पं.नेहरु व मौलाना आझाद आधुनिक भारताचे शिल्पकार : डॉ.अब्दुस सलाम

 पं.नेहरु व मौलाना आझाद आधुनिक 

भारताचे शिल्पकार : डॉ.अब्दुस सलाम 


    वेब टीम  नगर - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी घरदार सोडून आपल्या प्राणाची बाजी लावली. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाची परिस्थिती बिकट होती, अशा परिस्थितीत पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सर्वांना बरोबर घेऊन देशाची जडण-घडण केली. यामध्ये मौलाना आझाद यांनीही मोठे योगदान देऊन देशातील अशिक्षितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आज देश प्रगतीपथावर आहे, याचा पाया त्यावेळी रचला गेला. खर्‍या अर्थाने पंडित नेहरु व मौलाना आझाद हे भारताचे शिल्पकारच ठरले. त्यांचे त्याग व बदलीदान आपण सर्वांनी सदैव स्मरणात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ.अब्दुस सलाम  यांनी केले.

     मातोश्री उर्दू हायस्कूल येथे पंडित जवाहरलाल नेहरु व मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.प्रा.अब्दुस सलाम , मुख्याध्यापक जमिर शेख, इनायतुल्ला शेख, मुस्कान सोसायटीचे अध्यक्ष शफकत सय्यद, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सचिव आबीद दुलेखान आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी मुख्याध्यापिक जमिर शेख यांनी पंडित नेहरु व मौलान आझाद यांच्या जीवन चरित्रावर माहिती दिली. सूत्रसंचालन नासिर शेख, रियाज शेख यांनी केले तर  वसिम शेख यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments