जिजाऊ ब्रिगेडच्या विभागिय संघटकपदी अनिता काळे यांची निवड..

 जिजाऊ ब्रिगेडच्या विभागिय संघटकपदी अनिता काळे यांची निवड..

वेब टीम नेवासा - अहमदनगर जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हा अध्यक्ष शिवमती अनिताताई काळे यांची मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या विभागिय संघटक पदी निवड करण्यात आली .मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव सारीका लोकरे यांनी हि निवड केली. 


अनिताताई काळे या पुर्वी जिजाऊ ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे तसेच त्यांचा सामाजिक चळवळीमध्येही सक्रिय सहभाग असतो.सामाजिक तळमळ, महिलांचे आर्थिक, शैक्षणिक, सर्व क्षेत्रांतील सक्षमीकरण व अनेक सामाजिक उपक्रम राबवुन जिजाऊ ब्रिगेड माध्यमातून  प्रामुख्याने महिलांना संघटीत करणे, राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेतुन त्यांना स्रीशक्तीची जाणीव करून देणे ,प्रत्येक घरातील स्री हीच खरी दिशादर्शक असते.त्यामुळे त्यांना शिक्षण आणि स्वावलंनाचे महत्व पटवून देऊन आत्मनिर्भर बनविणे अनिष्ठ रूढी परंपरा यातुन त्यांची मुक्तता करणे .महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यातुन त्यांना न्याय मिळवून देणे या सर्व गोष्टी वर काम करतात त्यांचे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुरेश इथापे साहेब, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सह  सचिव राजश्रीताई शितोळे, रोहीणी वाघमारे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष संपुर्णा सावंत, डाॅ.दिपाली पानसरे  यांच्यासह मंदाताई निमसे, प्रकाश कराळे,   जयकिसन वाघ यांच्या सह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांसह अमोल लहारे, निंबाळकर, मिनाक्षी ताई जाधव, माया ताई हराळ , सुमेधा जी शेजुळ, सुषमा ताई गुंजाळ, राणी पवार, संज्योत कचरे, सारिका खांदवे,मिनाक्षी मुन्ना , सर्वांनी अभिनंदन केले .  Post a Comment

0 Comments