नगर बुलेटीन

 नगर बुलेटीन 

घरकुल वंचितांना आत्मनिर्भर आवास भूमीगुंठेशिवाय पर्याय नाही 

ॲड. गवळी : रविवारी हुतात्मा स्मारकात घरकुल वंचित सत्यबोधी सुर्यनामा

वेब टीम नगर : मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठाच्या माध्यमातून शहरालगत घरासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात आहे. या पार्श्व्भूमीवर रविवार दि.१३ डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारक येथे घरकुल वंचित सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.

कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आलेतरी देशातील सर्व घरकुल वंचितांना फुकट रेशनकार्डवर घरे मिळणे अशक्य गोष्ट आहे. केंद्र व राज्य सरकारकडे घरकुल वंचितांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी एवढा मोठा निधी व सरकारी जागा देखील उपलब्ध नसल्याची जाणीव प्रत्येक घरकुल वंचितांना होणे गरजेची आहे. यासाठी संघटनेने लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून शहरालगत खडकाळ पड जागेवर आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून इसळक-निंबळक येथे घरकुल वंचितांना ८० हजार रुपयात एक गुंठा जागा देण्याचे कार्य सुरु आहे. घरकुल वंचितांनी घर मिळण्यासाठी प्रयत्न करुन अल्प किंमतीत घरासाठी मिळणारी जागा घेणे आवश्यक आहे. घरकुल वंचितांना आत्मनिर्भर आवास भूमीगुंठ्याशिवाय पर्याय नाही. स्वस्तात जागा मिळत असल्याने जागेचा प्रश्नर सुटल्यास घर होण्याची खात्री निर्माण झाली आहे. तर ही घरे कायदेशीर मार्गाने घरकुल वंचितांना मिळणार असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.

इसळक-निंबळक येथे आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेद्वारे घरकुल वंचितांना घरे दिली जात असताना स्वत:च्या मालकीची घरे नसणारे पोलीस व पत्रकारांना देखील जागा देण्याचे ठरविण्यात आले आहे. दोघा व्यक्तींना एक प्लॉट (एक गुंठा) मध्ये निम्मी-निम्मी जागा देखील घेता येऊ शकणार आहे. ट्वीन बंगलोसाठी व एकत्रित रो हाऊसिंग कॉलनीसाठी सलग जागा देखील उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नागरदेवळा ग्रापमंचायत सदस्याने नाला बुजवून केले अतिक्रमण

अतिक्रमण करणार्याच ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी  

वेब टीम नगर : नागरदेवळे (ता. नगर) येथील ग्रामपंचायत सदस्य स्नेहल भागचंद तागडकर यांनी आलमगीर येथील सार्वजनिक नाला  बुजवून त्यावर अतिक्रमण केलेले आहे. तर सदर ठिकाणी अवैद्य दारू व पेट्रोल विक्री सुरु असल्याचा आरोप करुन, तक्रारदार शादाब हुसेन पठाण यांनी त्यांचे ग्रामपंचायतचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे केली आहे.

नागरदेवळे येथे ग्रामपंचायत सदस्य स्नेहल भागचंद तागडकर यांनी ग्रामपंचायत नागरदेवळेचे उपनगर आलमगीर येथील मोठा नाला  दगड, माती टाकून बुजवून त्यावर पत्र्याची शेड टाकली आहे. तर या शेडमध्ये वॉशिंग सेंटरचा व्यवसाय दाखवून तेथे अवैद्य दारू व पेट्रोल विक्रीचे काम त्यांचे पती भागचंद शंकर तागडकर करीत आहेत.  त्याचप्रमाणे अतिक्रमण केलेल्या जागेत विद्युत मीटर हे तागडकर यांच्या नावाने दिसत आहे. विद्युत मीटर घेण्यासाठी लागणारी बनावट कागदपत्रे सादर करून महावितरण व ग्रामपंचायतींची देखील त्यांनी फसवणूक केली आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे पती भागचंद तागडकर यांनी २६२ प्लॉट नंबर १२ व १३ च्या शेजारी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे शेजारील रहिवासींच्या कॉलनीमध्ये नाल्याचे पाणी शिरत आहे. तसेच सर्व्हे नंबर२६२ मधील ओपन स्पेस मध्ये कॉलनीच्या रहिवासींनी उद्यान केले आहे. त्या उद्यानात जाण्यासाठी सदर अतिक्रमण अडथळा ठरत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

ग्रामपंचायत सदस्स्यांनी गावातील ग्रामस्थांसाठी विविध योजना राबवून गावाचा विकास करणे अपेक्षित आहे. मात्र स्नेहल भागचंद तागडकर यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा गैरवापर करून सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचे काम चालवले असून, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करणार्या  सदर ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करुन, त्यांना दहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची मागणी पठाण यांनी केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नराधम आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी

सावता परिषदेचे निवेदन : थेरगाव येथे अल्पवयीन मुलीवरील  अत्याचार प्रकरण

वेब टीम नगर : सावता परिषदेच्या वतीने पैठण तालुक्यातील थेरगाव (जि. औरंगाबाद) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, निखील शेलार, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, श्री संत सावतामाळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे आदि उपस्थित होते.  

पैठण तालुक्यातील थेरगाव (जि. औरंगाबाद) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक व माणुसकीला काळिमा फासणारी घडली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारे पीडित कुटुंबीय दुर्दैवी घटनेमुळे हादरून गेलेले असून, भयभीत झाले आहे. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असून, पीडित मुलीला न्याय मिळणे अपेक्षित आहे. यासाठी नराधम जुनेद पठाण व दीपक आहेर या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्यादृष्टीने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इसळकच्या" त्या "प्राथमिक शिक्षकांचे निलंबन करण्याची मागणी

शाळा व्यवस्थापन समिती व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारींना निवेदन

वेब टीम नगर : इसळक (ता. नगर) येथील जि.प. प्राथमिक शाळेवर नगर पंचायत समितीने पदस्थापना देऊन इतर ठिकाणी निलंबनाची कारवाई झालेल्या शिक्षक धोंडीबा जबाजी शेटे यांना नियुक्ती दिली आहे. मात्र सदर शिक्षक मनमानी पध्दतीने वागून, शालेय प्रशासनास त्रास देत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असल्याचा आरोप करीत सदर शिक्षकास तात्काळ निलंबित करुन कायमस्वरुपी बडतर्फ करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले आहे. तर सदर शिक्षकाच्या चुकीच्या वागणुकीमुळे यापुर्वी देखील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे, सिताराम सकट, श्रीकांत शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम गिरगे, इसळकचे सरपंच बाबासाहेब गेरंगे आदी उपस्थित होते.      

धोंडीबा शेटे यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी घुमट येथे पुनर्स्थापित करण्यात आले होते. परंतु बाबुर्डी घुमट येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांनी निलंबित शिक्षकास शाळेवर हजर करून घेण्यास विरोध केला होता. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसळक येथे ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकांना एक संधी म्हणून विरोध केला नाही. संबंधित शिक्षक काही दिवस हजर झाल्यानंतर व्यवस्थित आपले कर्तव्य बजावत होते. परंतु काही दिवसांनी त्यांनी चुकीच्या पध्दतीने वागण्यास सुरुवात केली. शाळेवर वेळेवर न येणे, शनिवारच्या दिवशी शाळा सकाळी ७ ला असून देखील १०. ३० ला येण्याचा प्रकार सुरु केला. सदर शिक्षकाची लेखी तक्रार मुख्याध्यापक यांच्याकडे केलेली आहे. संबंधित शिक्षक हे माहिती अधिकाराचा वापर करून विनाकारण प्रशासनाला व अधिकार्यांेना त्रास देण्यात पटाईत आहे.

शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात जी कारवाई झालेली आहे ती माझ्यामुळे झालेली आहे व शिक्षण विभागात माहिती अधिकार अर्ज टाकून अधिकार्यां ना घरी पाठविण्याच्या धमक्या सदर शिक्षक देत आहे. तर पाठीमागे राजकीय वरदहस्त असल्याचे तो सांगत आहे. शेटे हा शालेय व्यवस्थापन समितीला व ग्रामस्थांना एकप्रकारे धमक्या देत आहे. तसेच संबंधित शिक्षक हा स्वतःला अपंग म्हणून सांगत आहे. कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक गावागावांमध्ये ग्रामसुरक्षा समिती तसेच विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. विलगीकरण कक्षावर शेटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तरी हा शिक्षक गैरहजर होता. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. तसेच मुलांना मिळणारा शालेय पोषण आहार प्रत्येक मुलाच्या पालकांना शाळेत बोलून दिला जातो. या शिक्षकांने कोणत्याही विद्यार्थ्यास ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले नाही व वर्गातील कोणत्याही मुलांना पोषण आहार तसेच इयत्ता तीसरीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप केलेले नाही. शालेय विविध कामकाजासाठी नेहमीच गैरहजर राहून सदर शिक्षक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करुन शासनाची फसवणुक करीत आहे. हा शिक्षक मौजे तिखोल (ता. पारनेर) येथील रहिवासी असून, शाळेत शिकवणारे सर्व शिक्षक हे जवळच्या अंतरावर राहत आहे. परंतु शेटे हा ४०  किलोमीटर दूर त्यांच्या मूळ गावी राहत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मनमानी पध्दतीने वागणार्याा, शालेय प्रशासनास त्रास देत देणार्याा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार्यान वादग्रस्त शिक्षक धोंडीबा शेटे याला तात्काळ निलंबित करुन कायमस्वरुपी बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कापड बाजार घास गल्ली येथील ड्रेनेज व पाईपलाइनचे काम रेंगाळले

खड्डे खोदून काम अर्धवट सोडल्याने नागरिकांसह बाजारपेठेतील व्यापारी व ग्राहकांचे हाल

वेब टीम नगर : शहरातील कापड बाजार घास गल्ली येथे महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या ड्रेनेज व पाईपलाइनचे काम सुरु आहे. मात्र काही दिवसांपासून रस्त्यावर खड्डे खोदून हे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. रस्त्यावर खड्डे तसेच उघडे असून, त्यालगत मातीचे व गाळचे ढिगार तसेच सोडून देण्यात आले आहे. यामुळे येथील नागरिकांसह बाजारपेठेतील व्यापारी व ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या दोन दिवसात सदर काम सुरु न केल्यास समाजवादी पार्टीच्या वतीने महापालिका कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी दिला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गटई कामगारांच्या विविध प्रश्ना-साठी चर्मकार विकास संघाचे पुणे येथे उपोषण


वेब टीम नगर : पुणे जिल्ह्यातील गटई कामगारांच्या विविध प्रश्नाणसाठी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर गटई आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय बनसोड यांनी केलेल्या उपोषणाला यश आले आहे. कष्टकरी गटई बांधवांच्या पीच परवाना, गटई स्टॉल, अतिक्रमण विभागाकडून होणारी चुकीची कारवाई, अपघात विमा, आरोग्य विमा, पेन्शन योजना, घरकुल योजना अशा विविध न्याय-हक्काच्या मागण्यासाठी हे उपोषण करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या उपोषणाची दखल घेत पुणे येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच सामाजिक न्याय विभाग, पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील संबंधित अधिकार्यांवची संयुक्त बैठक घेण्याच्या सुचना केल्या. तर लवकरात लवकर गटई कामगारांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्वांसन दिल्याने शासकीय प्रतिनीधी डांगे व चर्मकार विकास संघाचे पदधिकारी यांच्या हस्ते लिंबु पाणी देऊन संजय बनसोड यांचे उपोषण मागे घेण्यात आले.

या उपोषणात जिल्हाध्यक्ष डॉ. किसनराव कांबळे, कार्याध्यक्ष महेंद्र साळवे, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा पाचरणे, निवृती पाचरणे, शहराध्यक्षा सुनिताताई शिंदे, युवानेते वैभव खैरे, अमोल वाघमारे, निलेश काबंळे, किरण मोरे, मुंबई पदधिकारी राजनंदन चव्हाण, भगवान चिपळुनकर, बाबासाहेब सातपुते, प्रविण सावंत, प्रतिम देसाई, परशुराम तिखे, बळीराम सोनवणे, फिलिप प्रान्सेस, संतोष चव्हाण, रामदास टिपारे, स्मिताताई शिंदे आदिंसह राज्यातून आलेले चर्मकार विकास संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कला-गुणांना वाव देणारे उपक्रम विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणारे

आ.संग्राम जगताप : तिळवण तेली समाज ट्रस्ट व अशोका आर्ट फौंडेशनच्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

    वेब टीम  नगर : महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे, आपल्या संतांनी आपल्या सत्कार्याने समाजाला जागृत करुन दिशा देण्याचे काम केले आहे. संताजी जगनाडे महाराज हे सर्वसमाजासाठी आदर्शवत आहेत. त्यांचे विचार आपल्या जीवनात दिशादर्शक आहेत. त्यांच्या कार्याचे आपण सदैव स्मरण ठेवले पाहिजे. तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने नगरमध्ये चांगले काम होत आहे. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविलेला चित्रकलेचा उपक्रम मुलांचे मनोबल वाढविणारा आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

     तिळवण तेली समाज ट्रस्ट व अशोका आर्ट फौंडेशनच्यावतीने  संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर मालनताई ढोणे, प्रा.माणिकराव विधाते, अॅयड.अभिषेक भगत, स्वरुप नागले, उपाध्यक्षा निता लोखंडे, सचिन शेंदूरकर, प्रकाश सैंदर, प्रसाद शिंदे, सागर काळे, गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, मनोज क्षीरसागर, शशिकांत देवकर, फौंडेशनचे अशोक डोळसे  आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्या, तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबवून समाज उन्नत्तीचे काम केले जात आहे. या माध्यमातून समाज जोडण्याचे काम केले जात आहे. त्यांच्या उपक्रमास आपलेही सहकार्य राहील, असे सांगितले.

     प्रास्तविकात अशोक डोळसे यांनी सांगितले की, या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ५५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धकांकडून ही चित्र मागविण्यात आली होती. अतिशय मोठा प्रतिसाद या स्पर्धेस मिळाला असून, त्यातील चित्रेही आकर्षक व सुबक काढण्यात आली आहेत. एकूण सहा गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ  पारितोषिके देण्यात आली. त्याचबरोबर सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपत्रेही देण्यात आली असल्याचे सांगून स्पर्धेचा निकाल जाहीर केला. गट क्र.१ - आराध्या ढवळे, आराध्या सरनाईक, पुजा ताटी. गट क्र.२ - विराज भुतकर, अपुर्वा कुलकर्णी, मान्यता कासार. गट क्र.३ - आर्या निंबाळकर, शर्वरी खराडे, शतांषी लोणकर. गट क्र४ - अमृता खाडे, अन्वेशा मंत्री, अर्चना ताटी. गट क्र.५- प्रतिक वालझाडे, ऋषीकेष बोस्टे, सुरज करंडे, खुला गट - गणेश भांगरे, कृष्णाकांत सुरोशे, रोहन धोंगडे.

     परिक्षक म्हणून अशोक डोळसे, विनायक सापा, राजेंद्र धस, सतिश सिद्दम, विवेक भारताल आदिंनी काम पाहिले. कार्यक्रमास सचिन म्हस्के, निलेश इंगळे, श्रीकांत सोनटक्के, कृष्णकांत साळूंके, आकाश दंडवते, विजय दळवी, देवीदास साळूंके, दत्तात्रय करपे, दिलीप साळूंके आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत सोनटक्के यांनी केले तर आभार स्वरुप नागले यांनी मानले.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कै.श्रीनिवास कनोरे यांच्या स्मरणार्थ रविवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर                                               

वेब टीम  नगर : साईसेवा प्रतिष्ठान(ट्रस्ट),अ.नगर,के.के.आय बुधराणी हॉस्पिटल पुणे,स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ व जय जिव्हेश्वर प्रतिष्ठान यांच्या सयुक्त विद्यमाने कै.श्रीनिवास कनोरे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बागडपट्टी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे रविवार दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात आले आहे.या शिबिरात पुणे येथील तज्ञ  डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करण्यात येईल व योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.या नेत्र तपासणी व मोतीबिंदू  शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा.असे आवाहन साईसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश झिंजे यांनी केले आहे.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments