ता, कुशल नेतृत्व हे भाजपाला लाभले होते. त्यांचा झंझावत व तळागाळातील लोकांसाठी केलेले कार्य कोणीही विसरु शकत नाही, असे सांगून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

     याप्रसंगी सुनिल रामदासी, वसंत लोढा, सचिन पारखी, अनिल गट्टाणी, तुषार पोटे आदिंनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याविषयी माहिती देऊन त्यांच्या नगरमधील आठवणींना उजाळ दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केले तर आभार तुषार पोटे यांनी मानले. यावेळी कैलास गर्जे, नितीन शेलार, अनिल सबलोक, पंकज जहागिरदार, नरेश चव्हाण, सुजित खरमाळे, साहिल शेख, आदेश गायकवाड, लक्ष्मीकांत तिवारी, अनिल गट्टाणी, सुधीर मंगलाराप्, राम वडागळे, अमोल निस्ताने, चंद्रकांत पाटोळे, सुमित बटूळे, सुबोध रसाळ, शैलेंद्र ओहोळ, आशिष अनेचा, किरण जाधव, हुजेफा शेख, प्रणव सरनाईक आदि उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक एल.जी.गायकवाड यांना भाजपच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एडस् जनजागृतीत एनएसएसचे योगदान महत्वपूर्ण  

डॉ.गायकर : अहमदनगर  महाविद्यालयात एन.एस.एस व रेड रिबन क्लब आयोजित एड्स जनजागृती सप्ताह साजरा

    वेब टीम नगर :  एड्स विषयी विविध स्तरावरील जनजागृती कार्यक्रमामुळे युवा पिढीला सहज माहिती मिळते आहे, त्यामुळे देशात निरोगी युवा पिढी तयार होत आहे. एक सजग, सतर्क व विवेकशील युवा निर्माण करण्यासाठी एनएसएस मधील अशा अनेक कार्यक्रमाचे योगदान महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गायकर यांनी केले.

      अहमदनगर  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) व  रेड रिबन क्लब द्वारा आयोजित एड्स जनजागृती सप्ताह अंतर्गत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी डॉ.बाळासाहेब गायकर बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.  याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.रज्जाक सय्यद, रजिस्टार ए.वाय.बळीद, समन्वयक केशव कापसे,  हिंदी विभागप्रमुख ऋचा शर्मा, कार्यक्रम अधिकारी डॉ.मालती येवला, प्रा.अशोक घोरपडे आदि उपस्थित होते.

     यावेळी महाराष्ट्र शासनाच्या एड्स जनजागृती समितीचे अहमदनगरचे समन्वयक मा. केशव कापसे यांनी स्वयंसेवकांना एड्स विषयी सविस्तर माहिती दिली व चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे ही दिली.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा.अशोक घोरपडे यांनी केले. तर आभार स्वयंसेवक निलेश फसले याने केले. स्वयंसेवक ऋतुजा पिटेकर, वैष्णवी पाडे, श्रेयस कांबळे,आकाश देशमाने यांनी सहकार्य केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अध्यादेशाला विरोध करणार

 प्राचार्य सुनील पंडित : अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने शासनाच्या अध्यादेशाची होळी

वेब टीम नगर : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने ११ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबाबत काढलेला अध्यादेश चुकीचा व अन्यायकारक आहे. कोणताही विचार व चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांमधील शिपाई पदावर गदा आणणाऱ्या या अध्यादेशाचा अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नसुन त्यास तीव्र विरोध करणार आहोत. शासनाच्या या अन्यायकारक अध्यादेशाची होळी करून निषेध करत आहोत, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांनी केले.

          अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील पंडित यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत काढलेल्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. तसेच राज्यातील दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने विनाविलंब विनाअट कार्यवाही करावी. शासनाने ४ डिसेंबर रोजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के  अनुदान देण्याचा सुधारित आदेश त्वरित रद्द करावा या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवून अध्यादेश त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी राज्य शिक्षकेतर महामंडळाचे विभागीय सचिव गोवर्धन पांडूळे, जिल्हा सचिव भानुदास दळवी, शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बेरड, संघटन मंत्री विठ्ठल ढगे, शहराध्यक्ष सुभाष येवले, चंद्रकांत चौगुले, किशोर मुथा, लुहाण लक्ष्मण,सु.वी. राउत, सुनील गाडगे, डी.एम.रोकडे, विजय गारद, आशा मगर, कैलास देशमुख, के.एस. खांदाट, चंद्रशेखर चावंडके, अनिरुद्ध देशमुख, एन.आर. जोशी, एस.एस.शिंदे, विजय मोहिते आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, राज्य शासनाने ११ डिसेंबर २०२० रोजी राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:/पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबत शासन निर्णय जाहिर केला आहे. सदरचा शासन निर्णय हा पूर्णत: अन्यायकारक आहे. शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचविलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधात हा शासन निर्णय आहे. त्यामुळेच शासनाच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्वच मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी जाहिर निषेध करत आहोत. हा शासन निर्णय घेण्यापूर्वी याबाबत मंत्री महोदयांनी सर्व कर्मचारी संघटनेबरोबर चर्चा करणे अपेक्षित होते. किमानपक्षी राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदारांबरोबर देखील विचार विनिमय करणे व त्यानंतर निर्णय घेणे अपेक्षित होते.

तसेच अशाप्रकारे शासन निर्णय घेतांना तो विधिमंडळामध्ये देखील सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतू कदाचित शासनाला तशी आवश्यकता वाटत नसावी म्हणूनच अतिशय छुप्या पध्दतीने शुक्रवारी सायंकाळी उशीरा शासनाने हा निर्णय जाहिर केला. शासनाच्या या पळकुटे धोरणाचा आम्ही निषेध करत आहोत. राज्यातील कोणत्याही चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही व असा अन्याय सहन केला जाणार नाही.

शिपाई भत्ता देऊन कंत्राटी पध्दतीने भरती करण्याचा शासनाचा हा डाव मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती यशस्वी होऊ देणार नाहीत. अशा कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आपली मुले सुरक्षित राहतील की नाही याचा देखील समाजाने विचार करणे आवश्यक आहे.

तसेच नुकतीच शासनाने दि. १० जुलै २०२० ची महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील सेवाशर्तीमध्ये बदल सूचविणारी अधिसूचना रद्द केली परंतू अशी अधिसूचना फक्त रद्द करुन उपयोग होणार नाही तर प्रत्यक्षात वित्त विभागाची मंजूरी मिळवून योजना जशीच्या तशी लवकरात लवकर लागू करुन राज्यातील दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने विनाविलंब विनाअट कार्यवाही करावी. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

..अध्यादेशाच्या विरोधात आय एम ए  ने न्यायालयात धाव घेतली 

वेब टीम नगर  : आयुर्वेद विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियेची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचनेविरुद्ध आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु  आहे.अहमदनगरमध्ये  इये आयएमए  च्या सभासद असलेल्या सुमारे  २४९डॉक्टरांनी   नगर क्लब येथे  शुक्रवारी एकत्रितपणे जमून या विरोधात निषेध व्यक्त केला.  या अधिसूचनेमध्ये बी.एम.एस.झालेल्या आयुर्वेद शाखेतील विद्यार्थ्यांना ५८ अ‍ॅलोपॅथीक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. या विरोधातच ११ डिसेंबर रोजी आय.एम.ए.ने देशव्यापी संप  पुकारण्याचे  आवाहन केले होते . या प्रसंगी आयएमएचे नगर शाखेचे    प्रेसिडेंट डॉ.अनिल आठरे, सेक्रेटरी सचिन वहाडणे डॉ निसार सय्यद,व्हा. प्रेसिडेंट डॉ सतीश सोनवणे ,डॉ सागर झावरे .डॉ नरेंद्र वानखडे  व्यासपीठावर उपस्थित होते.  सुरवातीला सेक्रेटरी सचिन वहाडणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आंदोलनाच्या मागील  कारण मीमांसा स्पष्ट  केली.   

     याप्रसंगी डॉ.अनिल आठरे म्हणाले, सीसीआयएमने आधुनिक वैद्यकीय, शस्त्रक्रियेचे नामांतर संस्कृत शब्दात  करुन या सर्व मूळ आयुर्वेद शस्त्रक्रिया असल्याचा खोटा दावा केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आयुर्वेद पदव्युतर विद्यार्थी आधुनिक वैद्यकाच्या विविध विशेष शाखांमधील शस्त्रक्रिया करण्यास पात्र ठरणार आहे. थोडक्यात एकच आयुर्वेद वैद्य अ‍ॅपेंडीक्सचे, किडणी स्टोनचे, कानाचे व डोळ्यांच्या मोतीबिंदूचे देखील ऑपरेशन करेल, त्याला पित्ताशयातील खडा काढण्याची अवघड शस्त्रक्रिया करण्याची परवानगी असेल, तोच डॉक्टर दातांची शस्त्रक्रिया करण्यासही पात्र ठरेल, ही बाब अतिशय धोकादायक असून आधुनिक वैद्यक शास्त्रातील ज्येष्ठ आणि कुशल शल्य चिकित्सांना देखील शस्त्रक्रियेतील एवढ्या विस्तृत निवडीचे कायदेशीर परवानगी नाही. या आयुर्वेद वैद्यांना एम.एस. ही पदवी लागू होणार आहे, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे.या अध्यादेशाच्या विरोधात आयएम ये ने न्यायालयामध्ये धाव घेतली असून  आयुर्वेद विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियेची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या अद्यादेशाला विरोध दर्शविला आहे व  वैद्यकीय परिषदेने अशी रसमिसळ करण्यासाठी तयार  केलेल्या चार समित्या रद्द   कराव्यात अशी आयएमएने मागणी केली आहे    

       डॉ.आठरे पुढे  म्हणाले, शस्त्रक्रिया नाजूक प्रक्रिया असते , जी रुग्णाच्या  जीवन आणि मरण यातील सुक्ष्म रेषा असते. आधुनिक वैद्यकीय सर्जन विविध आजारांचा सुक्ष्म अभ्यास करून शस्त्रक्रिया करतो . आयुर्वेदाती ल       अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियेचे हे मिश्रण आयुर्वेदासारख्या प्राचिन शाखेचा विकास खुंटवेल व  भविष्यात आयुर्वेदाचे शास्त्रही नाहीसे होईल . त्यामुळे केंद्र सरकारच्या संबंधित  राजपत्रातील सीसीआयएमची आधिसूचना  मागे घ्यावी..डॉ निसार सय्यद यांनी केंद्र शासनाचा हा सी सी आय  एम  अध्यादेश कसा चुकीचा आहे यावर सविस्तर विवेचन केले व हा अध्यादेश केंद्र शासनाने  तातडीने मागे घयावा असे आवाहन करून देशातील सर्व एम बी बी एस डॉक्टर्सनी आपल्या  डिग्रीचा लेटर हेड मध्ये उल्लेख करावा .नुसते एम डी व एम एस लिहू नये असे कळकळीचे आवाहन केले.  

     यासाठी इंडियन मेडिकल असो, च्या आवाहनानुसार  जिल्ह्यातील   सर्व दवाखाने, क्लिनिक व ओपीडीच्या सेवा सकाळी ६ ते सायं. ६ या वेळेत बंद होत्या .फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या    . सरकारच्या अश्या  चुकीच्या निर्णयामुळे    अंतिम दुष्परिणाम संबंधित रुग्णांच्या आयुष्यावर व पर्यायाने आरोग्यावर होणार आहे. यासाठी जनजागृतीपर संवेदि करण आयएमए शाखेच्यावतीने  संपूर्ण भारतात करण्यात येत आहे.

     या आंदोलनामध्ये शासकीय व खाजगी महाविद्यलयातील पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला . या आंदोलनामध्ये आधुनिक वैद्यकशास्त्रातील सर्व स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिटी शाखा, शासकीय डॉक्टरांच्या संघटना, मेडिकल कॉलेजमधील शिक्षक संघटना सहभागी झाल्या

अहमदनगर क्लब येथे आयएमए चे  सर्व सभासद डॉक्टरांसाठी   आंदोलनाच्या वेळेत सायंकाळी  सहा पर्यंत   प्रसिद्द डॉ. हेमंत  नाईक यांचे डाएट व वजन यावर तर डॉ महेश मुळे यांचे  चांगल्या आरोग्यासाठी  व्यायामाची गरज यावर विस्तृत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .डॉ सतीश सोनवणे यांनी आभार मानले .हे आंदोलन करोना  विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षाच्या नियमांचे पालन करून   व सॅनेटाईझरचा व मास्कचा   वापर  करून करण्यात आले .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देशाला दिशा देणारे नेतृत्व ना. शरद पवार यांच्या रुपाने लाभले 

आ. संग्राम जगताप : ना. शरद पवार यांच्या वाढदिवशी वर्चुअल रॅलीद्वारे संपुर्ण राज्यातून शुभेच्छांचा वर्षाव

वेब टीम नगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त वर्चुअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन ही वर्चुअल रॅली पार पडली. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात  आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक अविनाश घुले, समद खान, बाळासाहेब बारस्कर, प्रकाश भागानगरे, सुनिल त्रिंबके, गणेश भोसले, संपत बारस्कर, संजय चोपडा,  अमोल गाडे, राजेश कातोरे, विपुल शेटीया, अभिजीत खोसे, शहर महिला जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, अ‍ॅड. शारदा लगड, तालुकाध्यक्ष उध्दवराव दुसुंगे, किसनराव लोटके, अशोक बाबर, संजय सपकाळ, आरिफ शेख, विजय गव्हाळे, विनीत पाऊलबुध्दे, संजय झिंजे, साहेबान जहागीरदार, वैभव ढाकणे, अ‍ॅड. योगेश नेमाणे, गजेंद्र भांडवलकर, दिपक खेडकर, नितीन लिगडे, ऋषीकेश ताठे, रुपेश चोपडा, सिताराम काकडे, बाळासाहेब जगताप, भरत गारुडकर, गणेश बोरुडे, संजय खताडे, निलेश इंगळे, सिध्दार्थ आढाव, दिलदारसिंग बीर, किसनबेद मुथा, लहू कराळे, ज्ञानदेव कापडे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

मुंबई येथून थेट प्रेक्षेपण झालेल्या या कार्यक्रमात ना. शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. संपुर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, विविध खात्याचे मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांनी या वर्चुअल रॅलीच्या माध्यमातून हजेरी लाऊन वाढदिवसानिमित्त ना. पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ना. पवार यांच्या हस्ते विविध योजना, राष्ट्रवादी काँग्रेसची वेबसाईट व ऑनलाईन सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक जिल्हा पातळीवर मुंबईच्या या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व ना. शरद पवार यांनी राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.

आ. संग्राम जगताप म्हणाले की, देशाला दिशा देणारे नेतृत्व ना. शरद पवार यांच्या रुपाने लाभले. लाखोंच्या संख्येने या रॅलीद्वारे पवार यांना  शुभेच्छा देण्यात आल्या   आहेत. एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पध्दतीचे त्यांचे कार्य सुरु आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे दीपस्तंभ म्हणून संपुर्ण जनता त्यांच्याकडे पाहत असल्याची भावना त्यांनी व्यक्त करुन त्यांच्या भावी व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ना. पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्चुअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.१२  डिसेंबर राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता सण म्हणून साजरा करतो. पक्षाच्या धोरणानुसार सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी आपल्या कर्तुत्वाने ना. शरद पवार यांनी महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. महाराष्ट्राच्या विकासात्मक वाटचालीत व देशातील शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी त्यांनी योग्य पध्दतीने कृषी धोरण राबविल्याचे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याने १०जुलैची अधिसूचना रद्द 

बाबासाहेब बोडखे : आंदोलनातील सक्रीय सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे अभिनंदन

वेब टीम नगर : खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा ठरणारी १० जुलैची अधिसूचना रद्द झाल्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आलेले आंदोलन व पाठपुराव्याला आखेर यश आले आहे. या आंदोलनात सक्रीय सहभाग घेणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी अभिनंदन केले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.  

खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सेवा महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीच्या आधीन आहे. या नियमावलीतील नियम क्रमांक १९ नुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना देय असून, नियम क्रमांक २० (२)नुसार भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ देय आहे. जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी योजनेच्या लाभापासून शिक्षक कर्मचार्‍यांना वंचित करण्यासाठी शासनाने१० जुलै २०२० ला अधिसूचना प्रकाशित करून नियम क्रमांक २ नियम क्रमांक १९ चे नियम क्रमांक२०(२) मध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले होते. या घटनाबाह्य अधिसूचनेला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने तीव्र आक्षेप नोंदवून हरकत घेतली होती. तसेच राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारिणीने तीव्र आक्षेप व हरकत नोंदवून १० ऑगस्ट रोजी राज्यभर अन्नत्याग आंदोलन केले होते. या आंदोलनाला शिक्षक कर्मचार्‍यांनी अभूतपूर्व सहकार्य केले. तसेच शिक्षक आमदार गाणार यांनी विधान परिषदेचे सभापती यांना हक्कभंगाची कारवाई करण्याबाबतची विनंती केली होती. तर २० जुलै रोजी संबंधित अधिसूचनेला आक्षेप हरकत नोंदवित संबंधित घटनाबाह्य अधिसूचना रद्द घोषित करण्याची मागणीचे निवेदन राज्यपाल यांना देण्यात आले होते. या अधिसूचनेसाठी घेतलेला आक्षेप व हरकती विचारात घेऊन शासनाने १० जुलै २०२० ची घटनाबाह्य अधिसूचना रद्द करण्याचे घोषित केले आहे. ही बाब स्वागतार्ह असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे आ.  गाणार यांनी म्हंटले आहे. खाजगी शाळांतील शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासाठी शासन निर्णय२९ नोव्हेंबर २०१० रद्द होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने देखील शिक्षक परिषद पाठपुरावा करीत असल्याची माहिती बाबासाहेब बोडखे यांनी दिली. १० जुलैची अधिसूचना रद्द होण्यासाठी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातून बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल , निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर , अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, उकीर्डे , अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, थोरे , प्रदीप बोरूडे, युनूस शेख, ईकबाल काकर आदिंसह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ना. शरद पवार यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता महाराष्ट्रातील जनतेचा अभिमान 

प्रा. माणिक विधाते : शरद पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

वेब टीम नगर : थंडी निमित्त शहरातील तापमानाचा पार खालावत असताना भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने निराधार व वंचित घटकातील८० ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भिंगार येथे निराधार व वंचित घटकातील अनेक ज्येष्ठ नागरिक उघड्यावर झोपून आपले जीवन जगत आहे. वाढत्या थंडीचा तडाखा पाहता अंगात हुडहुडी भरत आहे. उघड्यावर झोपणार्‍यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी पुढाकार घेऊन वंचितांना या उपक्रमाच्या माध्यमातून मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला आहे. रोकडेश्‍वर मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अशोक बाबर व शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या हस्ते वंचित घटकातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेश नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार झंवर, भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिल झोडगे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष नाथाजी राऊत, संभाजी भिंगारदिवे, प्रा. कैलास मोहिते, सुभाष होडगे, रमेश वराडे, निलेश इंगळे, गणेश बोरुडे, लहू कराळे, अर्जुन बेरड, फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, संपतराव बेरड, दिपक बडदे, सुदाम गांधले, सर्वेश सपकाळ, संजय खताडे, बाळासाहेब राठोड, अथर्व सपकाळ, कॅन्टोमेंटचे सदस्य सुरेश मेहतानी, शामराव वाघस्कर, अक्षय भिंगारदिवे, रिजवान शेख, शुभम भंडारी, अजिंक्य भिंगारदिवे, स्वप्निल खरात, गणेश शिंदे, अविनाश जाधव, राजू शिंदे, ईश्‍वर गवळी, संतोष चोपडा, अरुण वराडे, प्रशांत चोपडा आदि उपस्थित होते.

प्रास्ताविकात संजय सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाची शरद पवार यांचे विचार व मार्गदर्शनाखाली राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन वाटचाल चालू आहे. राजकारणातील आदर्श व धोरणी नेतृत्व महाराष्ट्राला शरद पवार यांच्या रुपाने लाभले आहे. ८० वर्षाच्या युवकाचा झंझावात महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळत आहे. त्यांच्या विचारानाचे भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने भिंगारचे अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कटिबध्द राहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा.माणिक विधाते म्हणाले की, ना. शरद पवार यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता महाराष्ट्राला लाभला, हा महाराष्ट्रातील जनतेचा अभिमान आहे. समाजकारण हा राष्ट्रवादी पक्षाचा पाया आहे. त्यांनी राजकारणात राहून समाककारण करायला शिकवले. सर्वसामान्य नागरिक व शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी राष्ट्रवादीची मुहुर्तमेढ रोवली. त्यांचा अनुभव व अभ्यास देशाला दिशा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक बाबर यांनी दरवर्षी संजय सपकाळ सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो. वंचितांच्या सेवेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. वंचित व दुर्बल घटकांना मदत करण्याची भावना राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटसह मास्क, साबण व मिष्टन्न भोजनाचे वाटप करण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगरच्या साईबंन येथे हुरडा पार्टी व पर्यटनाची सुरवात 

ज्येष्ठ  समाजसेवक राजाराम  भापकर यांच्या हस्ते शुभारंभ

वेब टीम नगर : साईबंन हे हिरवाईचे नंदनवन असून डॉ प्रकाश व सुधाताई कांकरिया यांनी माळरानावर फुलवले हे कार्य प्रेरणादायी व वंदनीय व अनुकरणीय असल्याचे  प्रतिपादन ज्येष्ठ  समाजसेवक राजाराम भापकर( गुंडेगाव) यांनी आज नगर येथे केले. भापकर यांच्या हस्ते श्री साईबाबांची पूजा करून,  बाळ गोपाळ पर्यटकांचे फुलांनी स्वागत करून व हुरडा भट्टीची विधिवत पूजा करून या उपक्रमाची सुरवात  करण्यात आली . 
या प्रसंगी    दशरथ जावळे    गुरुजी .निसर्ग पक्षी मित्र संघटनेचे जिल्हाद्यक्ष जयराम सातपुते,.वनस्पती अभ्यासक अमित गायकवाड ,जैन कॉन्फरेन्स चे राष्ट्रीय महामंत्री सतीश लोढा, महावीर इंटरनॅशनल संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष   रमेश बाफना साईबंन ,    चे संचालक डॉ प्रकाश व सुधाताई कांकरिया आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते .

  भापकर पुढे म्हणाले डॉक्टरकीचा पेशा  सांभाळून आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या सामाजिक जाणिवेतून सुमारे ८० एकरात माळरानावर हजारो वृक्ष फुलवून एक चांगला आदर्श या दांपंत्यांनी समाजासमोर आणला आहे पर्यावरणाचे अतिशय मोलाचे असे कार्य  त्यांनी केले असून .येथे अतिशय प्रसन्न ,अश्या  वातावरणात आलेला पर्यटक रमतो .त्यास मन:शान्ति  मिळते ,विचारात देखील सकारात्मक बदल होतात हा माझा अनुभव आहे यासाठी आपण जरूर साईबंनला भेट  द्यावी असे आवाहन केले .डॉ प्रकाश व डॉ  सुधा  कांकरिया यांनी पर्यटकांनी .व हुरडा पार्टी साठी येणाऱ्यांनी करोनाच्या  पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करावे मास्क, सॅनिट्झरचा वापर करावा , सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन करून येथे असलेल्या बोटिंग, .बैलगाडी सफारीचा ,पपेट शो चा झिप लाईन चा विविध खेळाचा आपण आनंद लुटावा असे आवाहन केले पर्यटक व हुरडा पार्टीसाठी  वेळ सकाळी १० ते दुपारी ४ अशी  ठेवण्यात आली  आहे . 



-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments