प्रभूरामाच्या मंदिरात महाआरती , शहर शिवसेनेचा आनंदोत्सव

 प्रभूरामाच्या मंदिरात महाआरती ,

 शहर शिवसेनेचा आनंदोत्सव

वेबी टीम नगर : शहर शिवसेनेच्या वतीने राज्य सरकारने सर्व मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत करत पाडव्याच्या दिवशी नवीपेठेतील प्रभूरामाच्या मंदिरात महाआरती करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जय श्रीराम... जय श्रीराम....च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, संभाजी कदम, संतोष गेनप्पा, संजय शेंडगे, योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मदन आढाव, अशा निंबाळकर, अरुणा गोयल, हर्षवर्धन कोतकर, संग्राम कोतकर, अंबादास शिंदे, सचिन शिंदे, अरुण झेंडे, संतोष ढमाले, शशिकांत देशमुख, काका शेळके, अशोक दहीफळे, राजेंद्र पटारे, सागर बत्तीन आदि उपस्थित होते.

दिलीप सातपुते म्हणाले, करोनाच्या भयंकर महामारीत संपूर्ण जग होरपोळून निघाले होते. राज्य शासनाने खबरदारी घेत करोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील मंदिरे बंद ठेवली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याचा योग्य निर्णय योग्य वेळी घेतला आहे. याचा शहर शिवसेना सह सर्व भाविकांनाही आनंद झाला आहे. प्रभू रामाची महाआरती करत शिवसेनेने मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला आहे.

          विक्रम राठोड म्हणाले, शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता सर्व मंदिरे उघडून  भाविकांना दिलासा दिला आहे. मात्र अद्याप करोना गेलेला नाहीये, त्यामुळे भाविकांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत भगवंताचे दर्शन घ्यावे, असे आवाहन केले.


Post a Comment

0 Comments