चोरीचा माल औरंगाबादेत जप्त

 चोरीचा माल औरंगाबादेत जप्त 

वेब टीम नगर :  ट्रक च्या केबिन मध्ये झोपलेल्या मनीषकुमार योगेन्‍द्र यादव वय २६ रा.बिहार याला झोपेत असताना अज्ञात इसमाने येऊन केबिनची काच फोडून शस्त्राने जखमी करून ट्रक मधील माल बळजबरीने चोरून नेल्याची घटना ३०-०९-२०२० रोजी  येथे नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झाली होती.सदर गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा हे त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने समांतर तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हा अविनाश दानियल चौथमल राहणार वाळुंज जि. औरंगाबाद यांच्या असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यांचे पथकातील पोलिस हेकॉ बबन मखरे,पोना रवी किरण सोनटक्के,पोना संतोष लोंढे, पो कॉ राहुल साळुंखे, पो कॉ जालिंदर माने व पो हेकॉ संभाजी कोतकर यांनी मिळून जिल्हा औरंगाबाद येथे जाऊन मिळालेल्या बातमीनुसार आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे अविनाश दानियल चौतमाल जिल्हा औरंगाबाद येथून त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला नगर तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याकडील गुन्ह्यातील पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे. Post a Comment

0 Comments