जरे हत्या प्रकरणी पत्रकारच निघाला मास्टरमाइंड

 जरे हत्या प्रकरणी पत्रकारच निघाला मास्टरमाइंड 

वेब टीम नगर : दि.३० रोजी झालेल्या रेखा जरे हत्या प्रकरणाला आज वेगळीच कलाटणी मिळाली आज ताब्यात घेण्यात आलेल्या २ आरोपींकडू थेट सूत्रधाराच्या नावच वदवून घेण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात शहरातील मान्यवर दैनिकातील उच्चपदस्थ असलेल्या बाळ बोटे यांचे नाव घेऊन शहरातील माध्यम क्षेत्राला धक्का दिला. पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार बाळ ज. बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनीच रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती दिली. 

या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ५ जणांना अटक केली आहे . त्या व्यतिरिक्त बाळ बोठे हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. बाळ बोटे आणि सागर भिंगारदिवे यांनीच जरे हत्येची सुपारी दिल्याची कबुली अन्य आरोपींकडून मिळाली आहे.      

याबाबतची हकीकत अशी की रेखा जरे या आपल्या कुटुंबियांसमवेत पुण्याहून नगरला यायला निघाल्या असतांना त्यांची जाते गाव घाटात हत्या झाली. त्यानंतर . जरे यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यापासून ते अंत्य संस्कार होई पर्यंत बाळ बोठे याने जरे कुटुंबीयांची पाठराखण केली होती. मात्र पोलीस यंत्रणेचे त्याच्या प्रत्येक कृतीकडे बारकाईने लक्ष होतें. 


Post a Comment

0 Comments