नगर बुलेटिन

नगर बुलेटिन 

लायन्स क्लब, मराठी पत्रकार परिषद व पोलीस दलच्या वतीने

२६-११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना हुतात्मा स्मारकात श्रध्दांजली

संविधान दिनानिमित्त युवकांना देण्यात आली नागरी कर्तव्य पार पाडण्याची शपथ

वेब टीम नगर :  २६-११ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलिसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, मराठी पत्रकार परिषद व पोलीस दलच्या वतीने हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. भारत माता की जय..., वंदे मातरम...च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. तर संविधान दिनानिमित्त उपस्थितांना नागरी कर्तव्ये पार पाडण्याची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. राकेश मानगावकर, तोफखाना पोलीस स्टेशनचे सहा.पो.नि. किरण सुरसे, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, लायन्सचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे, लायन्सचे रिजन चेअरमन हरजितसिंह वधवा, सुधीर लांडगे, कमलेश भंडारी, एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे अरविंद पारगावकर,  युवान संस्थेचे संदीप कुसळकर, डॉ. मिरा बडवे, कमलेश भंडारी उपस्थित होते.

  उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणाची आहुती देणार्‍या जवान व पोलीसांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आल्याचे स्पष्ट केले. संविधानाने बहाल केलेली नागरी कर्तव्ये नागरिकांनी पार पाडल्यास शत्रू व दहशतवाद्यांना हल्ले करता येणार नसल्याचे स्पष्ट करुन, उपस्थितांना नागरी कर्तव्य पार पाडण्याची व देश रक्षणासाठी योगदान देण्याची शपथ देण्यात आली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वातंत्र्य, समता व बंधुत्व हाच बाबासाहेबांच्या संविधानाचा पाया -आ. संग्राम जगताप      

वेब टीम नगर : संविधान दिनानिमित्त शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतील संघटनांच्यावतीने मार्केट यार्ड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधानाचे वाचन करण्यात आले. तर भीम स्मरणाचे पठण करण्यात आले व आमदार संग्राम जगताप यांचा शिव फुले-शाहू-आंबेडकर-साठे चळवळीतील संघटनांच्यावतीने सविधान देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश बनसोडे, अजय साळवे, उबेद शेख, जालिंदर बोरुडे, सोमा शिंदे, अंकुश मोहिते, संध्या मेढे, सिद्धार्थ आढाव, विकी साठे, समीर भिंगारदिवे, मोना विधाते, महेश आठवले, राजीव दिवटे, विकी तिवारी, रोहित केदारे, येशुदास वाघमारे, दीपक सरोदे, प्रकाश वाघमारे, नितीन घोडके, वैभव जाधव आदी उपस्थित होते.  

स्वातंत्र्य समता व बंधुत्व हेच बाबासाहेबांच्या संविधानाचा पाया आहे त्यांनी देश अखंड धर्मनिरपेक्ष व एकात्मता राहण्यासाठी संविधानाची निर्मिती केली असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले व सुरेश बनसोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनविताना घेतलेल्या परिश्रमाचे कथन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संविधान दिनानिमित्ताने संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन

मानवाधिकार अभियान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने अभिवादन

वेब टीम नगर: मानवाधिकार अभियान आणि महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संधोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)  यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिम्मित्ताने मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  अभिवादन करण्यात आले यावेळी संविधान जागरासाठी अहमदनगर जिल्ह्यातील विविध पुरोगामी संस्था संघटना एकत्रित येवून प्रत्येक वर्षी संविधान दिनानिमित्ताने संविधान जागर रॅलीचे आयोजन करत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या नियमाचे पालन व्हावे या दृष्टीकोनातून संविधान जागर रॅली रद्द करण्यात आली व साधेपणाने संविधान दिन साजरा केला गेला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच मानवाधिकार अभियानाचे मुखपत्र संविधान पत्रिकेच्या या पाक्षिकाच्या पहिल्या अंकाचे उद्घाटन आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मानवाधिकार आभियानाचे प्रदेशाध्यक्ष ड. संतोष गायकवाड, संध्याताई मेढे, रुपाली वाघमारे, युनिसभाई तांबटकर, दीपक अमृत, सत्यशील शिंदे, बापू विधाते, संजय कांबळे, जालिंदर बोरुडे, अविनाश भोसले, आशा हरे, हर्षल कांबळेफ अमित धाडगे, विठ्ठल कोतकर, तसेच बार्टी कार्यालय मार्फत प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, समतादूत एजाज पिरजादे, प्रेरणा विधाते, सुलतान सय्यद, संतोष शिंदे, विशाल गायकवाड, सविता सकट, किरण चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पोलीस बॉईज असोसिएशन अहमदनगर च्या वतीने २६-११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान यांना श्रद्धांजली        

                    

वेब टीम नगर : मुंबईत झालेल्या२६-११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व पोलिसांना पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशावरून  दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम पोलीस बॉईज असोसिएशन अहमदनगर जिल्ह्यात तर्फे घेण्यात आला. यावेळी नौशाद रफिक शेख, जिल्हाध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन. प्रशांत उजागरे, जिल्हा उपाध्यक्ष. मोसिन सय्यद, सचिन गायकवाड, रोहित घायतडक, प्रशांत माळी, आनंद गीते, मुशरान कुरेशी, किशोर मुटकुळे, निखिल कानडे, रोहित उजगरे आदी उपस्थित होते.                      

नौशाद शेख म्हणाले की देशाच्या सुरक्षितेसाठी प्राणाची आहुती देणार्‍या जवान व पोलिसांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व व नेहमीच पाकिस्तानने भारतामध्ये दहशतवादी कारवाया केल्या आहेत कसाब सारख्या दहशतवादाला जिवंत पडल्याने ही बाब उघड झाली असे हल्ले परतून लावण्यासाठी पोलीस व लष्कर सज्ज आहे मात्र प्रत्येक नागरिक संजग व जाग्रुक झाल्यास कोणताही शत्रू भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा 


२६-११ च्या दहशतवादी हल्लयातील शहिदांनी श्रध्दांजली

वेब टीम नगर: आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संविधानाच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. तसेच २६-११ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्लयातील शहिद जवान व पोलिसांना हुतात्मा स्मारक येथे श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टीचे शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, महिला शहर प्रमुख सुचिता शेळके, शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, सचिव दिलीप घुले, शकील शेख, रेव्ह. आश्‍विन शेळके आदी उपस्थित होते.

प्रा. अशोक डोंगरे म्हणाले की, घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली. राजेशाही संपुष्टात येऊन सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सुत्रे आली. मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र सध्या देशात हुकूमशाही पध्दतीने सरकार आपला कारभार करीत असून, आम आदमी पार्टी सत्तेसाठी कधी निष्ठा व विचारांशी तडजोड करीत नसल्याची भावना व्यक्त केली. तसेच पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यासाठी आवाहन करण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकरी, कामगारांचा मोर्चा

कामगार, शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने

वेब टीम नगर:  २६नोव्हेंबरच्या देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा कामगार आणि किसान संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली.

नगर-पुणे महामार्गावरुन जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात मोर्चा धडकला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. आंदोलकांनी कामगार, शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. या मोर्चात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, रामदास वागस्कर, अंबादास दौंड, नंदू डहाणे, सिटूचे कॉ. महेबुब सय्यद, संताराम लोणकर, महादेव पालवे, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, विलास पेद्राम, शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, राजेंद्र लांडे, प्रशांत म्हस्के, किसान सभेचे विकास गेरंगे, विडी कामगार युनियनच्या भारती न्यालपेल्ली, सतीश भुस, अर्शद शेख, नंदकुमार शिरोळे, शिक्षकेतर संघटनेचे भाऊसाहेब थोटे, सतीश पवार, योगेश गलांडे, आकाश दंडवते, अंगणवाडी सेविका संघटनेच्या शोभा तरोटे, विजया घोडके, सुभाष कांबळे आदी सहभागी झाले होते.

भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात झालेल्या सभेत प्रमुख वक्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात जोरदार टिका करुन सरकार शेतकरी, कामगार, शिक्षक आदी सर्व घटकांना देशोधडीला लाऊन भांडवलदारांचे हित जोपासत असल्याचा आरोप करण्यात आला. टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने हे हक्क आणि अधिकार अबाधित ठेऊन केंद्र सरकारने घेतलेल्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. या मोर्चात प्रत्येक संघटनेशी संलग्न युनियन, शेतकरी, कामगार, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, अंगणवाडी सेविका, आशा-गटप्रवर्तक, विडी कामगार, पतसंस्था कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बाजार समिती, हमाल-मापाडी संघटनांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवून जिल्ह्यात बंद यशस्वी केला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसिल कार्यालयावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देशव्यापी संपात सहभाग

कामगार विरोधी निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी

वेब टीम नगर : केंद्र सरकारने टाळेबंदी काळात घेतलेले कामगार विरोधी निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी देशव्यापी संपात सहभागी होत राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सावेडी येथील नगर तहसिल कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, अहमदनगर जिल्हा शाखेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर, खजिनदार श्रीकांत शिर्शिकर, कार्याध्यक्ष मुकुंद शिंदे, उपाध्यक्ष विलास पेद्राम, विजय काकडे, सुधाकर साखरे, बाळासाहेब वैद्य, मकरंद भारदे, पी.डी. कोळपकर, एस.एल. वाबळे, उमेश गावडे, सुरेश देठे, नलिनी पाटील, बी.एस. दंडवते, ज्ञानेश्‍वर कांबळे आदींसह सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणा देऊन निषेध सभा घेण्यात आली. सुभाष तळेकर म्हणाले की, एकजुटीने अन्यायाचा बिमोड करावा लागणार आहे. केंद्र सरकार सरकारी कर्मचारी, शेतकरी, शिक्षक व कामगार यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करीत आहे. जुनी पेन्शन योजना ही हक्काची असून, म्हतारपणाची ती आधार काठी आहे. देशातील सरकारी कार्यालयात २ लाख पदे रिक्त असून, अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. यामुळे अधिक कामाचा ताण कर्मचार्‍यांवर पडत असल्याने त्यांचे आरोग्य बिघडले असून, याला सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. रावसाहेब निमसे यांनी संविधान दिनी पुकारण्यात आलेला संप हा न्याय हक्काच्या मागणीसाठीचा हा एल्गार आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढा न दिल्यास सरकार जमू देणार नसून, सर्वांना हक्काच्या लढ्यासाठी एकत्र येऊन बदल घडविण्याचे त्यांनी आवाहन केले.  

या संपात देशभरातील ८० लाख व राज्यातील १७लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी व शिक्षकांनी आपापल्या कार्यालयातील प्रांगणात निदर्शने करुन संपात सहभागी झाले होते. केंद्र शासनाने गेल्या आठ महिन्यातील कोरोना कालावधीत महामारीची ढाल पुढे करून कामगार, कर्मचारी विरोधी कायदे, अर्थविषयक लाभाचा संकोच व सेवा विषयबाबीत कर्मचारी जीवन विरोधी धोरणे जाहीर करून कर्मचार्यांच्या शाश्‍वत सेवाजीवनालाच आव्हान देण्याचा दुर्देवी प्रयत्न केला आहे. भयग्रस्त वातावरणात कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कामगार अस्वस्थ झाले आहेत. केंद्रशासनाने कामगार, कर्मचारी याबाबत खाजगीकरण, कंत्राटीकरण व उदारीकरण याबाबतची अतिरेकी धोरण लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी झाले होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सराफ व्यावसायिकांच्या शिष्ठमंडळाचे एसपींना निवेदन

सराफांना लुटणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई
 : पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांचे आश्वासन

वेब टीम नगर : जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार व्यावसायिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई करावी, सराफ सुवर्णकार व्यावसायिकांना स्वतःच्या व जवळ असलेल्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी रिव्हॉल्वरचा शस्त्र परवाना त्वरित मिळावा, तसेच दरोडे टाकणाऱ्या आरोपींकडून लवकरात लवकर मुद्देमालची रिकव्हरी करावी या मागण्यांचे निवेदन अहमदनगर जिल्हा सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हध्यक्ष संतोष वर्मा यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना सराफ व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने दिले. यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

          यावेळी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सराफांना लुटणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई होण्यासाठी निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच शस्त्र परवाना मिळण्यासाठीही जिल्हाधीकारींकडे शिफारस करू असे आश्वासन दिले. पोलीस व सराफ यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण होवून गुन्ह्यांचा तपास लवकर लागावा यासाठी सर्व सराफ व्यावसायिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शहाणे, बाळासाहेब जिरेसाळ, सचिन दिक्षित, अतुल पंडित, सचिन कुलथे, राहुल पंडित, प्रशांत मुंडलिक, सुर्यकांत दिक्षित, राजू शेवाळे आदी उपस्थित होते.

सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गेल्या आठ महिन्यापासून कोरोना महामारी मुळे सर्व बाजारपेठा, जनमाणसांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. अशा भिषण परिस्थितीत बऱ्याच लोकांच्या नौकऱ्या गेल्या. आर्थिक परस्थिती विस्कळीत झाल्यामुळे जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे, बॅग लिफ्टिंगच्या घटना तसेच सोनार व्यावसायिकांना लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

बऱ्याच प्रकरणात आरोपी पकडले गेल्यानंतर त्या आरोपींना जामीन होऊन ते पुन्हा वरील गंभीर गुन्हे करतात. त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढत चालले आहे. म्हणून वरील गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींना "मोक्का" लावावा अशी आम्ही मागणी करतो. त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल. सराफ सुवर्णकार यांना लुटण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बऱ्याच घटनांमध्ये सराफांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सराफ सुवर्णकार व्यावसायिकांना आपल्या जिवाचे व मालमत्तेचे रक्षण करता यावे यासाठी रिव्हॉल्वरचे लायसन्स त्वरीत मिळावे अशी आपणास मागणी करतो.

सराफ सुवर्णकार बांधवांना लुटमार दरोडे टाकलेल्या प्रकरणात आरोपी पकडले जाऊन सुद्धा मुद्देमालच्या रिकव्हरीचे प्रमाण अतिशय कमी आहे. पंधरा दिवसापूर्वी मिरजगाव येथील सुवर्णकार  अतुल पंडित गंभीर मारहाण करून त्यांच्या जवळील सुमारे८०० ग्रॅम सोन्याचे दागिने व साडे सतरा किलो चांदीचे दागिने लुटून नेले होते. या प्रकरणात आरोपी पकडले गेले परंतु अद्याप फक्त दोनशे ग्रॅम सोने रिकव्हर झाले आहे. हे ताजे उदाहरण आहे.  तरी सराफ सुवर्णकार व्यावसायिकांच्या मागण्यांकडे आपण स्वतः जातीने लक्ष देऊन लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देशव्यापी लाक्षणिक संपात हिवताप कर्मचारी सहभागी

    वेब टीम  नगर : जिल्ह्यातील हिवताप कर्मचारी आजच्या देशव्यापी एक दिवसीय लक्षणिक संपात सहभागी झाले होते. राज्य हिवताप व हत्तीरोग कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप यांच्या नेतृत्वाखाली हिवताप कर्मचार्‍यांनी नगर येथील हिवताप कार्यालयाच्या प्रांगणात एकत्र जमून घोषणा देत संपात सहभागी झाले होते.

     सोशल डिस्टसिंगचे पालन करुन प्रत्येकाने मास्क लावला होता. जिल्हाध्यक्ष नवगिरी, सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप, कार्याध्यक्ष कैलास ढगे, उपाध्यक्ष अरुण लांडे, विनायक वाडेकर, जी.के.भागवत, प्रसाद टकले, कोषाध्यक्ष डी.एल.मुत्याल, वैभव चेन्नूर, सहचिटणीस किसन भिंगारदिवे, सागर गायकवाड, प्रयोगशाळा वैज्ञानिक कर्मचारी संजय सावंत, अमोल गमे, श्रीमती गायचंद, श्रीमती देशपांडे, श्रीमती धाडगे, .रासकर,वैराळ, शिंदे तसेच नगर शहरी भागातील व कार्यालयीन सर्व कर्मचारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

      हिवताप विभागात सन २००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, केंद्रीय कर्मचार्‍यांना देय असणारे सर्व भत्ते हिवताप कर्मचार्‍यांना मंजूर करा, वेतनत्रुटी दूर करण्याबाबत बक्षी समितीचा अहवाल खंड-२ तात्काळ प्रसिद्ध करा, हिवताप खात्यातील सर्व संवर्गातील रिक्तपदे तात्काळ भरा, हिवताप विभागातील आरोग्य सहाय्यकाचे संघटनेमार्फत प्रस्तावित केलेनुसार ग्रेड पे वेतनातील तफावत दूर करा, नियमित क्षेत्र कर्मचार्‍यांना ज्येष्ठतेनुसार आरोग्य कर्मचारी संवर्गात तात्काळ पदोन्नत्ती करा आदि मागण्यांसाठी जिल्ह्यातील हिवताप कर्मचार्‍यांनी या संपात सहभाग नोंदविला, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप यांनी दिली. सदर संपात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीही सहभागी झाले होते.    

     राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा, राज्य हिवताप व हत्तीरोग कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि हिवताप विभागातील प्रलंबित मागण्यांकरिता हा संप पुकारण्यात आला होता.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माथाडी कायद्याला नख लावण्याचा सरकारचा प्रयत्न - अविनाश घुले

   वेब टीम   नगर :  जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने हमाल-मापाडी, कामगार, शेतकरी यांच्या विविघ मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, गोविंद सांगळे, मधुकर केकाण, शेख रज्जाक, अशोक बाबर, लक्ष्मीबाई कानडे, नंदू डहाणे आदि सहभागी झाले होते.

     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकरी विरोधी कृषी कायदे व कष्टकरी कामगार विरोधी कायदे रद्द करा,मार्केट कमिट्या बरखास्त करण्याचा कायदा त्वरित रद्द करा. माथाडी कामगार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.,माथाडी मंडळात जिल्हा व राज्यस्तरावर कामगार संघटनेचेच प्रतिनिधी घेण्यात यावेत ,माथाडी कामगारांना पेन्शन योजना त्वरित लागू करावी. ,रेल्वे स्टेशन मालधक्का येथील कामगारांना नागरी सुविधा देण्यात याव्यात. मागण्या करण्यात आल्या आहेत.

     याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले म्हणाले, जिल्ह्यातील हमाल- मापाडी,स्त्री हमाल कामगार,व शेतकरी बांधव,या कष्टकरी घटकांचे अनेक प्रश्‍न व मागण्या राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे प्रलंबित आहेत. १९६९साली अस्तित्वात आलेला माथाडी कायदा ५१वर्षानंतर आताशी कुठे राज्यात सर्वत्र लागू होत आहे. हमाल कष्टकर्‍यानी लढून मिळविलेला हा कायदा असंघटित कष्टकर्यांना सामाजिक सुरक्षा देणारा देशातील पहिला कायदा आहे. काळाच्या कसोटीवरही हा कायदा आदर्श ठरला आहे. परंतु ‘मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, डिजिटल इंडिया, आशा वेगवेगळ्या नावाखाली कामगार कायद्यांना नख लावण्याचा व कायदा संकुचित करण्याचा उद्योग केंद्र सरकारने गेल्या पाच-सहा वर्षापासून सुरू केलेला आहे. माथाडी कायद्याला नख लावण्याचा सरकारचा प्रयत्न हमाल संघटना कदापीही सहन करणार नाही. केंद्र सरकारच्या प्रस्तावाचा संघटनेकडून निषेध करण्यात येत असून आजचा केंद्र शासनाचा कामगार विरोधी धोरणाच्या देशव्यापी संपात आजचा संपूर्ण जिल्हाव्यापी बंद पाळून भारत बंद मध्ये सहभाग नोंदवत असल्याचे त्यांनी सांगितले.

     या मोर्चात जिल्ह्यातील हमाल, मापाडी, कष्टकरी सहभागी झाले होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संविधान एका समाजापुरता मर्यादित नसून सर्व भारतीयांचा- अमित काळे


वेब टीम नगर : भिंगार शहर आरपीआयच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर संविधानाच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, देवराज भालसिंग, अ.भा. मेहेतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, दया गजभिये, गौतम कांबळे, महादेव भिंगारदिवे, कैलास गायकवाड, लखन आढाव, प्रवीण वाघमारे, आकाश आरु, विलास साळवे, शनैश्‍वर पवार, जालिंदर पवार आदी उपस्थित होते.

अमित काळे म्हणाले की, संविधान एका समाजापुरता मर्यादित नसून सर्व भारतीयांचा आहे. संविधानाने देशात समता, बंधुता व स्वतंत्र्यता प्रस्थापित झाले असून, हे तत्त्वच संविधानाचा पाया आहे. त्यांनी देश अखंड, धर्मनिरपेक्ष व एकात्म राहण्यासाठी संविधानाची निर्मिती केली असल्याचे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इमा लेडीज डॉक्टर्स विंग च्यावतीने शिशगृहातील मुलांकरीता वस्तुरुप देणगीचे वाटप

वेब टीम नगर :ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने आम्ही हे काम केले आहे. प्रत्येक सणाचे आपल्याकडे आगळे महत्व आहे.प्रत्येक सणाला एक धार्मिक अंग आहे.त्याचबरोबरच सामाजिक भानही या सणातून खऱ्या अर्थाने साजरी होती ती दिवाळीच दिवाळी सण म्हणजे दुसऱ्याचे दु:ख अथात दुसऱ्याच्या जीवनातील अंधार दूर करून त्यांचे जीवन प्रकाशमय करायचे असे प्रतिपादन डॉ. सुनीता अकोलकर यांनी केले.

इंडियन मेडिकल असोसिएशन वुमन डॉक्टर्स विंग अहमदनगरच्या वतीने  शिशगृहातील १ ते १० वयोगटातील मुलांकरीता वस्तुरुप देणगी  ब्लॅंकेट्स (मोठे व छोटे),स्वेटर, लॅक्टोडेक्स LBW दूध पावडर डबे,Good night मशीन व रिफिल,बेडशीट,बाळांचा वजन काटा ) देण्यात आली.यावेळी विंगच्या अध्यक्षा डॉ. सुनीता अकोलकर,सचिव डॉ. सोनाली वहाडणे व  डॉ. कांचन रच्चा, शिशुगृहाचे सामाजिक कार्यकर्ते विक्रम कानवडे, शिशुगृह मॅनेजर सौ. शितल प्रभुणे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष विंगच्या अध्यक्षा डॉ. सुनीता अकोलकर होत्या.

डॉ.सोनाली वहाडणे म्हणाल्या समाजातील सर्वानी एकत्र येण्यासाठी दिवाळी हा सण आहे.आनंद देण्याचा व  दुख कमी करायचे आहे.चिमुकल्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा सर्वोत्तम आहे. भारतीय संस्कृतीत दुसऱ्यांसाठी जगण हेच खरं जगण असते.आपल्या मदतीमुळे एखादयाच्या चेहऱ्यावर हास्य असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही.गोरगरीबाची सेवा ही खरी ईश्वरसेवा आहे.   

डॉ. कांचन रच्चा यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक महेश ढेरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिशुगृहाचे सामाजिक कार्यकर्ते विक्रम कानवडे यांनी केले.मान्यवरांचे आभार शिशुगृह मॅनेजर सौ. शितल प्रभुणे यांनी केले. मान्यवरांचा सत्कार सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.विंगचे चेअरमन डॉ.सरिता बांगर,डॉ.दिपाली फडके,डॉ.आरती होशिंग,डॉ.शैलेजा होशिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments