करोना योद्ध्यांसाठी काय केलं?बिग बीं चा केंद्राला सवाल

 करोना योद्ध्यांसाठी काय केलं?बिग बीं चा केंद्राला सवाल 

देशभरात २४ तासांत ३१ हजार ११८ नवे करोनाबाधित

वेब टीम नगर :करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतचं चाललं आहे. देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत करोना योद्ध्यांसाठी सरकार काय उपाययोजना करतंय? असा प्रश्न अभिनेते अमिताभ बच्चन यांनी विचारला. त्यांच्या या प्रश्नाला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अलिकडेच अमिताभ बच्चन यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. हर्षवर्धन यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी करोना योद्ध्यांसाठी केलेल्या उपाययोजना सांगितल्या. ते म्हणाले, “करोना योद्ध्यांना आम्ही दिवसरात्र मदत करतोय. त्यांच्या येण्या-जाण्यासाठी खास गाड्यांची सोय केली आहे. शिवाय ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण देखील दिलं आहे. जी मंडळी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र काम करतायेत त्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभं आहे. त्यांनी काळजी करु नये.” असं आश्वासन त्यांनी या मुलाखतीमध्ये दिलं.

देशातील करोना संसर्गाचा वेग काहीसा वाढल्याचे दिसत आहे. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. मागील २४ तासांत देशभरात ३१ हजार ११८ नवे करोनाबाधित आढळले असून, ४८२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९४ लाख ६२ हजार ८१० वर पोहचली आहे. सध्या देशभरात ४ लाख ३५ गहजार ६०३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ६२१ वर पोहचली आहे.


Post a Comment

0 Comments