सर्वांचा विरोध पत्करून केला होता
हेट स्टोरी ३ : शर्मन जोशी
वेब टीम मुंबई : हेट स्टोरी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध एरॉटिक फिल्म फ्रेंचाईजी आहे. या मालिकेतील हेट स्टोरी ३ या चित्रपटाला आज पाच वर्ष पुर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेता शर्मन जोशी याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र या चित्रपटामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली. कुटुंबीयांनी देखील त्याला अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम न करण्याचा सल्ला दिला होता.
नुकतंच शर्मननं हेट स्टोरी ३ या चित्रपटावर भाष्य केलं. तो म्हणाला, “माझे मित्रमंडळी, कुटुंबीय आणि चाहत्यांनी देखील या चित्रपटात काम न करण्याचा सल्ला मला दिला होता. परंतु या चित्रपटाची पटकथा मला आवडली होती. शिवाय आजवर मी अशा प्रकारच्या चित्रपटात कधीही काम केलेलं नव्हतं त्यामुळे मी होकार दिला. मी एरॉटिक जॉनरमध्ये देखील यशस्वी होऊ शकतो का? हे मला पडताळून पाहायचं होतं. अर्थात या चित्रपटात खूप जास्त बोल्ड सीन होते. पण या चित्रपटानं मला एक वेगळा अनुभव दिला.
शर्मन जोशी हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘थ्री इडियस्ट’, ‘गोलमाल’, ‘रंग दे बसंती’, ‘मिशन मंगल’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. या पार्श्वभूमीवर त्याने एखाद्या एरॉटिक चित्रपटात काम करु नये अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली होती. तरी देखील त्याने हेट स्टोरीमध्ये काम केलं. या चित्रपटात त्याने काही बोल्ड सीन देखील दिले आहेत. मात्र ही दृश्य त्याच्या चाहत्यांना आवडली नाही. परिणामी त्याच्यावर टीका करण्यात आली.
0 Comments