कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया एनसीबीच्या ताब्यात

 कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना एनसीबीने ताब्यात घेतले

वेब टीम मुंबई; शनिवारी सकाळी मनोरंजन जगासाठी धक्कादायक ठरले. लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांचे मुंबईतील  घरावर  नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या अधिकाऱ्यानी छापा टाकला .भारतीसिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया या दोघांना चौकशी साठी पोलिसांनी ताब्यात घेतले  .  सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतरच्या ड्रग नेक्सस प्रकरणात अद्याप तपास चालू आहे, मनोरंजन जगतातील अंमलीपदार्थ ,आणि ती  पुरविणाऱ्याची पाळेमुळे खणून काढण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली असून त्याचाच एका भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 

त्यांच्या अपार्टमेंटमध्ये छापा टाकल्यानंतर लगेचच एनसीबीच्या अधिकारयांनी  भारती आणि तिच्या पतीला चौकशीसाठी नेले. एनसीबी ऑफिस, मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले, "तिला आणि तिचा नवरा दोघांनाही एनसीबीने अमली पदार्थ बाळगल्याबद्दल   चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे."

Post a Comment

0 Comments