रेखा जरे हत्याकांडात वापरलेले शस्त्र जप्त

 रेखा जरे  हत्याकांडात वापरलेले शस्त्र जप्त 

 


वेब टीम नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले धारदार शस्त्र (चाकू ) आज पोलिसांनी  आरोपींकडून जप्त केले आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी  बाळ  बोठे हा अद्याप फरार असून त्याचा  शोध घेत आहेत.

 काल अजित पाटील यांनी बाळ बोथेच्या घराची पुन्हा झाडाझडती घेतली त्यात त्याचे परवाना असलेले पिस्तूल जप्त केले आहे.तसेच इतरही काही महत्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली . त्याने परदेशात पलायन करू नये म्हणून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.एवढयावरच न थांबता बाळ बोठे न सापडल्यास व शरण न आल्यास त्याची बँक खाती गोठवण्याची कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान पोलिसांनी बाळ बोठे याच्या जवळील अवैध संपत्तीही  जप्त करावी शी मागणी मनसेचे नेते खेडकर यांनी निवेदना द्वारे पोलीस अधीक्षकांकडे  केली आहे.हि मागणी पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.  

Post a Comment

0 Comments