टाकळी कडेवळीत जंगलात आग

 टाकळी  कडेवळीत जंगलात आग 

लाखो रुपयांची संपत्ती जाळून खाख 

वेब टीम श्रीगोंदा : श्रीगोंदा  तालुक्यातील टाकळी कडेवळीत याठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून जंगलामध्ये आग लावण्यात आली असून या आगीमध्ये लाखो रुपयांची संपत्ती जळून खाक झाल्याची घटना घडली असून याबाबत वनविभाग मात्र अनभिज्ञ पाहण्यात मिळत आहेत माहिती देऊनही घटनास्थळी लवकर कोणी न आल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. 

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत याठिकाणी वनविभागाची मोठ्या प्रमाणात जमीन असून या याठिकाणी जनावरांसाठी चारा चारण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्षेत्र असून प्रमाणात आर्थिक क्षेत्र असून याच्याच लगत वनविभागाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र असून यामध्ये मोठ्या प्रमाणात ससे हरिण ससे पक्षी जनावरे असून या जंगलामध्ये हे अज्ञात व्यक्तीने आग लागल्यामुळे मोठ्याप्रमाणात जंगलातील वनसंपत्ती जळून खाक झाली असून याबाबत वन विभागाला माहिती देऊनही वन विभागाचा कोणताही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नसून गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आग विजवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला असून त्यात काही प्रमाणात आग आटोक्यात आली असून अजूनही आग  विजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आग आटोक्यात येण्याची चिन्हे काही दिसत नसल्याचे चित्र आहे. मात्र याबाबत राज्याचे राज्य वनमंत्री दत्ता भाऊ भरणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश पारित केल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जागा सोडल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे याबाबत राज्यमंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत मात्र वन विभागाच्या गलथान कारभारामुळे वनविभागातील लाखो रुपयांची नैसर्गिक संपत्ती जळून खाक झाली आहे त्यामुळे यापुढे जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार असून तसेच जंगलातील वनचर पशु चार पक्ष्यांना तसेच जनावरांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागणार आहे हे मात्र नक्की.


Post a Comment

0 Comments