आम्हाला पोलीस संरक्षण द्या : रुणाल जरे

 आम्हाला पोलीस संरक्षण द्या : रुणाल जरे 

वेब टीम नगर : जरे हत्या कांड पर्काकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या पासून आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका असल्याने आम्हाला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल भाऊसाहेब जरे  याने पोलीस अधीक्षकांकडे सोमवारी एका निवेदना द्वारे केली आहे. बोठे याचे नेहेमी आमच्या घरी येणे जाणे असायचे तो माझ्या आईला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. तुला नाहीतर तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही असेही म्हणायचा. त्याची आमच्यावर मोठी दहशत असल्याने आम्ही त्याच्या विरोधात बोलत नव्हतो. त्याच्या विरोधात माझ्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात अर्जही दिला होता. आमच्या कुटुंबियांना बोठे याच्या पासून धोका असल्याने आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे असे या निवेदनात म्हंटले आहे.       Post a Comment

0 Comments