त्यांना घरात घुसून फाटकावायला हवं ......
वेब टीम दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता व्यापक रूप धारण करतांना दिसत आहे.सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी, या आंदोलनामागे विरोधकांचा हात असल्याचे म्हणतानाच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मात्र या आंदोलनाबाबत एक अजबच विधान केलं.सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा यात हात असल्याचा दावा करताच त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर कडक टीका करतांना दानवेंनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. खरेतर दानवेंसारख्यांना घरात घुसून फटकवायला हवं असंही कडू म्हणाले. “गेल्या वेळी जेव्हा दानवे यांनीअशी बाष्फळ बडबड केली तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे”, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.
0 Comments