अश्विनी भंडारी यांचे अपघाती निधन

अश्विनी भंडारी यांचे अपघाती निधन 

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी एमडी कै.यशवंतराव भंडारे यांची सून व  अहमदनगर जिल्हा एम्प्लॉईज युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांच्या पत्नी अश्विनी धनंजय भंडारे यांचे आज सकाळी पहाटे अपघाती निधन झाले.आज सकाळी अहमदनगर येथील स्टेट बँक चौकात अपघात झाला. त्यांच्या पश्चात पती व दोन उच्चशिक्षित मुली, सासू, दिर, पुतणे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्यावर आज दुपारी १२.३० वाजता अहमदनगर येथील अमरधाम येथे अंत्यविधी करण्यात आला. सध्या परिस्थितीनुसार व नियमानुसार अल्प उपस्थितीमध्ये अंत्यविधी होणार आहे.अश्विनी भंडारे ह्या अहमदनगर शहरांमध्ये विविध क्षेत्रात कार्यरत होते त्यांनी अहमदनगर लायन्स क्लब, योगा, महिला फिटनेस क्लब तसेच अनेक सामाजिक संस्थावर काम केले आहे.

Post a Comment

0 Comments