हमाल पंचायतीचे मार्गदर्शक हरपले

हमाल पंचायतीचे मार्गदर्शक हरपले

अविनाश घुले : स्व.प्रभाकर लोंढे व स्व.अशोक औटी यांना श्रद्धांजली

   वेब टीम नगर -    माथाडी मंडळाचे निरिक्षक प्रभाकर लोंढे व वाहन चालक अशोक औटी यांचे अपघाती निधन झाले. अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, कॉ.बाबा आरगडे, गोविंद सांगळे, मधुकर केकाण, राजेंद्र बोथरा, नंदकुमार शिकरे, संजय लोढा, ललित गुगळे, निरिक्षक देवकर आदिंसह हमाल-माथाडी कामगार उपस्थित होते.

     याप्रसंगी अविनाश घुले म्हणाले, निरिक्षक प्रभाकर लोंढे यांच्या निधनाने हमाल पंचायतीची मोठी हानी झालेली आहे. हमाल-मापाडी यांच्यासाठी असणार्‍या शासनाच्या विविध योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी ते नेहमी क्रियाशिल असत. त्यांच्यामुळेच शेतकरी लेव्ही, हमालांच्या पाठिवरील 50 किलोचे वजनसाठीची लढा, व्यवसाय कर माफी, पतसंस्था हफ्ते वसुलीबाबत, कामगारांचे करार आदि विषय अभ्यासपुर्ण मार्गी लावत असत. त्यांचे जिल्हा हमाल पंचायतीला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन राहत. आज त्यांच्या निधानाने या सर्व वर्गाची मोठी हानी झाली आहे. त्यांचे मार्गदर्शन कदापी विसरु शकणार नाही, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

     याप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त म्हणाले, स्व.लोंढे व स्व.औटी यांच्या निधानाने माथाडी मंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. कार्यालयीन कामकाजात ते नेहमी तत्पर असत. त्यामुळे अनेक कामे मार्गी लागत होते. एखाद्या विषयावा अभ्यास करुन शासनाच्या नियमांचे पालन करुन अनेक योजना संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी आपल्या कारकीर्दीत केले. त्यांची उणीव ही कार्यालयास नेहमीच भासत राहील, असे सांगितले.

     याप्रसंगी संतोष म्हस्के म्हणाले, बाजार समितीच्या विविध प्रश्‍नांबाबत स्व.लोढे हे महत्वाची भुमिका बजावत असत. त्यांच्यामुळे बाजार समिती व हमाल पंचायत यांचे सलोख्याचे संबंध तयार झाले होते. अशा व्यक्तीच्या निधनाने एक मार्गदर्शन हरल्याची भावना व्यक्त केली.

     याप्रसंगी व्यापारी राजेंद्र बोथरा, संजय लोढा, नंदकुमार शिकरे, कॉ.बाबा आरगडे, गोविंद सांगळे आदिंनी श्रद्धांजली अर्पण करुन मनोगत व्यक्त केली. यावेळी सोनू गांधी, वाल्मिक कदम, दिपक ढोणे, दिगंबर सोनवणे, डॉ.विलास कवळे, सुरेश मोहिते, महादेव खामकर, भरत महानुर, विलास उबाळे, केरबा पोळ, भाऊसाहेब कोथिंबीरे, बाळासाहेब वडागळे, लतिफभाई, कराळे, नंदू डहाणे, गणेश बोरुडे, अ‍ॅड.सुधीर टोकेकर, सतीश शेळके, बबन अजबे, अशोक जायभाय, मच्छिंद्र दहिफळे, शेख म्हमूलाल, नारायण गिते, वायभासे, सुनिल गर्जे, नवनाथ बडे, भैरु कोतकर, रविंद्र भोसले, किसन सानप, पांडूरंग चक्रनारायण, सुनिल गिते, रा//हुल घोडेस्वार, राजू चोरमले, जयसिंग भोर आदिंसह विविध तालुक्यातील प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, हमाल, मापाडी उपस्थित होते.


     

Post a Comment

0 Comments