१९७७-७८या काळात इंदिरा गांधींना तत्कालीन काँग्रेसने समर्थन नाकारले होते अनिल परदेशी

१९७७-७८या काळात इंदिरा गांधींना तत्कालीन काँग्रेसने समर्थन नाकारले होते अनिल परदेशी



वेब टीम नगर : इंदिराजींच्या पडत्या काळात तत्कालीन काँग्रेस नेते इंदिराजींना समर्थन देण्यास राजी नव्हते १९७७च्या पराभवानंतर इंदिराजींच्या पाठीशी सामान्य कार्यकर्ते खंबीरपणे होते त्यामुळे त्यांना नजीकच्या १९७९ च्या मध्यावधी निवडणुकीत यश मिळाले होते बदलत्या काळात मात्र सामान्य निष्ठावान आणि ध्येयवादी यांना बाजूला सारून सामाजिक कार्य नव्हे तर राजकारणाला महत्त्व प्राप्त झाले ही परिस्थिती बदलण्यासाठी १९७७-७८ प्रमाणे सामान्यांची एकजूट करण्याची गरज आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे असे आवाहन ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अनिल परदेशी यांनी केले.


पंडित नेहरू यांच्या  १३१ व्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसने आयोजित कार्यक्रमात परदेशी अध्यक्षपद म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले जवाहरलाल नेहरूंचे योगदान मोठे आहे त्यांच्यानंतर इंदिराजींनी देशाला खंबीर नेतृत्व दिले आज देशालाही अशा नेतृत्वाची गरज असून यासाठी सामान्यांची एकजूट होणे गरजेचे आहे.

यावेळी इंटकचे हनिफ शेख माजी नगरसेवक ग्रुप सिंग कदम अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान प्रदेश सदस्य शामराव वागस्कर ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांच्या पठाण आदींची समयोचित भाषणे झाली स्वागत भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट आर आर पिल्ले यांनी केले तर प्रास्ताविक शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले ते प्रारंभी पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन झाले. 

शहर सरचिटणीस अभिजीत कांबळे उपाध्यक्ष अरुण धामणे आर आर पाटील माजी पोलीस निरीक्षक व उपाध्यक्ष एमआय शेख महिला प्रदेश सदस्य शारदा वाघमारे रजनी साठे मीना घाडगे निजाम पठाण नरेंद्र भिंगारदिवे विवेके येवले विजय आहेर बाळासाहेब ठोंबरे संतोष कांबळे सुभाष रणदिवे आदी या वेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश सटाणकर यांनी केले

Post a Comment

0 Comments