अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा १२ कोटीचा पहिला हफ्ता वर्ग

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांचा १२ कोटीचा पहिला हफ्ता वर्ग

 वेब टीम कर्जत : कर्जत तालुक्यातील कर्जत, माही, कोंभळी आणि राशीन महसुली मंडळ कार्य क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावासाठी १२ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता वर्ग झाला असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. यासह उर्वरित रक्कम ही लवकरच वर्ग करण्यात असल्याचे म्हंटले.

            परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील बहुतांश गावात शेतपिकाचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये जवळपास ३९ हजार २१२ खातेदाराचे नुकसान झाले होते.  नुकसानग्रस्त भागातील पंचनामे वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाने मोठी कंबर कसली होती. त्या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील कर्जत, माही, कोंभळी आणि राशीन महसुली मंडळ कार्य क्षेत्रातील २१ हजार ७७  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता राज्य सरकारने नुकतेच वर्ग केले असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. महसूल मंडळ कोंभली आणि मिरजगाव येथील नुकसानीचा अहवाल देखील शासनास पाठविण्यात आला असून शासनाकडून निधी प्राप्त होताच तो सुद्धा वर्ग केला जाणार आहे. कर्जत महसुल प्रशासनाने एकूण २७ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली होती. उर्वरित अनुदान शासनाकडून प्राप्त होताच तात्काळ संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल अशी माहिती नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. 

Post a Comment

0 Comments