नगर बुलेटीन

 नगर बुलेटीन 

जीवन सहज, सुंदर आणि स्थिर बनविण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज :७३ व्या वार्षिक निरंकारी संत सत्संगाची यशस्वीरित्या सांगता

   वेब टीम  नगर : ‘‘जीवन सहज, सुंदर आणि स्थिर बनविण्यासाठी दिव्य गुणांचा स्रोत असलेल्या परमात्म्याशी नाते जोडा.’’ असे विचार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मानवतेला प्रेरित करताना तीन दिवसीय ७३ व्या व्हर्च्युअल वार्षिक निरंकारी संत सत्संगात आपल्या प्रवचनातून व्यक्त केले. या संत सत्संगाचा संत निरंकारी मिशनची वेबसाईट व संस्कार टी.व्ही.चॅनलच्या माध्यमातून जगभर पसरलेल्या लाखो भाविक भक्तगणांनी आनंद घेतला.

     सद्गुरु माता सुदीक्षाजी म्हणाल्या, की जीवनातील प्रत्येक पैलुमध्ये स्थिरतेची गरज आहे. परमात्मा स्थिर आहे, शाश्वीत आहे आणि एकरस आहे. जेव्हा आपण आपले नाते याच्याशी जोडून ठेवता तेव्हा मनामध्येही स्थैर्य येते आणि आपली विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यायोगे जीवनातील चढ-उतारांचा सामना आपण सहजपणे करु शकतो.

     पहिल्या दिवसाच्या मुख्य प्रवचनामध्ये सद्गुरु माताजींनी सांगितले, की सृष्टीमध्ये कोणतीही वस्तू स्थिर नाही. प्रत्येक वस्तुमध्ये परिवर्तन घडून येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव करुन दिली, की कोणतीही वस्तू कधीही नष्ट होऊ शकते. अशा नश्व.र आणि अस्थिर वस्तूंच्या आसक्तीमुळेच आपले मन विचलीत होते आणि त्याचा प्रभाव भावनिक, मानसिक आणि शारीरिक रुपात आमच्या जीवनावर पडत असतो.  अशा अवस्थेमध्ये आमच्या मनाला आधार देऊ शकते ती केवळ ‘स्थिरता’. आपण जेव्हा ‘स्थिरता’ धारण करतो तेव्हा शाश्वेत आनंदाबरोबरच सदृढपणे मानवीयतेच्या दिशेने अग्रेसर होऊ शकतो.

  सत्संगाच्या दुसर्यास दिवसाचा प्रारंभ एका रोमहर्षक सेवादल रॅलीने झाला ज्यामध्ये देश-विदेशातील सेवादल बंधु-भगिनींनी सेवादल प्रार्थना, कवायत, खेळ तसेच विविध भाषांमध्ये लघुनाटिकांच्या माध्यमातून मिशनचा संदेश प्रस्तुत केला. 

     सद्गुरु माताजींनी म्हटले, की जर आपल्याला सेवा करायची असेल तर ती केवळ आपल्या परिवारापर्यंत सीमित न ठेवता अवघ्या जगताची करायची आहे. कारण सेवादार ‘मानवता है धर्म हमारा, हम केवल इन्सान है’ असा भाव धारण करतो. सेवेला सौभाग्य समजून विनम्रभावाने करावी, त्यामध्ये उपकाराचा भाव नसावा. 

    सत्संगाच्या समारोप  सत्रामध्ये  सायंकाळी एक बहुभाषी कवि संमेलन आयोजित करण्यात आले ज्यामध्ये देश-विदेशातील२१कवीनी ‘स्थिर प्रभुशी मनाला जोडू या, जीवन आपुले सहज करू या’या शीर्षकावर आधारित कविता हिंदी, पंजाबी, हरियाणवी, राजस्थानी आणि इंग्रजी भाषांतून आपापल्या सादर केल्या. या कवीनी आपल्या कवितांच्या माध्यमातून मानवी जीवनात स्थिरतेचे महत्व समजावून स्थिरतेच्या प्रत्येक पैलुवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.

   सत्संगाच्या तिन्ही दिवशी भारतासह जगभरातील ब्रह्मज्ञानी संत वक्त्यांनी विविध भाषांच्या माध्यमातून सत्संगामध्ये आपले उद्बोधक विचार मांडले. तसेच संपूर्ण अवतार बाणी तथा संपूर्ण हरदेव बाणी या काव्यमय रचनांमधील पदांचे सुमधूर गायन, पुरातन संतांची भजने, अभंगवाणी आणि मिशनच्या गीतकारांच्या प्रेरणादायी रचनांचे गायन करुन सत्संगाचा आनंद घेणार्या  श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

     आपापल्या घरांमध्ये बसूनच व्हर्च्युअल रुपात लक्षावधी भक्तगणांनी आणि जनसामान्यांनी या संत समागमाचा आनंद प्राप्त केला आणि पुढील सत्संग प्रत्यक्ष रुपात मैदानावर आयोजित व्हावा अशी मनोमन प्रार्थनाही केली. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मतदान केंद्रातील बीएलओच्या कामावर माध्यमिक शिक्षकांचा बहिष्कार

जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन

वेब टीम नगर : माध्यमिक शिक्षकांना १ जानेवारी २०२१ अर्हता दिनांकावर मतदान केंद्र अधिकारी म्हणून बीएलओच्या दिलेल्या नियुक्तीच्या कामावर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या नोटिसाचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, एम.एस. लगड, महेंद्र हिंगे, रमाकांत दरेकर, काकासाहेब देशमुख, शहाजी काळे, सम्राट शिंदे, श्रीकांत म्हस्के, अशोक लष्कर, अंकुश बर्डे, सचिन गोरे, भाऊसाहेब पवार, गणेश पोकळे, महादेव घोडके, शिरीष टेकाडे, भगवान मते, संतोष भालसिंग, अवीनाश भुतारे, बी.जे. शिंदे, एम.बी. काळे आदिंसह शिक्षक उपस्थित होते.

१ जानेवारी २०१९ या अहर्ता दिनांकावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील नववी, दहावीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षक तसेच विद्यालयातील लिपिक यांना आदेश देण्यात आलेले आहेत. सध्या माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षकांना दहावी बारावीचे वर्ग तसेच पाचवी ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापनाची किचकट प्रक्रिया सुरू आहे. याच काळात नववी व दहावीला शिकवणार्या  शिक्षकांना बीएलओ ऑर्डर प्राप्त झाले आहे. यासंदर्भात न्यायालयाने सुद्धा शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नये अशा प्रकारे निकाल दिलेला आहे. हे कामे ऐच्छिक असताना सुद्धा या कामासंदर्भात शिक्षकांना जबरदस्तीने ऑर्डर दिल्या जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर या शाळाबाह्य कामावर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खासगी अनुदानित, अल्पसंख्यांक शाळांमध्ये लिपिक ,

 शिक्षकेतर कर्मचार्यां-ची पदे भरण्यास परवानगी द्यावी

सर्वच कामे शिक्षक करत असल्याने शैक्षणिक कामांवर परिणाम 

बाबासाहेब बोडखे : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वेब टीम नगर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खाजगी अनुदानित व अल्पसंख्यांक शाळांमध्ये लिपिक व शिक्षकेतर कर्मचार्यां च्या पद भरतीस परवानगी देण्याच्या मागणी करण्यात आली आहे. शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, संघटन मंत्री सुहास हिर्लेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

कोरोनाच्या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या पदभरती बंदीमधून दि. ७ डिसेंबर रोजी शिक्षणसेवक पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे सुरु असलेली शिक्षणसेवक भरती प्रक्रिया वगळून शिक्षणसेवक भरती सुरू करण्यात आल्याच्या निर्णयाचे शिक्षक परिषद स्वागत करीत आहे. अनेक शाळांमध्ये एकही लिपिक नसून, शिक्षकच लिपिकांची कामे करत आहेत. काही ठिकाणी शाळा स्वच्छतेची कामेही शिक्षकच करत आहेत. अनेक वर्षे शिक्षकेत्तरांचा आकृतीबंध निश्चिित न केल्याने लिपिक पदे भरलेली नाहीत. परंतु आता सन २०१८ - २०१९ ची शिक्षकेत्तरांची संचमान्यता झाली असून, ज्या शाळांमध्ये एकही लिपिक नाही, अशा शाळांमध्ये शिक्षकच लिपिकपदाचे कार्य करत असल्याने शैक्षणिक कामांवर परिणाम होत आहे. तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने सर्व कामे शिक्षकच करत आहेत. अल्पसंख्यांक शाळांमध्येही अशीच परिस्थिती आहे. शिक्षण संचनालय, पुणे यांनी काही महिन्यांपूर्वीच शिक्षकेतरांच्या समायोजनाचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाला दाखल केल्याचे समजते. त्यास मान्यता देऊन समायोजन पूर्ण करुन जिथे पदे रिक्त आहेत, ती पदे तातडीने भरण्याचे निवेदनात म्हंटले आहे. लिपिकांना तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी यांना पदभरती बंदीमधून वगळावे आणि लिपिकची पदे व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी पदे तातडीने भरण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. शाळेतील सर्वच कामे शिक्षक करत असल्याने शैक्षणिक कामांवर परिणाम होत आहे. तरी शासनाने सदर प्रश्नीप दखल घेऊन हा प्रश्ने तात्काळ सोडविण्याचे बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोनाच्या संकटकाळात सेवा करुन देखील घरी जाण्याची वेळ

 जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना कामावर पुन्हा रुजू करुन न्याय देण्याची मागणी

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन न्याय देण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, गणेश निमसे, दीपक गुगळे, अमित गांधी, मच्छिंद्र गांगर्डे, शहानवाज शेख, अजय सोळंकी, संतोष उदमले, वसीम शेख, फारुख शेख, लक्ष्मण साळे, प्रशांत डहाळे, संतोष त्रिंबके, सुनील साळवे, निलेश सातपुते, योगेश घोलप, शहाबाज शेख, शब्बीर सय्यद, निलेश चौधरी, सोमनाथ पवार, अजय शिंदे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.  

दोन वर्षापासून अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत १७  सुरक्षारक्षक जिल्हा रुग्णालयात सुरक्षेचे काम करत होते. या सुरक्षारक्षकांनी ७ महिने कोरोनाच्या संकटकाळात चोख पद्धतीने आपले कर्तव्य बजावले. तरी रुग्णालयाने मागील नऊ महिन्याचे त्यांचे वेतन थकवले होते. यासाठी नाशिक विभागाने निधीची पूर्तता केली होती. परंतु कार्यालयीन हलगर्जीपणामुळे १ कोटी ३० लाख ७४ हजार एवढा निधी मागे गेला. सुरक्षारक्षकांना वेतन वेळेवर झाले असते, तर त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली नसती. नाशिक विभाग उपसंचालक मंडळाने या सुरक्षारक्षकांना कामावर रुजू करून घेण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला विनंती अर्ज केला होता. परंतु रुग्णालय प्रशासनाने सुरक्षारक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ केली आणि सुरक्षारक्षक विरोधात चुकीची माहिती नाशिक विभागाला कळवली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न दुसर्याक संस्थेकडून गार्ड घेण्याचे आहे. या सुरक्षारक्षकांनी नाशिक विभागाला संपर्क करायला नव्हता पाहिजे असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे होते. हाच राग मनात धरून पगार वारंवार मागू नये यासाठी सुरक्षा रक्षक बदलून घेण्याचे ठरविले आहे. सर्व सुरक्षारक्षक यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर वारंवार पगाराची मागणी करणार नाही, आपल्या अटी व शर्ती मान्य असल्याचे लिहून देण्यास तयार होते. तरी देखील त्यांना हजर करुन न घेता इतर कंत्राटी कामगारांना कामावर रुजू करुन घेण्याचा मनमानी कारभार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला असल्याचे निवेदनता म्हंटले आहे. तरी तातडीने जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा दि.१५ डिसेंबर नंतर सुरक्षारक्षकांच्या परिवारासह जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनाबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पार्सल सेवेत  माथाडी कायदा लागू करावा

राष्ट्रवादी माथाडी ,जनरल कामगार युनियनची मागणी

वेब टीम नगर :  माथाडी मंडळाच्या अंतर्गत येणार्याे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पार्सल सेवेच्या ठिकाणी माथाडी कायदा १९६९ नुसार अंमलबजावणी करण्याच्या मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या वतीने  माथाडी कार्यालयाचे निरीक्षक एस.सी. देवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनचे शहर जिल्हाध्यक्ष ऋषिकेश ताठे, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष सागर गुंजाळ, राजू पवार, गणेश झीकरे, विशाल मांडे, निखिल ताठे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

माथाडी मंडळाच्या विभागात येणार्याक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मर्यादित (एसटी) यांचे जितके बस स्थानक आहे. त्या ठिकाणी कामगार पार्सलचे उतराई, चढाई, वाहतूक, थापी ही माथाडी स्वरूपाची कामे करीत आहे. परंतु परिवहन मंडळाने हे सर्व कामे खाजगी ठेकेदारास दिले आहे. परंतु त्या ठेकेदाराने ही सर्व कामे माथाडी स्वरूपाची असून मालक व कामगारांची नोंद केलेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. परिवहन मंडळ यांची एक मालक म्हणून नोंद करून कामगारांची सुद्धा नोंद करावी, कामगारांची चालवलेली पिळवणूक थांबवावी व माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय - डॉ परवेज अशरफी

वेब टीम नगर : गेल्या १० वर्षा पासून अहमदनगर येथील फेज २ चे काम रखडले आहे. जेव्हा विचारणा केली तर ६ महिन्यात पूर्ण होईल असे  उत्तर देण्यात येते  परंतु १० वर्षानंतर ही फेज २ चालू न झाल्याने या मागचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. जवळ जवळ पूर्ण शहरात फेज २ ची पाईप लाईन पूर्ण झालेली असून ती चालू का करत नाही हा प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे.

महानगर पालिके समोर मुकुंदनगर भाग आहे जो महापालिकेच्या  हद्दीत असून सुद्धा  महापालिकेच्या  सुविधा पासून वंचित आहे. पिण्याचे पाण्याचा प्रश्न असो, की गटारीचा असो, किंवा रस्त्याचा. कोणताही महानगर पालिकेचा काम दिलेल्या वेळात एक ही ठेकेदारांनी केलेला दिसून आले नाही. पाऊसच्या महिन्यात मुकुंदनगरवासीयांच्या घरात पाऊसाचा आणी गटारीचा पाणी शिरतो. तक्रार केली तर पालिकेकडे माणसं  उपलब्ध   नसतात, असले तर एक किंवा दोन माणसावर सर्व काम सोडून दिलेले असते जे शक्य नाही.

मुकुंदनगर भागात १५ वर्षा पूर्वी एक पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्याचा फायदा आज तागायत सामान्य नागरिकांना झालेला नाही. लोकप्रतिनिधी बदलले, आमदार , खासदार बदलले परंतु एकानेही मुकुंदनगर भागातील पाण्याची टाकी चालू करून मुकुंदनगर वासियांना सुरळीत पाणी पुरवटा होईल असे काम केलेले दिसत नाही.

लोकप्रतिनिधींना भरगोस मतांनी निवडून दिले परंतु आज पण मुकुंदनगर मुलभूत गरजे  पासून वंचित आहे. असे  गंभीर आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले. पालिका अहमदनगर मध्ये पाण्याची  टाकी उभारत असेल तर चांगली बाब आहे परंतु ज्या पाण्याचे टाक्या १० -१५ वर्षा पासून उभारून उपयोगात आणले नाही त्याचे काय ? असा प्रश्न डॉ अशरफी यांनी केला

एम आय एम तर्फे महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात पुढे लिहिले आहे की जसे पालिका हद्दीतल नागरिक पालिकेचा कर भरतात तसेच मुकुंदनगर भागात राहणारे नागरिक भरतात. पण सोय आणी सवलत हे मुकुंदनगर भागात तुलनेने कमी असल्याचे दिसते. याचे कारण मुकुंदनगर भाग हा मुस्लीम बहुल असल्यामुळे हि वागणूक दिली जात असावी. महानगर पालिका आयुकत्ताना निवेदन देऊन अहमदनगर शहराची प्रगती साठी शहरासोबत मुकुंदनगर भागाचा विकास गरजेचे असल्याचे सांगितले.

निवेदनावर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, जिल्हा उप अध्यक्ष मुफ्ती अल्ताफ, फिरोज शेख, मास शहर अध्यक्ष अमीर खान , आरिफ सय्यद, समीर बेग, सलमान खान आदी. सह्या आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आराध्या जासूद ऑलंपियाड आंतरराष्ट्रीय परीक्षेत गणित विषयात प्रथम

वेब टीम नगर : दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथील आराध्या जासूद हिने नुकत्याच झालेल्या सायन्स ओलंपियाड फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय परीक्षेत गणित विषयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आराध्या बदलापूर येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकत आहे. त्याचे वडिल अतिश जासूद हे सध्या मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. तीला गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समीर पिंपलकर व वर्ग शिक्षिका पूजा गडवी यांचे मार्गदर्शन लाभले. तीने मिळवलेल्या यशाबद्दल दैठणे गुंजाळ येथील माजी सरपंच पै. पांडूरंग (बंटी) गुंजाळ, अशोक केदार, शिवाजी लावंड, सबाजी येवले, बापू गुंजाळ, संदीप जासूद, विलास गडाख, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी अभिनंदन केले असून, तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एमआयडीसी मधील घरकुल वंचितांना देखील मिळणार घरासाठी जागा


मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा निर्णय : आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजना

   वेब टीम  नगर :  मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महसुल गांव निंबळक (ता. नगर) सर्व्हे नं. ५४ येथील दहा एकर जमीनीवर आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेतून घरकुल वंचितांना घरांसाठी जागा उपलब्ध करुन दिली असताना, एमआयडीसी मधील घरकुल वंचितांना देखील जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर घरकुल वंचितांचा प्रश्न, सोडविण्यासाठी डायनॅमिक सोशल इंजीनियरिंग प्रोसेस तंत्र अवलंब करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अॅिड. कारभारी गवळी यांनी दिली. 

घरकुल वंचितांचा प्रश्ना डायनॅमिक सोशल इंजीनियरिंग प्रोसेस तंत्राने सोडवता येणार आहे. या तंत्राचा वापर देशाच्या प्रगतीसाठी करता येणे शक्य आहे. परंतू देशातील लोकप्रतिनिधी व शासकीय प्रणाली या तंत्रापासून लांब आहे. यामुळे सर्वसामान्य घरकुल वंचितांचे प्रश्नॅ स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतर देखील सुटलेले नाहीत. संघटनेच्या वतीने डायनॅमिक सोशल इंजीनियरिंग प्रोसेस तंत्र अवलंब करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

निंबळक येथील आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेतून २३० घरकुल वंचितांना ८० हजार रुपयात एक गुंठा जमीन देण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एमआयडीसी येथील घरकुल वंचितांना देखील घरासाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेक कामगारांना या प्रकल्पाच्या माध्यमातून हक्काचा निवारा मिळणार आहे. घरे नसल्याने एमआयडीसीतील कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कामगारांना हक्काची घरे मिळणार आहे. कामगारांकडून अर्ज स्विकारण्याचे काम सुरु करण्यात आले असून, घरकुल वंचित कामगारांनी त्वरीत अर्ज भरुन देण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अॅवड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, पोपट भोसले, हिराबाई ग्यानप्पा, विठ्ठल सुरम, अंबिका जाधव, विमल सांगळे, रोहिणी पवार, हिराबाई शेकटकर, लतिका पाडळे, फरिदा शेख आदि प्रयत्नशील आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments