दीपावली वार्षिक भविष्य

दीपावली वार्षिक भविष्य 

 सिंह : उत्तरोत्तर उत्कर्ष , यशस्वी वाटचाल 

हे वर्ष मानसिक समाधान देणारे जाणार आहे. कौटुंबिक सुख , समाधान, प्रयत्न पूर्वक मिळवावे लागणार आहे.आरोग्याच्या बाबतीत काळजी अवश्य घ्यावी. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना हे वर्ष अभ्यास करून यश मिळवण्यासारखे आहे.उच्च शिक्षणासाठी मनाप्रमाणे यश मिळणार आहे. आणि घरापासून बाहेरगावी जाऊन उच्च शिशिक्षणाची संधी मिळेल. काहींना परदेशी जाण्याची संधी मिळेल.कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळवता येणार आहे. नवीन शेतीवाडी घरदार फ्लॅट, बन्गला घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.हाती घेतलेल्या कामात हळू हळू यश मिळवता येईल. मित्र मैत्रिणींमध्ये कळ, वितुष्टता हळू हळू कमी होईल. सामोपचाराने घ्यावे. चैनीच्या वस्तू खरेदीमध्ये पैसे सांभाळून खर्च करावेत. जून २०२१ पर्यंत कष्ट दायक वर्ष नंतर खूपच समाधानकारक जाणार आहे. 

उपासना : रोज सूर्यदेवतेला अर्ध्य द्यावे. रविवारी उपवास करावा. रोज किमान ११ वेळा किंवा १०८ वेळा गायत्री मंत्र जप आव्यश्य करावा. 

कन्या : नियोजनात सफलता

हे वर्ष सर्वसाधारण संमिश्र स्वरूपाचे जाणार आहे. नौकरी व्यवसायात प्रगती हळू  हळू दिसून येणार आहे. महत्वाची कामे जानेवारीनंतर मार्गी लागतील. भाऊबंदकी,जवळचे नातेवाईक, आणि शेजारी मानसिक त्रास देतील. विरोधकांना धडा शिकवणारा काळ आहे मात्र सांभाळून असावे.कोर्ट कचेरीच्या त्रास करून घेऊ नका. मानसिक आरोग्य सांभाळून सर्व कामे करावीत. नवीन शेतजमीन फ्लॅट, बंगला, गाडी , इत्यादी खरेदी मनाप्रमाणे करता यरील पण आर्थिक अंदाजपत्रक सांभाळून करावे . मित्र मैत्रिणी मंडळीत सहल, पार्टी करता येईल , मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आनंद मिळवता येईल. एकूण हे वर्ष अर्धे सुखदायक अर्धे काळजीचे राहणार आहे. तेव्हा जेष्ठांचे योग्य मार्गदर्शन अवश्य घ्यावे. 

उपासना : श्री विष्णूसहस्त्रनामावालीचा जप करावा, एकादशीचा उपवास करावा. यावर्षी पशुपक्ष्यासाठी अन्नदान करावे. गुरुवारी  असेल तर गाईची पूजा करावी , गाईस हिरवा चार गावात घालावे. घराच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात वेळ मिळेल तेव्हा भजनास जावे तेथील आरती काकडा इत्यादी कार्यक्रमास शक्यतो सहभागी व्हावे, तीर्थयात्रा करावी.     

ज्योतिष : चिंतामणी देशपांडे गुरुजी.



Post a Comment

0 Comments