जरे हत्या प्रकरणातील आरोपींचा कसून शोध

 जरे हत्या प्रकरणातील आरोपींचा कसून शोध  

वेब टीम नगर : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्ष रेखा जरे यांचा काल सायंकाळी ८ च्या सुमारास खून झाल्याने  जिल्हात खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता, या प्रकरणी पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तातडीनं करण्यासाठी ५ पथके तयार केली आहेत. 

रेखा जरे या पुण्याहुन नगरला येत असताना जातेगावच्या घाटात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला,गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

 सिंधुबाई सुखदेव वायकर यांनी दिलेल्या माहिती वरून आरोपी  दि ३०  रोजी सायंकाळी ७. ४५ ते ८. ०० वाजे दरम्यान पुणे नगर हायवे रोड अणे जातेगाव घाट शिवार सुपा ता. पारनेर जि.अहमदनगर. या ठिकाणी मोटरसायकल क्रमांक एम एच १७-२३८० वरील दोन्ही इसम २५ ते ३० वयोगटातील त्यातील मोटर सायकल चालवणाऱ्या ने डार्क ब्राऊन रंगाचे लेदर जॅकेट घातले होते व खाली जीन्स व पायात स्पोर्ट शूज घातलेले होते त्याला दाढी व मिशी होते व दुसरा मुलगा त्यांनी ब्लॅक शर्ट जीन्स पायात स्पोर्ट शूज व डोक्याला काळे रंगाचा गॉगल लावलेला होता.त्यांनी गाडीला धक्का लागल्याचे कारणावरून फिर्यादीची मुलगी रेखा जरे  हिच्याशी वाद घालून धारदार शस्त्राने तीचे गळ्यावर वार करून तिला जिवे ठार मारले .

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ५ पथके तयार केली असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. Post a Comment

0 Comments