संगीताने मन व बुद्धीला शांती मिळते

 संगीताने मन व बुद्धीला शांती मिळते

डॉ. रेश्मा चेडे :म्युझिकल स्टार्स ग्रुप तर्फे दिवाळीनिमित्त संगीत रजनी 

वेब टीम नगर- माणसाचे दैनंदिन जीवन तसेच पळापळी चे झालेले असताना कोरोना मुळे दैनंदिनीही मंदावली होती. कोरोना मुळे प्रत्येकाची मन व बुद्धी फार विचलित झाली होती. काम थांबले होते. रोजगार कमी होत होते. नातेगोत्यातील माणसं दुरावली जात होती. अशा वेळी माणसाचे मन व बुध्दिला शांती देण्याचे काम संगीत करत होते. असे प्रतिपादन डॉ. रेशमा चेडे यांनी केले.

अँड.अमिन धारणी व  अँड.गुलशन धारणी यांच्या पुढाकाराने म्युझिकली स्टार्स फेसबुक पेजच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने रहमत सुलतान सभागृहात संगीत रजनी मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. फिजिकल डिस्टन्स ठेवून प्रत्येक रसिकाची थर्मल चाचणी व त्यांना सँनिटायझर करण्यात आले. तर संपूर्ण सभागृह सैनीटायझर करण्यात आले होते. हॉलमधून कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपणही करण्यात आले. रसिकांनी गायकांना भरभरून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. तर नऊ ते दहा हजार लोकांनी ऑनलाइन या मैफिलीचा आनंद घेतले. याप्रसंगी डॉ. रेशमा चेडे बोलत होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून रुग्णमित्र नादिर खान, डॉ.संतोष चेडे,समीर धारणी, सोहेल डोसानी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.रेशमा चेडे म्हणाल्या की कोरोनाच्या महामारी मध्ये दिवाळीत होणारे सर्व संगीताचे कार्यक्रम होऊ शकले नाही. अशा वेळी म्युझिकली स्टार्स ने त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून धाराणी दाम्पत्यांनी संगीत रजनी चे उपक्रम राबविणे स्तुत्य असून रसिकांनी आठ महिन्याच्या कालावधीनंतर प्रथमच समक्ष संगीताचा आनंद घेतल्याचा सिकांच्या चेहर्‍यावर दिसत असल्याचे नमूद केले. व अशाच प्रकारे इतर संस्थांनीही शासनाचे सर्व नियम पाळून असेच कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले.

या संगीत रजनी मध्ये अँड. अमीन धारिणी, सुनील भंडारी, समीर खान, अँड. गुलशन धारणी, दीपा भालेराव, सुनील हळगावकर, विकास खरात,किरण उदगिरे यांनी एकापेक्षा एक वरचढ गीते सादर केली. साऊंड सिस्टम वर ऑनलाइन साठी साहिल धारिणी व समीर खान यांनी उत्तम काम पाहिले सूत्रसंचालन व आभार आबीद दुलेखान यांनी मानले.

Post a Comment

0 Comments