हि तर केंद्र सरकारच्या कर्माची फळं

हि तर केंद्र सरकारच्या कर्माची फळं 


वेब टीम मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उग्र बनत चाललेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. 'प्रकाशसिंग बादल, शरद पवार यांच्यासारख्या मान्यवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याचे सौजन्य या कठीण काळात दाखविले असते तर आजची कोंडी थोडी सैल झाली असती. आज परिस्थिती बिघडत चालली आहे. ही सरकारच्याच कर्माची फळे आहेत,' असा आरोप शिवसेनेनं केला आहे.मोदी सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. हळूहळू त्यांना देशभरातून पाठिंबा मिळत आहे. त्यातच ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचं हे आंदोलन चिघळण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.  सरकारमध्ये निवडणुका जिंकून देणारे, विजय विकत घेणारे लोक आहेत, पण शेतकऱ्यांवर आलेले अस्मानी-सुलतानी संकट, बेरोजगारी अशा आव्हानांशी दोन हात करणाऱ्या तज्ञांची कमतरता आहे,' असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

Post a Comment

0 Comments