आता तोकड्या कपड्यांना बंदी

 आता तोकड्या कपड्यांना बंदी  

वेब टीम शिरडी : देशातील तिरुवनंतपुरंममंदिरात ज्याप्रमाणे दर्शनास येतांना विशिष्ट पोशाख सक्तीचा केला आहे त्याचा प्रमाणे  देशातील  सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाताना भारतीय पोशाख बंधनकारक करण्यात आले असताना, आता शिरडीतील साईबाबा मंदिरातही भक्तांच्या पेहरावाबाबत संहिता तयार  करण्यात आली  असून भाविकांनी आक्षेपार्ह पोशाख करून दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आले. तोकडे कपडे परिधान केलेल्या भक्तांना दर्शन घेता येणार नाही.असेही यात म्हटले आहे . 

साई संस्थानच्या या निर्णयाचे शिरडी ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. मंदिरात दर्शनासाठी जाताना पोशाख किमान पूर्ण शरीर झाकणारा असावा अशी अपेक्षा आहे. मात्र अनेक भक्तगण तोकडे कपडे घालून येथे येत असल्याच्या तक्रारी साई मंदिर प्रशासनाकडे काही भाविकांनी केल्या होत्या. त्यामुळे साई संस्थान व्यवस्थापनाने मंदिरात जाताना पेहराव कसा असावा याचे फलक लावले आहेत. मंदिर प्रशासनाने उचललेले पाऊल भावी पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे या निर्णयाच्या समर्थकांचे मत आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून मोठय़ा प्रमाणात भक्त येतात. आता टाळेबंदीनंतर साई मंदिर खुले झाल्याने शिरडीत गर्दी होत आहे. त्यामध्ये काही भक्त हे तोकडे कपडे घालून दर्शनाला येत असल्याचे साई संस्थानच्या निदर्शनास आल्यानंतर साई संस्थानने हा निर्णय घेतला असून त्याबाबतचे फलक जागोजागी लावले आहेत.तसेच तोकड्या कपड्यातील भक्तांना दर्शना साठी मज्जाव करण्यात आला. अर्थात भाविकांनी या निर्णयाचे स्वागतच  केले आहे. 
Post a Comment

0 Comments