नगर टुडे बुलेटीन

नगर टुडे बुलेटीन 

कौमी एकता सप्ताह देशाला एकतेचा संदेश देणारा

डॉ.सलाम :मखदुम सोसायटीच्यावतीने वृक्षारोपण 

    वेब टीम  नगर: आज प्रत्येक गोष्टीचा इन्व्हेंट करण्यात येत आहे, याच इन्व्हेंटला सामाजिक कार्याची जोड दिल्यास समाज उन्नत्ती व जागृतीचे काम होऊ शकते. त्यासाठी राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिप्रेत असलेले कार्य केल्यास त्यांच्या स्मृती खर्‍या अर्थाने जागवल्या जातील. स्वातंत्र्यपूर्व काळात मौलाना आझाद यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे कार्य केलेच परंतु स्वातंत्र्योत्तर काळातही देशाला सक्षम व शिक्षित बनविण्यासाठी दिलेले योगदान अनमोल आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेला कौमी एकता सप्ताह देशाला एकतेचा संदेश देणार आहे, अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा मोहंमदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ.अब्दुस सलाम सर यांनी व्यक्त केली.

     मखदुम सोसायटीच्यावतीने मौलाना आझाद जयंतीनिमित्त आयोजित कौमी एकता सप्ताहाअंतर्गत मातोश्री उर्दू हायस्कूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मोहंमदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ.अब्दुस सलाम सर, मुस्कान वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, मुख्याध्यापक जमिर शेख, इनायतुल्ला शेख, मुखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी शफकत सय्यद यांनी मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त केेलेल्या वृक्षारोपण भविष्यात मौलाना आझाद यांच्या कार्याप्रमाणे बहरेल, असे सांगून त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दलितांवर होणार्‍या अन्यायाविरोधात

नॅशनल पिपल्स पार्टीच्यावतीने 2 रोजी आंदोलन

     वेब टीम   नगर : वरखेड येथील दलित महिला श्रीमती पारुबाई सुंदर बनकर यांच्यावर झालेल्या अत्याचार व जळके बु॥ येथील गट नं८/५ फसवणूक करुन बनावट कागदपत्रे तयार करुन पोलिस कर्मचारी लाला बाबू पटेल व त्यांचे नातेवाईक यांच्या विरोधात अ‍ॅट्रसिटी दाखल होऊन बडतर्फे करण्याबाबत तसेच दलितांवर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ नॅशनल पिपल्स पार्टीच्यावतीने बुधवार दि२ डिसेंबर २०२०रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे जिल्हाध्यक्ष सुनिल वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदनात केली आहे.  यावेळी महिला आघाडी सचिव मीनाताई राहिंज, जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ, कार्याध्यक्ष विश्‍वनाथ शिंदे, श्रीधर शेरे, हिराताई शिरसाठ, विजय शिरसाठ आदि उपस्थित होते. दि. २रोजी प्रदेश उपाध्यक्ष  कल्याणराव अडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा निघणार आहे.

     वरखेड येथील प्रकल्पग्रस्त अश्रु बाळा शिरसाठ यांच्यावर झालेला अन्याय, जळके बु। येथील दलित महिला पारुबाई बन यांच्या शेत जमिनीबाबत झालेला अन्याय तसेच जिल्ह्यात दलितांवर होणार्‍या अन्यायात वाढ होत आहे. या अन्याया विरोधात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनिल वाघमारे यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्वांनी नियमांचे पालन करून देशसेवा करावी 

न्या. रेवती देशपांडे :जिल्हा न्यायालयात संविधान आमलात आणण्याची सामुहिक शपथ

वेब टीम  नगर : विध सेवा प्राधिकरणाची स्थापना व मुळ उद्देश भारतीय संविधानावरच झाली आहे. त्या आधारे मोफत विधी सेवा देण्याची तरतूद शासनाने करून कायदेशीर लढाई लढण्यासाठी ज्यांची परिस्थिती नाहीये अशांसाठी राष्ट्रीय, प्रादेशिक, जिल्हा व तालुका स्तरावर प्राधिकरण काम करत आहे. जेव्हा आपण आपाले कर्त्यव्य करतो तेव्हाच आपल्याला हक्क मागता येतात. देशाच्या प्रगतीस हातभारासाठी आपल्या पासूनच संविधानाचा खरा उद्देश अमलात आणून सर्वांनी मुलभूत कर्त्यव्य पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र तसे होतांना दिसत नाहीये. करोना पासून बचावासाठी मास्क वापरा, सामाजिक अंतर राखा, गर्दी टाळा असे वारंवार शासन सांगत आहे. मात्र आपण नियम पाळण्याचे कर्त्यव्य बजावत नाहीये. सर्वांनी नियमांचे पालन करून देशसेवा करावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे यांनी केले.

          भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा न्यायालयात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदे विषयक जागृती शिबिराचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित वकिलांनी व न्यायिक कर्मचाऱ्यांनी सामुहिक संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधान आमलात आणण्याची शपथ घेतली. दोन्ही वकील संघटनाच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात न्यायाधीश रेवती देशपांडे यांनी संविधाना नुसार मोफत कायदे विषयक सहकार्य या विषयावर अध्यक्षस्थानहून मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सेन्ट्रल बारचे अध्यक्ष ॲड. सुभाष काकडे, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, जेष्ठ विधीज्ञ किशोर देशपांडे, प्राधिकरणाचे सदस्य ॲड. शिवाजी कराळे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. प्रशांत मोरे, ॲड. दिपाली झांबरे, ॲड. लता वाघ,  प्राधिकरणाचे अधिक्षक मोहन घावटे आदींसह विधी स्वयंसेवक उपस्थित होते.

          या शिबिरात ॲड. सुभाष काकडे यांनी शिक्षणाचा अधिकार व सक्तीचे शिक्षण याबाबत सविस्तर माहिती देतांना संविधाना मुळेच सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करता आला असे सांगितले. ॲड. भूषण बऱ्हाटे यांनी सर्व नागरिकांनी भारतीय संविधानाचा आदर करत नियमांचे पालन करावे असे अवाहन केले. जेष्ठ विधीज्ञ किशोर देशपांडे यांनी आपले मुलभूत हक्क, कर्त्यव्य व संरक्षण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघटनेचे सहसचिव ॲड. योगेश गेरांगे यांनी केले. प्राधिकरणाचे वरिष्ठ लिपिक नरेंद्र देशमुख यांनी सुत्रसंचलन केले तर एन.आर. गनबोटे यांनी आभार मानले. कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी प्राधिकरणाचे व न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मुबई दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या अधिकाऱ्यांना व नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मानवतावाद आणि विश्‍वबंधूत्व ही महात्मा फुलेंची शिकवण

 सचिन गुलदगड : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यनिमित्त उबदार कपड्यांचे वाटप 

    वेब टीम  नगर - क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पिंड मुळातच कृतिशील क्रांतिकारकाचा होता. दीनदुबळ्यांसाठी ते रात्रंदिवस झटत होते. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. समाज परिवर्तनाशिवाय देशातील कष्टकरी जनतेचे प्रश्‍न सुटणार नाही, हे त्यांना उमगले होते. मानवतावाद आणि विश्‍वबंधुत्व ही महात्मा फुले यांच्या जीवनाची वैशिष्ट्ये होती. विचार आणि कृती यांचा संगम असलेले ज्योतिराव फुले यांचे कार्य आजही स्फुर्तिदायक आहेत, असे प्रतिपादन श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांनी केले.

     क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने रस्त्यावरील गरीबांना उबदार कपडे व मास्कचे वाटप केले. याप्रसंगी सचिन गुलदगड, जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, प्रदेश सोशल मिडिया प्रमुख दिपक साखरे, सल्लागार दत्ता जाधव, फुले ब्रिगेडचे संतोष हजारे, डॉ.सुदर्शन गोरे आदि उपस्थित होते.

     यावेळी अशोक तुपे म्हणाले, शेतकर्‍यांचे दारिद्र व अज्ञान नष्ट करण्याची त्यांना अतिशय तळमळ होती. ‘शेतकर्‍यांचा आसूड’ या ग्रंथात त्यांनी यावर प्रकाश टाकला असून,  शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी लढणारे महात्मा फुले खंबीर सुधारक होते. त्यामुळे त्यांचा सर्वांगिण दूरदृष्टीचा अभ्यास करुन आपण त्यांचे विचार आचरणात आणली पाहिजे, याच उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

     याप्रसंगी दत्ता जाधव, संतोष हजारे आदिंनीही आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या  कार्याविषयी उपस्थितांनी माहिती दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

यशस्वीतेसाठी परिस्थिती अडथळा ठरत नाही

अजित कुलकर्णी : ज्ञानज्योत सामाजिक संस्थेच्यावतीने अनामप्रेमला शैक्षणिक साहित्याचे वाटप

    वेब टीम  नगर: परिस्थितीवर मात करुन जीवनात यशस्वी होणारे अनेक जण आहेत. परिस्थिती ही त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत नाही. परंतु आपण ज्या परिस्थितीतून गेलो, तसे समाजातील इतरही अनेकजण प्रयत्नशील असतात. अशांना आपल्या अनुभव, ज्ञान आणि मदतीचा हात दिल्यास तेही यशस्वी होऊ शकतात. हाच आदर्श अक्षय बहिरवाडे यांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे. स्वत: कठोर मेहनतीने उच्च शिक्षण घेऊन आता गरजूंना मोफत मार्गदर्शन करुन त्यांना जीवनात यशस्वी करण्याचे ध्येय बाळगून आहे. अशा युवकांच्या प्रयत्नांमुळे समाज उन्नत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अनामप्रेमचे अजित कुलकर्णी यांनी केले.

     ज्ञानज्योत सामाजिक संस्थेच्यावतीने अनामप्रेम येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अक्षय बहिरवाडे, अनामप्रेमचे अजित कुलकर्णी, विशाल भागानगरे, विनायक इंगळे, अनिल हरबा, योगेश गडाप्पा, अंकुश मिसाळ, किरण कुलकर्णी, हर्षद मिसाळ, अमोल सुरसे आदि उपस्थित होते. तसेच आजारी रुग्णांसाठी युरिन बॅग देण्यात आल्या.

     याप्रसंगी अक्षय बहिरवाडे म्हणाले, आजची मुले हुशार आहेत, नवनवीन गोष्टी आत्मसात करुन त्यादृष्टीने अभ्यास करतात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते जीवनात यशस्वी होऊ शकतात. अनाम प्रेम संस्थेतील अनेक मुलंही जिद्दीने शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना मार्गदर्शन व मदतीचा हात देऊन प्रोत्साहन देण्याचे काम करत असल्याचे सांगितले.

     अक्षय बहिरवाडे सर्वसामान्य कुटूंबातील असून  इ. १२वीला ५०टक्के मिळवूनही जिद्द, चिकाटी, मेहनतीने सी.एस., एमबीए, एलएलबी शिक्षण पूर्ण केले. आज महाराष्ट्रातील गरीब तसेच गरजू मुलांना मोफत मार्गदर्शन करत आहेत. त्यादृष्टीने नगर शहरातील विविध संस्थांना भेटी देऊन मार्गदर्शन व मदत करत आहेत. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संत नामदेवांनी कीर्तनरुपी ज्ञानदीपातून समाज प्रकाशमान केला  


श्रीकांत मांढरे : डावरे गल्लीतील नामदेव विठ्ठल मंदिरात संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची जयंती उत्साहात

वेब टीम नगर :संत नामदेव महाराजांनी कीर्तनरुपी ज्ञानाच्या दीपातून समाज प्रकाशमान केले. या दिव्याच्या उजेडात सर्व समाज उजळून निघाला. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला संघटित व जागृक करण्याचे कार्य केले. भक्ती करण्याचा किंवा ज्ञान सांगण्याचा जो अधिकार होता तो संकुचित झाला होता. त्याच्या कक्षा रुंदावण्याचे काम नामदेव महाराजांनी केले. म्हणूनच नामदेव महाराजांच्या काळात जेवढे संत महाराष्ट्रात निर्माण झाले तेवढे एकाच वेळी पुढे कधी झाले नाहीत. कारण नामदेवाने आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्याच्या हक्काची आणि अधिकाराची जाणीव करून दिली. आजही त्यांचे विचार व शिकवण प्रेरणादायी असल्याची भावना ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे  यांनी  व्यक्त केली. 

 शहरातील डावरे गल्ली येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांची ७५० वी जयंती मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी महेश जाधव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची तसेच नामदेव महाराजांच्या मूर्तीस अभिषेक घालून पूजा करण्यात आली. पूजेनंतर भाविकांच्या उपस्थितीमध्ये भजनाचा कार्यक्रम रंगला होता. भजन-किर्तन कार्यक्रमात ह.भ.प. भाबड महाराज, काळे महाराज, तबलावादक शेखर दरवडे, महेश जाधव यांनी अभंग, भावगीत व भक्ती गीताने सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी नामदेव शिंपी समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे, ज्ञानेश्‍वर पवार, सचिव सुरेश चुटके, सहसचिव दिलीप गिते, संचालक ज्ञानेश्‍वर कविटकर, अनिल गिते, उमेश गिते, प्रसाद मांढरे, अरुण जवळेकर, रामशेठ पवार, अ‍ॅड.निलेश पवार, अशोक जाधव, अजय कविटकर, मच्छिंद्र चांडवले, शरद चांडवले, राजश्री मांढरे, शोभना गिते, अनिता गिते, स्मिता गिते, नुतन पवार, नानी जाधव, माधवी मांढरे, पल्लवी रहाणे, कल्पना जाधव आदिंसह समाजबांधवांसह भाविक उपस्थित होते.

. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन हा धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. श्री नामदेव महाराजांच्या जयंती निमित्त श्री नामदेव विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने

खेळाडूंसाठी क्रीडांगण खुली करण्याची मागणी

वेब टीम नगर : कोरोना पार्श्‍वभूमीवर राज्यात मागील मार्च महिन्यापासून जीम, मैदाने बंद होती. शासनाने टप्प्याटप्प्याने राज्यभरातील मैदाने, जीम खुली केली. पण अहमदनगर जिल्ह्यातील खुल्या मैदानावरील सराव बंद असल्याने खेळाडू हवालदिल झाले आहेत. त्यामुळे इनडोअर खेळासोबतच मैदानी खेळांच्या सरावास परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने ईमेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.

खेळ हा विद्यार्थ्यांचा स्थायीभाव आहे. अनेक खेळाडू आपल्या आवडीच्या खेळामध्ये भाग घेतात, तर बहुतांश खेळाडू आवडीच्या खेळामध्ये मैदानावर तासनतास सराव करून क्रीडा स्पर्धेच्या रूपाने आपले नशीब अजमावत असतात. पण गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे हजारो विद्यार्थ्यांना घरात बसण्याची वेळ आली. मध्यंतरीच्या काळात राज्यभरातील अनेक मैदाने खेळाडूंसाठी खुली करण्यात आली. कोरोना सद्यस्थितीत आटोक्यात आला आहे, तरी देखील नगर जिल्ह्यात मैदाने खुली करण्यास परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही. विविध राष्ट्रीय फेडरेशन मार्फत क्रीडा स्पर्धेच्या तारखा डिसेंबर-जानेवारीत जाहीर करण्यात आल्या असल्याने नगर जिल्ह्यातील अनेक प्रतिभावंत खेळाडू मैदाने खुली न केल्यास या स्पर्धेपासून मुकण्याची शक्यता आहे. तसेच रोगप्रतिकारक क्षमता ही व्यायामातून विकसित होत असल्याने लवकरात लवकर मैदाने खुली करावीत अशी मागणी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, शिवछत्रपती पुरस्कारार्थी सुनील जाधव, दिनेश भालेराव, घनश्याम सानप, विजयसिंह मिस्कीन, सचिन काळे, कृष्णा लांडे, गुलजार शेख, अमित चव्हाण, संतोष काळे तसेच जिल्हा अध्यक्ष सुनील गागरे, सचिव शिरीष टेकाडे, नंदकुमार शितोळे, दिव्यांगी लांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वासन ग्रुपने वंचितांना आधार देण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी 

आ. संग्राम जगताप : वासन टोयोटात इनोव्हा क्रिस्टाचे आ.  संग्राम जगताप यांच्या हस्ते अनावरण

वेब टीम नगर : एमपीव्ही सेगमेंटमध्ये भारतात अव्वल ठरलेली व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली नवीन इनोव्हा क्रिस्टाचे अनावरण शहरातील केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरुममध्ये आ.  संग्राम जगताप यांच्या हस्ते थाटात झाले. यावेळी जनक आहुजा, अनिश आहुजा, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, दिपक जोशी, प्रविण जोशी, रविंद्र थोरात, सावली संस्थेचे नितेश बनसोडे आदी उपस्थित होते.

वासन ग्रुपचे अध्यक्ष विजय वासन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शोरुमच्या वतीने केडगावच्या सावली संस्थेत असलेल्या निराधार बालकांसाठी पादत्राणे भेट देण्यात आले. आ.  जगताप यांच्या हस्ते पादत्राणे सावली संस्थेचे नितेश बनसोडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

जनक आहुजा म्हणाले की, वासन ग्रुप फक्त व्यवसायासाठी कार्य करीत नसून, सामाजिक बांधिलकी जपून अनेक उपक्रम राबवित असतो. व्यवसायाला सामाजिक बांधिलकीची जोड देत वासन ग्रुपचे कार्य सुरु आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर आ. संग्राम जगताप यांनी वासन ग्रुपने वंचितांना आधार देण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. तर वासन ग्रुपच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 इनोव्हा ही चारचाकी वाहन सर्वच कार प्रेमींना भुरळ घालत आहे. यामध्ये आनखी नवीन बदल करुन इनोव्हा क्रिस्टा ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. यामध्ये नवीन स्पार्किंग ब्लॅक कलर, नवीन ग्रील आणि बंपर डिझाईन, अलोय व्हिल, ऑडिओ विथ अँड्रॉइड ऑटो/अ‍ॅपल कार प्ले, फ्रंट क्लिअरन्स सोनार, कॅमलटन इंटीरियर आदी नवीन गोष्टींचा समावेश आहे. नवीन इनोव्हा क्रिस्टा ग्राहकांना टेस्ट ड्राईव्हसाठी नगर-पुणे रोड, केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरूम मध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 9604038234 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चर्मकार विकास संघ व लोकनेते सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने

पो.नि. राकेश मानगावकर यांचा कोरोनायोध्दा म्हणून सन्मान

वेब टीम नगर : कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्टपणे कर्तव्य बजावणारे पो.नि. राकेश मानगावकर यांचा चर्मकार विकास संघ व लोकनेते सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशन येथे मानगावकर यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव प्रा.सुभाष चिंधे, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष नवनाथ बोरुडे, युुवा उपाध्यक्ष विकी कबाडे, रविदासीया प्रितम देसाई आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटकाळात कोपारगाव येथे कार्यरत असताना पो.नि. मानगावकर यांनी उत्तमपणे कर्तव्य बजावून अनेक गरजूंना मदत केली. अनेक वंचित घटकांना त्यांनी आधार देण्याचे कार्य केले. तसेच कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी उत्तमपणे उपाययोजना करुन कार्य केले. या कार्याची दखल घेत त्यांना कोरोनायोध्दा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी सांगितले. मानगावर यांनी कर्तव्य पार पाडून सर्वसामान्यांसाठी सेवा केली असून, हा सन्मान प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिकारीचा असल्याची भावना व्यक्त केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग वंचितांना आधार देत आहे 

आ. संग्राम जगताप : राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब ढवळे 

वेब टीम नगर:राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली. आ.  संग्राम जगताप यांच्या हस्ते ढवळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.    

आ.  संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वंचित घटकातील प्रश्‍न तळागाळापर्यंत जाऊन सोडविण्याचे कार्य केले जात आहे. या विभागातील पदाधिकारी वंचितांना आधार देण्याचे काम करीत असून, राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन राष्ट्रवादीच्या सर्व विभागाचे कार्य सुरु असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बाळासाहेब ढवळे यांनी वंचित, दुर्लक्षीत घटकातील प्रश्‍न राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुटणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वंचितांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले. ढवळे यांचे अनेक वर्षापासून नगर तालुक्यात सामाजिक कार्य सुरु आहे. ते मनसेच्या नगर तालुका उपप्रमुखपदी कार्यरत होते. मनसेला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कार्य सुरु केले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी रविवारपासून धनादेश स्विकारले जाणार

ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहेता व मकरंद घोडके यांना होणार मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान

वेब टीम नगर : मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने इसळक-निंबळक येथे घरकुल वंचितांसाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून उभे राहत असलेल्या प्रकल्पाचे धनादेश रविवार दि.२९ नोव्हेंबर रोजी स्विकारले जाणार आहेत. तर वंचितांची प्रश्‍न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहेता व मकरंद घोडके यांना मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान केले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

 घरकुल वंचितांना घर मिळण्यासाठी राबविण्यात आलेल्या आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना ८०हजार रुपयात १ गुंठा जमीन मिळणार आहे. तर या योजनेस जागा देणार्‍या जागा मालक शेतकरींचा देखील खडकाळ पड जमीनीच्या मोबदल्यात चांगला फायदा होत आहे. सदर प्रकल्पात २३१ घरे उभारण्यासाठी प्रत्येकी एक गुठ्याचे प्लॉट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जागा घेऊ इच्छिणार्‍या घरकुल वंचितांचे धनादेश या रविवार पासून स्विकारले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.  

तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढा देत असतात. सर्वसामान्यांना हक्क मिळवून देण्यासाठी कटिबध्द असलेले ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहेता व मकरंद घोडके यांना मिडीया लॉरिस्टर सन्मान प्रदान केले जाणार आहे. लेखक व कोशागार अधिकारी महेश घोडके यांच्या हस्ते हा सन्मान पत्रकारांना प्रदान केला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

फिनिक्स फाऊंडेशनच्या पुढाकाराने महात्मा फुले स्मृतीदिनी ४८ नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प


महात्मा फुलेंचे विचार व कार्य सर्व समाजाला दिशादर्शक

जालिंदर बोरुडे : शिबीरात १७८ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी तर ३७ रुग्णांवर होणार मोतिबिंदू शस्त्रक्रिया

वेब टीम नगर: शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन महात्मा फुलेंनी पुरोगामी विचाराने कार्य केले. महात्मा फुलेंचे विचार व कार्य सर्व समाजाला दिशादर्शक आहे. समाजातील महापुरुषांनी वंचितांना नेहमीच आधार देण्याचे कार्य केले. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली. त्यांचे कार्य आजही सर्व समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे सांगून, त्यांच्याच विचाराने फिनिक्स सोशल फाऊंडेशन कार्य सुरु असल्याची भावना फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी व्यक्त केली.

फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त नागरदेवळे (ता. नगर) येथील सौरभनगर भागात मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराप्रसंगी बोरुडे बोलत होते. बोरुडे पुढे म्हणाले की, कोरोनाच्या महामारीत अनेकांचे रोजगार व नोकर्‍या गेले आहेत. गरजू घटकांना आरोग्य सुविधा मिळत नसून, त्यांच्यासाठी विविध मोफत शिबीर ठेऊन त्यांना फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून आधार देण्याचे कार्य सुरु असल्याची भावना व्यक्त केली.

या शिबीरात१७८ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तर ३७गरजू रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत.  तसेच फिनिक्स फाऊंडेशनच्या आवहानाला प्रतिसाद देत ४८ नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प व्यक्त केला. गरजू रुग्णांना मोफत औषधे व नंबरचे चष्मे देण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सौरभ बोरुडे, अक्षय धाडगे, विशाल गायके, गौरव बोरुडे, मोहनीराज कुरे आदींसह फाऊंडेशनचे सदस्यांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने मनापासून अभिनंदन : किरण काळे 

वेब टीम नगर : कोरोना सारख्या महामारीच जागतिक संकट राज्यावरती आलेले असताना देखील या संकटावर उत्तम प्रशासकीय नियोजनाच्या माध्यमातून महा विकास आघाडी सरकारने जनतेच्या सहभागातून जवळपास मात केली आहे. 

विरोधकांनी हे सरकार अकरा दिवसात कोसळेल, तीन महिन्यात कोसळेल अशा वल्गना केल्या. परंतु एक वर्ष पूर्ण झालं तर देखील विरोधीपक्ष या सरकारचा साधा केस देखील वाकडा करू शकलेले नाही. 

काँग्रेस कार्यकर्ता म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला मिळत असलेला मान-सन्मान आणि निर्णय प्रक्रियेतील काँग्रेस पक्षाच्या असणारा महत्त्वपूर्ण सहभाग या काँग्रेस कार्यकर्त्यांना सुखावणार्‍या गोष्टी आहेत. त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याच्यावर काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते यांच्या बरोबर उत्तम समन्वय ठेवत हे सरकार राज्यात काम करीत आहे. 

महसूल विभागाच्या माध्यमातून या कोरोना संकट काळात देखील सातबारा अद्ययावत करण्याचे काम महसूल विभागाच्या माध्यमातून ना.  थोरात यांनी केलं. त्याच बरोबर अतिवृष्टी झालेल्या भागाला भरघोस आर्थिक मदत राज्याच्या सरकारने केली. येणाऱ्या काळामध्ये देखील कोरोणावर पूर्णतः मात केल्या त्यानंतर महसूल उत्पन्न वाढल्यावर राज्यामध्ये विकासाचा महापूर आणण्याचे काम हे सरकार निश्चितपणे करेल असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केला आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सिव्हिल मध्ये अत्याधुनिक अधिक क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचा शुभारंभ

.अहमदनगर जिल्ह्ह्यातील सर्वाधिक  ऑक्सिजन क्षमता असलेला  पहिला प्लांट  

वेब टीम नगर : सिव्हिल हॉस्पिटल मध्ये २० के एल .या अत्याधुनिक अधिक क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचा शुभारंभ सिव्हिल सुर्जन डॉ .सुनील पोखर्णा  यांच्या हस्ते जागेची पूजा करून व नारळ वाढवून करण्यात आला .सुमारे ७० लक्ष खर्चून हा ऑक्सिजन प्लांट सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रांगणात  उभारण्यात येणार असून हा  प्लांट म्हणजे महत्वाकांशी  प्रकल्प आहे हा प्लांट कार्यन्वित झाल्या नंतर २००० रुग्ण याचा       फायदा घेऊ शकतील . अशी  माहिती  यावेळी  सिव्हिल सर्जन  डॉ .सुनील पोखर्णा यांनी दिली .याप्रसंगी स्पार्क इंडस्ट्रीज  चे सुपरवायझर जय प्रकाश त्रिपाठी ,अधिसेवीका एम वी गायकवाड, एम उजागरे, अधिपरिचारिका सुरेखा आंधळे ,निलेश जाधव ,हेमंत सोनवणे,दत्तात्रय आंबेकर ,हरीश छजलानी ,महेश काळे ,गंगलू मिक्वी आदी मान्यवर उपस्थित होते . 

सिव्हिल सर्जन  बोलताना म्हणाले कि नगरचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ .व जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी  सातत्याने केलेल्या  पाठपुरवठ्याने या प्लांट साठी निधी उपलब्ध झालेला असून  कोविडच्या संभाव्य दुसऱ्या साथीत तसेच इतरही वेळेस   निश्चितच रुग्णासाठी हा प्लांट वरदान असेल. अतिशय गरजेच्या अश्या २० के एल चा हा प्लांट कॅप्सुलच्या आकारासारखा दिसेल.अति उच्च क्षमेतेचा हा  ऑक्सिजन प्लांट डिसेम्बरच्या दुसऱ्या आठवड्यात       कार्यन्वित होईल.  .हा प्लांट ३५ फूट  उंच असणार असून  सुरक्षेच्या कारणास्तव  बंदिस्त असणार आहे .अहमदनगर जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या ऑक्सिजन क्षमता असलेला हा पहिलाच प्लांट आहे      ऑक्सिजनची  पाईपलाइन थेट  ऑक्सिजन प्लांट मधून  कनेक्शन  जोडून रुग्णांना ४१.३ एम एम च्या २०० मीटर पाईप मधून ऑक्सिजनचा  पुरवठा होईल . अनेक रुग्णाचे प्राण देखील वाचविण्यासाठी हा प्लांट निश्चितच उपयोगी पडेल,गळती थांबेल,पाईप लाईनमुळे.  ऑक्सिजन वाया जाणार नाही यामुळे लाखो रुपयांची बचत देखील होणार आहे   असे सिव्हिल सर्जन  डॉ सुनील पोखर्णा यांनी  सांगितले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षपदी  वनिता बिडवे 

 वेब टीम नगर : जयसंत सेना महाराज महाराष्ट्र नाभिक महामंडळ 'अहमदनगर' महिला जिल्हा अध्यक्षा  वनिता रमेश बिडवे यांची राष्ट्रवादी कॉग्रेस महिला तालुका अध्यक्षा पदी निवड अ .नगर शहरा चे आ. संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दि .२६ गुरुवार रोजी राष्ट्रवादी भवन येथे प्रदान करण्यात आले ग्रामीन भागातील महीलांना संघटीत करुन पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करुन समाजाचे ध्येयधोरण साध्य करुन समाजाची सेवा करावी असे आवाहन आ. संग्रामभैया जगताप यांनी वनिता ताई बिडवे यांना करुन शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला या छोटेखानी समारंभास बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीमाऊली मामा गायकवाड , सलून असोसिएशनचे अध्यक्ष  अनिल निकम तसेच साई प्रतिष्ठानचे  योगेश  पिंपळे महि ला शहर अध्यक्षा स्वाती ताई पवळे 'महामंडळाचे  सोमनाथजी कदम ' शामराव  औटी , रमेश बिडवे, पत्रकार  राजेश सटाणकर आदी उपस्थीत होते उपस्थीतांच्या वतीने श्रीमाऊली मामा गायकवाड यांच्या हस्ते वनीताताई यांचा शाल देवुन सत्कार व आभिनंदन सोहळा पार पाडला याप्रसंगी  वनीताताई  व  रमेश  बिडवे यांनी उपस्थीतांचे आभार मानले.
Post a Comment

0 Comments