आरोग्य आहार

 आरोग्य आहार

 पौष्टिक लाडू 


साहित्य `- १ वाटी शेंगदाणे ,१वाटी तीळ ,१वाटी खोबरे किस,१ वाटी डाळ्या (चिवड्याचे ) ,१वाटी जाड पोहे ,४ वाटी गूळ किसलेला ,तूप लागेल तसे ,वेलची पावडर ,बदाम काप . 

कृती -प्रथम शेंगदाणे व  तीळ भाजून घेणे .गूळ व खोबरे किस गरम करून घेणे,जाड पोहे छान गुलाबी रंगावर भाजून घेणे. 

सर्व पदार्थ मिक्सरवर बारीक करून घेणे. किसलेला गुळ घालून चांगले मिक्स करून घेणे. त्यानंतर त्यामध्येवेळचंही पावडर आणि बदामाचे काप घालणे. लागेल तसे तूप टाकून लाडू वळून घेणे. 

हे लाडू खूप पौष्टिक होतात. शेंगदाण्या मुळे प्रोटीन, तिळामुळे आयर्न मिळते    

Post a Comment

0 Comments