तृप्ती देसाई यांना अटक व सुटका

 तृप्ती देसाई यांना अटक व सुटका  

वेब टीम शिर्डी : साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोडबाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर आता या फलकावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. तृप्ती देसाई आज शिर्डीला बोर्ड हटविण्यासाठी जात असताना त्यांना अहमदनगरच्या सुपे टोलनाक्यावर अडवण्यात आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिर्डीपासून १०० किलोमीटर आधीच तृप्ती देसाई आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.तिथून त्यांना सुपे पोलीस ठाण्यात नेलं गेलं.  

यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या की,  आज मानवाधिकार दिन आहे, त्या दिवशी आम्हाला अडवलं आहे. साई संस्थाननं लावलेला बोर्ड हटवण्यासाठी जात आहे. पोलिस म्हणत आहेत, चर्चा करा. मात्र संविधानाच्या अधिकाराचं हनन आहे. आमची भूमिका आहे की पोलिसांनी आमच्यासोबत यावं आणि बोर्ड हटवण्यास मदत करावी. असा निर्णय घेणाऱ्या शिर्डी संस्थानवर कारवाई करायला हवी मात्र इथं आम्हालाच अडवलं जात आहे असं त्या म्हणाल्या.  काहीही केलं तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. आम्ही शांततापूर्ण वातावरणात जात आहोत. आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, मात्र आम्ही जाणारच आहोत, असं देसाई म्हणाल्या.


तृप्ती देसाईंच्या भूमिकेविरोधात स्थानिक शिवसेना महिला पदाधिकारी आणि शिर्डीच्या ग्रामस्थांनी कडक भूमिका घेतली आहे. धार्मिक स्थळांना भेट देताना काही संकेत पाळणं गरजेचं आहे त्यामुळे तृप्ती देसाईंना धडा शिकवू असं म्हटलं आहे. अहमदनगर पोलिसांनी संघर्ष टाळण्यासाठी तृप्ती देसाई यांना 8 ते 11 डिसेंबरपर्यंत शिर्डीत येण्यास मज्जाव केला आहे. त्यानंतरही तृप्ती देसाई या शिर्डीला जाण्यावर ठाम होत्या.


दरम्यान सायांकाळी तृप्ती देसाई यांची मुक्तता करण्यात आली मात्र यावेळी त्यांनी  ३१ डिसेंबर पर्यंत बोर्ड हटवले नाही तर जानेवारी महिन्यात पुन्हा शिर्डीत आंदोलन करण्याचं इशारा त्यांनी दिला.  

Post a Comment

0 Comments