१ डिसेंबर पासून बँकेत मिळणार हि सुविधा

 १ डिसेंबर पासून बँकेत मिळणार हि सुविधा 

वेब टीम मुंबई : १ डिसेंबरपासून बँकिंगशी संबंधित हि सुविधा २४ तास सुरु होणार आहे.या सुविधेचा ग्राहकाना मोठा फायदाही होणार आहे. १ डिसेंबर पासून  रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटची (RTGS) सुविधा २४ तास मिळणार आहे. ग्राहकांना आरटीजीएसद्वारे ३६५ दिवस कधीही पैसे पाठवता येणार आहेत.

ऑक्टोबर महिन्यात RTGS ची सुविधा २४ तास करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला होता. ही सुविधा २४ तास सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे २४*७*३६५ लार्ज व्हॅल्यू रिअल टाईम पेमेंट सिस्टम असलेल्या जगातील अवघ्या काही देशांच्या यादीत भारताच नाव  सामील होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. सध्या RTGS ची सुविधा दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार सोडून कामकाजाच्या इतर दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात उपलब्ध आहे.

RTGS द्वारे त्वरित पैसे पाठवण्यास मदत होते. मोठी रक्कम पाठवण्यासाठी या सुविधेचा प्रामुख्यानं वापर केला जातो. निरनिराळ्या बँकांसाठी पैसे पाठवण्याची मर्यादा ही निरनिराळी आहे.

Post a Comment

0 Comments