आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

हरभऱ्याचे पराठे 

साहित्य : दिड वाटी ओले हरभरे सोललेले, आलं-लसूण-मिरची पेस्ट, पावभाजी मसाला, चाट मसाला, मीठ, साखर,लिंबू, २ वाटी कणिक , पाव वाटी डाळीचं पीठ,छोटा अर्धा चमचा ओवा. 

कृती : प्रथम कणिक, डाळीचे पीठ, ओवा, मीठ, तेल,घालून कणिक मळून ठेवावी.

एकीकडे ओले हरभरे मिक्सरवर जाडसर वाटून घ्यावे.कढईमध्ये तेल घालून फोडणी करून त्यामध्ये आलं-लसूण-मिरची पेस्ट आणि बारीक केलेले हरभरे घालून एक वाफ आणावी.त्यामध्ये पावभाजी मसाला, चाट मसाला,मीठ,साखर,लिंबू घालून एक वाफ आणावी आणि भाजी गार करण्यास ठेवावी. 

कणकेचा छोटा गोळा घेऊन पोळी लाटणे.सुरीने कट करून चौकोनी आकार करून घेणे. अशा दोन पोळ्या करून घ्याव्यात.एका पोळीवर सारण ठेऊन दुसरी पोळी त्यावर ठेऊन ,कडा दाबून घ्याव्यात अलगद लाटण्याने लाटून,बटर टाकून पराठे गुलाबीसर भाजून घेणे.              

Post a Comment

0 Comments