वाढीव वीज बिल मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन

 वाढीव वीज बिल मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन  

अनिल चितळे : मनसेचा वीज बिल वाढी विरोधात मोर्चा

   वेब टीमी  नगर - एप्रिल महिन्यांपासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले, व्यवसायांना घरघर लागली. अनेकांनी नोकर्‍या गमवाव्या लागल्या एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरी ठप्प झालेले अर्थकरण या दोन्ही आघाड्यावर नागरिक लढा देत असताना, महाविकास आघाडी सरकाने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिल्याने जनतेचे डोळे पांढरे झाले.  एरवी वर्षभराचं वीज देयक जितके येते तितक्या विजेची आकारणी केवळ तीन महिन्यांच्या वापराबाबत सरकारने जनतेला पाठवली. एप्रिल, मे, जून महिन्यात अनेक खाजगी आस्थापनाची कार्यालये बंद होती, पण तरीही त्यांना पण भरभक्कम वीज देयक पाठवली. पूर्वी जिझिया कर लावला जायचा या सरकारने वीज देयकातून जिझिया कर लावला आणि जनतेची लुट करत असल्याचा आरोप यावेळी केला, जोपर्यंत वाढीव वीज बिल मागे घेत नाही, तोपर्यंत मनसे आंदोलन करत राहील, असे याप्रसंगी अनिल चितळे म्हणाले.  

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने वीज बिल वाढीसंदर्भात राज्यस्तरीय आंदोनल करण्यात येत आहे, नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी सहकार सेनेचे सरचिटणीस अनिल चितळे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सरचिटणीस नितीन भुतारे, देवीदास खेडकर, दत्ता कोते, बाबा शिंदे, गणेश रांधवणे, गजेंद्र राशिनकर, दिगंबर पवार, बाळासाहेब माळी, राजेश लुटे, सतीश काकडे, ज्ञानेश्‍वर गाडे, वसिम राजे, सतीश म्हस्के, अ‍ॅड. अनिता दिघे, अमोल बोरुडे, अनिकेत जाधव, दिनेश जाधव, सुमित वर्मा, परेश पुरोहित आदिंसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     याप्रसंगी नितीन भुतारे म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे की, काही झालं तरीही वाढीव वीज देयकं भरु नका आणि हा असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारलाही जनतेतील असंतोष जाणवणार नाही. सरकार तुमच्या वीजेची जोडणी तोडू शकत नाही आणि जर त्यांनी असा प्रयत्न केला तर त्यांचा संघर्ष मनसे सैनिकांशी आहे हे लक्षात ठेवा. सरकारने उगाच वाढीव वीज देयकं पाठवून संघर्ष करु नये. वीज देयकांत सवलत देत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.

     यावेळी सचिन डफळ, अनिता दिघे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सुरेखा कोते, स्मिता भुजबळ, श्रद्धा बावर, संजय शेळके, तुषार बोबडे, विनोद काकडे, सुरेश जगताप आदिंसह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments