महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा सत्कार वेब टीम नगर - विश्वनेत्या इंदिराजी गांधी यांना समर्थन देऊन जिल्ह्यात  पक्ष रुजविण्याचे काम स्वतंत्र सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या बरोबर नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले म्हणून जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्या काळात बळ प्राप्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने प्रसंगी जिल्हात काँग्रेस चे अस्थीस्थत्व ज्यांच्यामुळे आहे  त्यात ना.थोरात यांचा उल्लेख  करावा लागेल, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून आज थोरात साहेब राज्याचे नेतृत्व करीत आहे ही बाब ७७-७८ च्या कार्यकर्ते सहित सर्वांनाच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, त्याचे प्रतीक म्हणून आज ना.थोरात यांचा इंदिराजींची प्रतिमा देऊन नगर शहर काँग्रेस कमिटीने सन्मान केला आहे. संगमनेर येथे झालेल्या छोटेखानी समारंभात शहराध्यक्ष  बाळासाहेब भुजबळ, अल्पसंख्याक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान, युवा नेते अज्जू भाई शेख, पत्रकार राजेश सटाणकर आदी सहभागी झाले होते.Post a Comment

0 Comments