बाळ बोठेच्या नावाची "लूकआउट" नोटीस जारी

 बाळ बोठेच्या नावाची "लूकआउट" नोटीस जारी  

वेब टीम नगर : रेखा जरे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या नावाची लुकआऊट नोटीस आज पोलिसांनी जारी केली.

एक तारखेपासून फरार असलेल्या बाळ मोठे यांना परदेशात पलायन करण्याचा प्रयत्न करू नये यासाठी पोलीस प्रशासनाने विमान प्राधिकरणाला या आशयाचे पत्र दिल्याचे समजते.

या लुकआऊट नोटीस मुळे बाळ बोटे परदेशात पळून जाऊ शकणार नाही बाळ बोठे हा परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने विमान प्राधिकरणाला तसे पत्र देऊन कळविण्यात आले आहे या लूक आऊट नोटीस मुळ बाळ बोठे याला विमान प्रवास करणे अशक्य होणार असल्याची माहितीही पोलीस सूत्रांकडून मिळाली.

30 डिसेंबर रोजी रेखा जरे यांची जातेगाव घाटात हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून या कटाचे मुख्य सूत्रधार आणि प्रमुख आरोपी बाळ बोठे १ तारखे पासून फरार आहेत.

Post a Comment

0 Comments