आरोग्य आहार : रवा ढोकळा

 आरोग्य आहार 

रवा ढोकळा 



साहित्य : अर्धी वाटी जाड रवा , अर्धी वाटी बारीक रवा , आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर , मीठ , साखर, ताक , छिमूटभर सोडा .  

कृती : जाड रवा व बारीक रवा अर्धी वाटी ताकात १ तासासाठी  भिजवून ठेवावा. तासाभरानंतर त्या मिश्रणात आलं लसूण मिरची पेस्ट , मीठ , साखर , घालून पीठ मिक्स करून ठेवावे. ढोकलापात्राला तेल लावून ठेवावे व पाणी उकळून घ्यावे. 

तयार मिश्रणात चिमूटभर सोडा घालून चांगले मिक्स करून घेणे. पीठ फुगून वर आल्यावर मग तेल लावलेल्या ढोकळा पात्रात हे मिश्रण घालून ढोकळा १५-२० मिनिटे वाफवून घेणे. ओल्या नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करावे. 


टीप :  हा ढोकळा   अधिक पौष्टिक बनवण्यासाठी एक वाटी पालक प्युरी वरील मिश्रणात घालून ग्रीन ढोकळा बनवणे तसेच  एक वाटी बिट प्युरी घातल्यास रेड ढोकळा होतो रंगहि चॅन येतो व ढोकळा पौष्टिक हि होतो.

Post a Comment

0 Comments