दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करा : सायरा बानो

दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करा : सायरा बानो 

वेब टीम मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार हे ९८ वर्षाचे आहेत.अशातच सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या तब्येतीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. सायरा बानो यांनी म्हटलं आहे की, "दिलीप कुमार थकले आहेत. तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी झाली आहे." एवढंच नाहीतर सायरा बानो यांनी सर्वांना दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.

११ ऑक्टोबर रोजी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. परंतु, यंदाच्या वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांचं निधन झाल्यामुळे त्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केलेला नाही. दरम्यान, या खास दिवशी सायरा बानो यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की, "११ ऑक्टोबर माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर दिवस आहे. या दिवशी दिलीप कुमार साहब यांनी माझ्याशी लग्न करुन माझं स्वप्न पूर्ण केलं होतं. सर्वांना माहिती आहे की, आम्ही आमच्या कुटुंबातील दोन भाऊ एहसान आणि असलम यांना गमावलं आहे."दरम्यान, दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाला ५४ वर्ष पूर्ण झाली आहेत. दिलीप कुमार यांचं खरं नाव मुहम्मद यूसुफ खान आहे. त्यांनी १९४४ मध्ये आलेला चित्रपट 'ज्वार भट्टा'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी आपलं नाव बदललं.


Post a Comment

0 Comments