दिवाळी विशेष:मुलांचा बुद्धी विकास व त्यासाठी विविध उपक्रम

 दिवाळी विशेष 

मुलांचा बुद्धी विकास त्यासाठी विविध उपक्रम


बुद्धी म्हणजे काय 

मानव प्राण्याला मिळालेली इतर प्राण्यांपेक्षा वरचढ असणारी देणगी म्हणजे बुद्धी तिच्यामुळे मानव शारीरिक, मानसिक ,भौतिक, सामाजिक ,अध्यात्मिक आदी सर्व प्रकारची प्रगती करू शकतो . आपले जीवन अधिक सोयीचे समृद्ध करू शकतो.  मनुष्य हा विचारशील प्राणी आहे 'मॅन इज रॅशनल  ॲनिमल' ही विचारशक्ती बुद्धी मुळे निर्माण होते.

राम खूप हुशार आहे, मंदा मठ्ठ आहे अशी विधाने नित्याच्या   बोलण्यात माणसं करीत असतात तज्ञांच्या मते बुद्धीला विविध पैलू असतात.  उदाहरणार्थ शिकण्याची क्षमता, नवीन परिस्थितीत जुळवून घेण्याची शक्ती, पूर्वानुभवा  वरून बोध घेण्याची कुवत, नवनिर्मिती क्षमता , नवीन ज्ञान, कल्पनाचित्र, वस्तू इत्यादी.


 बुद्धीचे स्वरूप मोजमाप

व्यावहारिक पातळीवर जाणून घ्यायचे असल्यास मी बुद्धीला विजेची उपमा देतो.  वीज जशी दिसत नाही पण तिचे विविध उपयोग आपण करतो ती मोजता ही येते तसेच बुद्धीचे आहे ,ती दिसत नाही पण ती वेगवेगळी कामे करते तसेच तिचे प्रमाण बुद्धिमापन कसोट्याच्या सहाय्याने मोजून एखादा मुलगा किंवा मुलगी नेमकी किती बुद्धिमान आहे हे बुद्धांक कल्पनेच्या' इंटेलिजन्स कन्टेन्ट' च्या मदतीने आपण ठरवू शकतो

बुद्धीची वेगवेगळी (काही) कामे

) वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजणे

) यांत्रिक उपकरणांचा उपयोग जाणणे उदाहरणार्थ घरगुती मिक्सर इस्त्री वॉशिंग मशीन इत्यादी

)समस्या सोडविणे उदा.  लहान मुलाला फळी वरील खाऊचा डबा काढता येत नाही तेव्हा तो पायाखाली स्टूल  खुर्ची घेऊन काढतो

) स्वावलंबन स्वतःची कामे स्वतः करणे उदा.  स्वतःच्या कपड्यांना बटने लावणे,, कपड्यांना घड्या घालणे स्वतःच्या बुटांना बंद बांधणे इत्यादी क्रिया साध्या वाटतात पण बालवाडीच्या अवस्थेतील मुलांना या गोष्टी करता आल्या पाहिजेत, त्या करण्याची संधी त्यांना दिली गेली पाहिजे.

) भाषणस्पर्धा, लेखनस्पर्धा,चित्रकला, गायन ,नृत्य इत्यादी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेणे

) एखादी कृती करताना पुन्हा पुन्हा अडचणी आल्या तरी चिकाटीने प्रयत्न करून यश मिळवणे उदा. सायकल चालवणे लवकर जमले नाही म्हणून ती शिकणे सोडून देणे योग्य नाही यासंदर्भात संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे ते असे  विघ्नैः पुनः पुनरपी प्रति हन्यमाना प्रपब्धमुत्तमजनः परित्यजानी

 


बुद्धी  बाबत व्यक्ती भेद आढळतात

निरनिराळ्या व्यक्तींच्या बुद्धीचा आवाका वेगळा वेगळा असतो निरनिराळ्या विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत वेगवेगळी  असते सूर्याचा प्रकाश भिंगा वर पडल्यावर उष्णतेचे केंद्रीकरण होऊन खाली धरलेला कागद जळतो, पण मातीच्या गोळ्यावर सूर्यकिरण पडल्यास उष्णता केंद्रित होऊ शकत नाही.  सूर्यप्रकाश तोच पण उष्णतेची ग्रहणक्षमता वेगवेगळ्या पदार्थांची  वेगवेगळी असते तसेच विद्यार्थ्यांची ज्ञानग्रहण क्षमता वेगवेगळी असते.

बुद्धीचा आवाका किंवा तीव्रता वाढविता येते का ?

बुद्धीचा आवाका जन्मजात किंवा निसर्गदत्त असतो त्यात फार मोठी वाढ शिक्षणाने किंवा संस्काराने आपण करू शकत नाही हे खरे असले तरी काही प्रमाणात बुद्धीचा विकास होणे शक्य आहे, आणि ही शक्यता लक्षात घेतल्यामुळे शिक्षक पालक मुलांच्या बुद्धी विकासाबाबत प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात

 

बुद्धी विकास शक्य आहे

मुलांच्या उपलब्ध बुद्धीमध्ये आपण भर घालू शकत नाही हे खरे असले तरी त्या बुद्धीचा पुरेपूर वापर करण्याची संधी मुलांना देणे आणि त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून योग्य ते मार्गदर्शन करणे मात्र शक्य आहे.  आणि त्यादृष्टीने पालक शिक्षक यांची भूमिका त्यांनी समजावून घेतली पाहिजे आणि पार पाडली पाहिजे

बुद्धीचा विकास कसा करावा

यः पठति लिखति पश्यति परिपुच्छति पण्डितानुपाश्रयति

तस्य दिवाकरकिरणैर्नलिनीदलमीव  विकास्यते बुद्धीः ।।

 म्हणजेच  - जो वाचतो, लिहितो,निरीक्षण करतो, प्रश्न विचारतो तज्ञांच्या सानिध्यात राहतो त्याची बुद्धी सूर्यकिरणांनी कमळाच्या पाकळ्या उघडाव्यात त्याप्रमाणे विकसित होते उपरिनिर्दिष्ट कृतींची संधी पाल्यांना दिली जावी, किंबहुना पालकांनी आपल्या मुलांना तशी सवय लावावी रोज काही वेळ वाचन लेखन निरीक्षण प्रश्न विचारणे आदी  पैकी काही उपक्रम मुलांकडून करून घ्यावेत त्यासाठी अनुकूल वातावरण साहित्य यांची निर्मिती ती पुरवठा पालकांनी केला पाहिजे

 


पाल्यांचा बुद्धी विकास घडविणारे उपक्रम पालकांसाठी सुचना

)आपल्या मुलांना शैक्षणिक सहलींना पाठवा ज्ञानाची कक्षा रुंदावते शेतीची उंचावते समृद्ध अनुभव मिळतात. 

) मुलांचा बुद्ध्यांक ठरवून घेणे चांगले, बुद्धीची पातळी मोजणे म्हणजे बुद्ध्यांक किँवा आय क्यू ठरविणे मुंबईला वोकेशनल गाईडन्स  किंवा पुण्याला ज्ञान प्रबोधिनी आहे अशा संस्थांमधून मुलांचा आय क्यू ठरविणे ठरवून दिला जातो. हा शोधण्याची गरज म्हणजे मुलांकडून आपण वाजवी अपेक्षा करावी अयोग्य अपेक्षा ठेवू नयेत.

 ) स्वावलंबनाला उत्तेजन : मुलांसाठी प्रत्येक गोष्ट स्वतः करू नका काही पालक मुले करू शकतील अशा गोष्टी मुलांसाठी स्वतः करतात तशी गरज नाही. 

) बुद्धीला खाद्य : एक सुट्टीत बहुरंगी करमणूक सारखी पुस्तके वाचायला द्या ,मुलांना कोडी घाला, कूट प्रश्न विचारा, समस्या सोडवायला द्या, शब्दकोडी सोडवून घ्या इत्यादीने  त्यांचा शब्दसंग्रह वाढेल लहान मुलांना चित्रांचे पुस्तक आणून देऊन त्यातीलच चित्र रंगविण्यास सांगा रंगसंगती त्यांना कळेल थोड्या मोठ्या मुलांना चित्रांचे तुकडे जुळून चित्र तयार करण्यास सांगा, एखाद्या खेळण्याचे सुटे भाग करून पुन्हा जोडण्यास सांगा, आणखी मोठ्या मुलांसाठी बुद्धी बळासारखे खेळ आणून देणे, त्यांना खेळ शिकवणे, त्यांच्याशी खेळणे हेही तुम्ही करू शकता.

) प्रदर्शनाला भेटी: विज्ञान उपकरणे पुस्तके चित्रे इत्यादी

)पाल्यांना मैदानी क्रीडा सामने बघावयास पाठवा.

) जिज्ञासापूर्ती : मुलांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे द्या त्यांचा हिरमोड करू नका नवनवीन ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा तुम्ही दाखवा म्हणजे मुलेही ही तुमचे अनुकरण करतील उदाहरणार्थ वर्तमानपत्रातील माहिती मानवाची चांद्रमोहीम सणावारांचे महत्त्व इत्यादी.

 ) सुसंगती: चांगल्या मित्रांबरोबर मुलांना मिसळण्याची संधी द्या.

) प्रार्थनेचा परिपाठ संध्याकाळी शुभंकरोती या कुंदेंदु सरस्वती प्रार्थना आधी अर्थासहित सांगून रोज स्वतः त्यांच्या बरोबर म्हणा

१०) समरसता : मुलांच्या कृती तुम्ही रस दाखवा त्यांच्या कृतीचे कौतुक करा आणि तुमच्या काही कृतींमध्ये मुलांना सहभागी करून घ्या त्यांची मदत घ्या त्यांचे मत विचारा.

११) स्वतःचे विचार उच्चार आचार यांच्यात सुसूत्रता असावी विसंगती नसावी म्हणजे मुलेही ही अनुकरण करतील.

१२) विश्लेषण संक्षेपण समीक्षण ही बुद्धी ची कामे आहेत ही कामे मुलांकडून करून घ्या त्यासाठी सहलीचे वर्णन लिहून घ्या पाहिलेल्या ऐकलेल्या कार्यक्रमांचे मुलांकडून मूल्यमापन करून घ्या मात्र मूल्यमापन कर असे म्हणता सोप्या शब्दात त्याला विचारा तुला काय आवडले? का? काय नाही आवडले ?का ?त्यांना मोकळेपणे मतप्रदर्शन करू द्या

प्रा.  डॉ.  वसंत गो जोशी - अहमदनगर

मोबा. ९४२२३१५१२५    



Post a Comment

0 Comments