दीपावली वार्षिक राशिभविष्य

दीपावली वार्षिक राशिभविष्य 

कुंभ : शुभ घटनांच्या मालिका 

येणारे वर्ष मागील वर्षापेक्षा शुभ दायक आनंदाचे, प्रगतीचे जाणार आहे. जून २०२१ नंतरचा काळ जास्त सुखकारक जाणवेल. त्या दृष्टीने नयोजन करावे. आप्तेष्टांपासून त्रास राहील आरोग्य जपावे. विद्यार्त्यांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचे चीज होईल काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळवता येईल . छोटासा व्यवसाय उत्तम चालेल. बेरोजगारांना कामे मिळतील सरकारी नौकरी मिळवण्यात यश मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.कौटुंबिक सुख मिळेल, कोर्ट कचेरी टाळावी , वाद विवाद टाळावा . शेतीवाडी ,बंगला , गाडी इत्यादी खरेदी विक्री मध्ये यश मिळवता येईल. शेजारी नातेवाईकांशी मिळून मिसळून वागावे. एकूण वर्ष मिश्र स्वरूपाचे जाणार आहे. 

उपासना: शनिमारुतीची उपासना अवश्य करावी. त्याच बरोबर गुरुदत्तात्रय उपासना करावी. 

मिन: अपयश धुवून काढाल 

हे वर्ष आपल्याला यशकारक असून अपयश धुवून काढाल काही महिने जरा काळजी घ्यावी तरच सुख समाधान मिळवता येणार आहे. प्रवासाचा त्रास राहणार आहे.वाहन दुरुस्ती खर्च वाढेल. जुन्या - नव्या राहत्या जागेचे प्रश्न सुटतील नवीन जागेत जाण्याची संधी मिळेल वारसाहक्क मिळेल. संसारातील अडीअडचणी ह्या वर्षी कमी होत जाणार आहेत त्यामुळे तुम्हांस संसारसुख मिळणार आहे. मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे. पित्ताचे विकार उष्णेतेचे विकार कमी होतील,एकूण दिवाळीनंतर कुटुंबिक शुभकार्याची जळणी झाल्याने शुभकार्यासाठी खरेदी आणि प्रवास सुखाचा होणार आहे. 


उपासना : गुरुदत्तात्रयाची उपासना आणि गुरुचरित्राची पारायण श्रीस्वामी समर्थ जप करावी. गुरुदत्तात्रय तीर्थक्षेत्री प्रवास यात्रा करावी उदकशांती घरी करून घ्यावी कुलाचार पाळावा.Post a Comment

0 Comments