बांधावर जाऊन शेतकऱ्यांना विचारा : सतेज पाटलांचा टोला

 बांधावर जाऊन शेतकऱ्यांना विचारा : सतेज पाटलांचा टोला 

वेब टीम कोल्हापूर : केंद्राच्या कृषी कायद्याचं समर्थन करणाऱ्या भाजपनं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारावं. म्हणजे शेतकरी पायातील हातात घेऊन सांगतील हा कायदा शेतकऱ्यांच्या बाजूचा आहे की विरोधातला आहे, अशी टीका कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

उद्या होणाऱ्या भारत बंदमध्ये सर्व नागरिकांनी शांततेनं सहभागी व्हावं. आपल्या घरावर केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काळा झेंडा लावावा. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या तरुण मुलांनी मोबाईचा डीपी काळा लावून शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहावं असं आवाहन या वेळी सतेज पाटील यांनी केलं. आपला या आंदोलनाशी काहीही संबंध नाही अशी भावना मनामध्ये न आणता सगळ्यांनी यात सहभागी व्हावं. चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरुन भाजपची शेतकऱ्यांबद्दल असलेलं प्रेम दिसून आलं. चंद्रकांत पाटील यांनी अधिकृत भूमिका मांडली आहे..यामधून शेतकरी उद्ध्वस्त करण्याची भूमिका दिसतेय अशीही टीका सतेज पाटील यांनी केलीय.

Post a Comment

0 Comments